Skip to main content

दगड

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 05/03/2021 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
शिल्पकार आणी शिल्पकला प्राचीन भारतात कीती प्रगत होती याचे पुरावे जागोजागी अढळतात. माझा काही अनुभव शेअर करतो. जबलपुर भेडाघाट लाईमस्टोन, जयपुर मकराणा मार्बल स्टोन ताजमहाल आणी अलीकडची बिर्ला मंदिर , जैन मंदिरे मध्यप्रदेश खजुराहो मंदिरे , सँण्ड स्टोन, कर्नाटक, केरळ, तामीळनाडू कृष्णशिळा ब्लँकस्टोन, तिरुपती बालाजी ग्रानाईट आसे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांमधून आपल्या पूर्वजांनी अद्भुत शिल्प निर्माण केली आहेत. पुण्यात बदली झाल्यावर विचार केला दक्षिण भारतात प्रवासाला जाऊया. मदुराई, कोडाईकँनाल, रामेश्वरम- कन्याकुमारी आणी त्रिवेंद्रम आसा दहा दिवसाचा प्रोग्राम.

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 27/02/2021 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! लॅटीन लिपीतून मराठी मजकूर लिहिणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! माझ्या फोनमधे मराठी/देवनागरी किबोर्ड इन्स्टॉल होत नाही, फोनमधे देवनागरीत कसं लिहायचं ते मला माहित नाही अशा थापा मारणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! फोनमधे देवनागरीत लिहायला फार वेळ लागतो म्हणणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! मित्र, छत्रपती हे शब्द 'मिञ', 'छञपती' असे टंकणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! 'हिंदी' शब्द मराठीत घुसवणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! आताच्या 'घडीची' सर्वात मोठी 'बातमी देणार्‍यांना' मराठी दिनाच्या शुभेच्छा! मराठीची लक्तरं करणार्‍या जाहिर

सय...

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 25/02/2021 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
पाहुणचार बरेचदा औपचारिकता,आपली संस्कृती आहे.पण आपल्याच माणसांकडे खेळीमेळीचा पाहुणचार न राहता ती होती आपुलकीची सय..मऊ,कोमल. आत्याच्या गावी निवांत जायचे..

१ अप ४ डाऊन

लेखक मालविका यांनी सोमवार, 22/02/2021 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
२००,३०० किमी BRM झाल्यावर पुढच्या स्पर्धेचा किडा वळवळला. आमच्या वेळापत्रकात बसेल अशी स्पर्धा शोध चालू होता. सगळे पर्याय विचारात घेता १९ फेब्रुवारीला औरंगाबादला असणारी ६०० किमीच्या BRM ची निवड झाली. बरोबर स्वप्नील दाभोळकरआणि तेजानंद होतेच. अचानक ३ दिवस आधी रोशनची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली.आता आम्ही एकूण ५ जण झालो. आताशा BRM ला ग्रुप ने जायचं कि बोलेरोमध्ये सायकल टाकायच्या आणि बाकीच्यांनी कारने जायचं हे जवळपास समीकरण ठरूनच गेलाय. ३०० नंतर ४०० न करता डायरेक्ट ६०० ची झेप घेणं आव्हानात्मक होत. पण प्रयत्न करून बघू, आपल्याला जमेल असा विश्वास होता.

वाजवा रे वाजवा

लेखक नीलकंठ देशमुख यांनी रविवार, 14/02/2021 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
वाजवा रे वाजवा.    'आता सावध सावधान समयो' लग्नात शेवटचे मंगलाष्टक सुरू होते ."वाजंत्री बहु गलबला न करणे"ही ओळ सुरू झाली की बाहेर उभे असलेले  बॅंडवाले सज्ज होतात.भटजींनी "शुभमंगल सावधान"म्हटले, की बॅंडचा दणदणाट सुरू होतो.बहुतेक वेळा,कानठळ्या बसवणारा, असह्य होणारा ; क्वचित सुरेल स्वरांची,मधुर गाण्याची रिमझिम करडणारा .वाजंत्री कसेही असोत;पूर्वीतरी, लग्नकार्यात बॅंड अनिवार्य वअत्यावश्यक असे.लग्नाच्या आधीचे दिवशी नवर देवाकडचे लोक (वर्हाड) येतात,तेव्हा त्यांचे स्वागतासाठी  बॅंड तयार हवाअसे.नाही तर त्यातल्या काही लोकांना तो अपमान वाटे.त्यांचे स्वागत, वाजत गाजत होणे आवश्यक असे.

गुरुवार गुंज आणि गुरू

लेखक नीलकंठ देशमुख यांनी गुरुवार, 28/01/2021 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुवार गुंज आणि गुरु. वीज नव्हती, टिव्ही नव्हते ,त्या काळात गावात रात्री लवकरच शांतता होई.संध्याकाळी कामावरून घरी परतलेले लोक थकलेले असत.दिवे लागण झाली की थोड्याच वेळात जेवणखाणे आटोपून बहुतेक जण झोपी जात.रात्री आठ साडेआठचे सुमारास सगळीकडे चिडीचूप.कुठे पोथी,भजन वगैरे सुरू असे ते आणि दर गुरुवारी रात्री देशमुख गल्लीत 'दत्त पंचपदी 'होई,तेवढेच अपवाद.तिथे मात्र उशीरा पर्यंत जाग असे. ज्या घरी पंचपदी असे ते घर गॅसबत्तीने उजळून निघे. जेवणे आटोपून लोक रात्री आठचे दरम्यान पंचपदी साठी जमा होत. बैठकीत चौरंगावर दत्ताची तसबीर मांडून पुजा केली जाई.

मनातले माधवनगर -उत्सव-सण-वार...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 27/01/2021 18:39 या दिवशी प्रकाशित केले.

‘मी पाहिलेले-अनुभवलेले आखीव माधवनगर’.

1

मनातले माधवनगर -उत्सव-सण-वार...

१.गणेशोत्सव... माधवनगरातील कॉटन मिलमधे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. त्यात आरती-प्रसाद विसर्जन या भानगडीत न पडता आम्हा सवंगड्यांना त्यावेळचे खास आकर्षण असे ते दर शनिवारी ठेवल्या गेलेल्या विविध कार्यक्रमांचे. त्या काळात एकमेकांच्या घरी जाऊन गल्लीतील सगळे जण बसायला पटकुरं घेऊन रात्री आठ वाजल्यापासून घोळक्याने मिलच्या गेटपाशी रेटारेटी सहभागी होत, आत झुंडीने जात.

आठवणी ४ - मु. पो. इस्लामपूर

लेखक मनस्विता यांनी रविवार, 24/01/2021 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
खेडवरून बाबांची बदली बत्तीस शिराळ्याला झाली. शिराळा हे त्या मानाने लहान गाव असल्याने बाबांनी इस्लामपूरला बिऱ्हाड करायचे ठरवले. मला कळणाऱ्या वयातील ही पहिली बदली म्हणू शकू. तशी आमची मानसिक तयारी असायची की साधारण ३-४ वर्षे झाली की नवीन जागी बाडबिस्तरा हलवायचा. पण लहान असले तरी पुण्याजवळच्या गावातून लांब अश्या सांगली जिल्ह्यात आमचा मुक्काम हालला. इस्लामपूरला आलो तेव्हा मात्र मनाची हीच तयारी होती की जास्तीत जास्त एक वर्ष राहायचे आणि मग पुण्याला स्वतःच्या घरी कायमचे राहायला जायचे. इस्लामपूर हे वाळवा तालुक्यातील एक गाव. पण तरी वाळव्यापेक्षा बरेच मोठे गाव आहे.

मांगी-तुंगी

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी बुधवार, 20/01/2021 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
सटाणा- पिंपळनेर ह्या ऊत्तर महाराष्ट्रातील प्रचंड निसर्गरम्य स्थळ मांगी तुंगी सकाळी ५ वाजता उठून जायचे ठरले. बरोबर चुलत भाऊ आणि वडील होते. ५ ऐवजी सकाळी सहा ला निघालो. धुळ्याहून साक्री सक्रीतून मांगीतुंगी असा १०० किमी चा प्रवास होता. साक्री रस्ता (सुरत-नागपूर) 4 लेन बनवण्याचं काम चालू असल्याने बरेच डायव्हर्जन, खड्डे होते. साक्री ला आल्यावर शेवाळी फाट्याने निजामपूर कडे गाडी टाकली इयचे रायपूर गावाच्या पुढे एक डोंगर ओलांडला की 200 पवनचक्क्या आणी सोलर प्लांट चा खूप सुंदर नजारा दिसतो. पण ती फेरी वाया गेली, कारण धुक्यामुळे काहीच दिसलं नाही. अर्धा तास वाया घालवून मग पिंपळनेर रोड ला लागलो.

Injury ते SR

लेखक मालविका यांनी शनिवार, 16/01/2021 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख हा माझा लाईफ पार्टनर श्रीनिवास याने लिहिला आहे. मी फक्त शब्दांकन करण्यास हातभार लावला. २०१३-१४ ची गोष्ट आहे. सह्याद्री मधल्या अनवट वाटा ढूंढाळताना छोटासा अपघात होऊन गुडघा दुखावला गेला होता. नेहमीप्रमाणेच त्याच्याकडे दुर्लक्ष करून ट्रेकिंग चालूच होत. पण २०१५-१६ साली पुन्हा गुडघ्याच्या पाठीमागच्या भागात दुखायला लागलं. शेवटी झक मारीत डॉक्टर कडे गेलो. डॉक्टर नि तपासून MRI करायला सांगितल. weakness in posterior horn medical meniscus असा रिपोर्ट आला. म्हणजेच गुडघ्याच्या पाठीमागचा भाग सुजतो, लॉक होतो, वेदना होतात. रिपोर्ट वाचून डॉक्टर नि लगेचच मला ट्रेकिंग बंद करायचा सल्ला दिला.