Skip to main content

सामान्य माणूस असामान्य गोष्टी करतो तेव्हा......

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 16/09/2008 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणातल्या तुळस नावांच्या एक खेड्यात रमाकांत तुळसकरने खूपच सामाजीक कार्य केलं आहे,असं माझ्या एका मित्राने मला सांगितल्याने मला माझ्या शाळेतला दोस्त रमाकांत तुळस्करची आठवण आली.हा तोच तर नसेल,असं कुतुहल मनात येऊन मी त्या खेड्यात मुद्दाम गेलो.आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मनातला तोच रमाकांत होता.मला इतक्या वर्षानी पाहून त्याला ही खूप आनंद झाला. इकडतिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्याला म्हणालो, "काय रे बाबा!

...पुढच्या वर्षी लौक्कर या..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 16/09/2008 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, गेले १०-१२ दिवस सुरू असलेला गणेशोत्सव काल अखेर संपला. घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे गणपती काल आपापल्या घरी गेले. आम्ही देखील काल दुपारी साडेअकरा-बारा वाजल्यापासून ते आज सकाळपर्यंत आमच्या लाडक्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालो होतो. लालबाग, परळ, चिंचपोकळी आदी गिरणंगाव परिसर मांणसांनी अक्षरश: फुलून गेला होता. रस्ते, इमारती, चाळी, गच्च्या इत्यादी सर्वत्र ठिकाणी लोकांनी लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला प्रचंड गर्दी केली होती. मुंगीलादेखील पाय ठेवायला कुठे जागा नव्हती.

एक शृंगारीक कविता

लेखक रामदास यांनी सोमवार, 15/09/2008 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
भिरभिरते अशी नजर कशाला का, पदर चाचपून बघते ग. भाळावरचे थेंब टिपूनी का ,उगाच खुद्कन हसते ग. एकांतामधी चावेचिमटे कोण तपासून बघते ग दाताखाली ओठ चावूनी कोण उसासून थकते ग. झिम्म्ड फुगडी मिठी रांगडी कुठे सांडली बुगडी ग दहीवर आले उंबरठ्याशी रात्र तोकडी पडली ग बोटावरती दिवस मोजूनी हिशोब कसला धरते ग लुटून गेले पीक पहाटे गोफण आता कसली ग.
Taxonomy upgrade extras

पुणेरी वाहतूक पोलिसाचे वर्तन

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी रविवार, 14/09/2008 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी वाहतूक पोलिसाचे वर्तन http://www.loksatta.com/daily/20061111/mv04.htm प्रतिक्रियेसाठी संपर्क :- भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

टीव्ही वाहिन्यांतील पाहिलेले बदल

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 11/09/2008 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच सुरू झालेल्या ’कलर्स’ वाहिनीवर नवीन चित्रपट दाखविण्याची जाहिरात बघितली (त्यावर एक-दोन चित्रपटही पाहिले), तेव्हा खूप दिवसांपासून मनात असलेले विचार पुन्हा समोर आले. हिंदी चित्रपट दाखविल्याशिवाय कोणतीही वाहिनी बहुधा तग धरू शकत नाही. जसे आम्ही वसतीगृहात राहत असताना एक मित्र खानावळीबद्दल बोलला होता की, बटाटे नसते तर ह्या मेस वाल्यांचे काय झाले असते? ;) आपल्याला ही सवय दूरदर्शनवर (वाहिनी बरं का, आधी ती एकच वाहिनी होती) हिंदी सिनेमे दाखवत होते तेव्हापासूनची. बहुधा त्यांना काही एवढी गरज नव्हती, पण लोकांची आवड म्हणून ते दाखवायचे.

अमेरिकेतील आमच्या घरच्या गौरी..

लेखक नाटक्या यांनी बुधवार, 10/09/2008 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
सालाबाद प्रमाणे यंदाही आमच्या घरी (बे एरिया, फ्रिमाँट) येथे रविवारी गौरीपूजन व भोजनाचा कार्यक्रम झाला. गौरीचा सगळा स्वयंपाक मी व आमच्या सौं. नी सकाळी ५:०० वाजता ऊठून सोवळ्यात केला होता. मिपातर्फे आमचे जुने मित्र 'एक' सहकुटुंब हजर होते. त्याची काही छायाचित्रे येथे देत आहे. सध्या फक्त गौरींचीच छायाचित्रे देत आहे. जमल्यास दर्शनाला आलेल्या ईतर मित्रांची सुध्दा टाकीन... आमच्या सौ.

कथा कढईभर शिऱ्याची!

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 09/09/2008 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
खाण्याशी सख्य लहानपणापासूनच जडल्यामुळे आणि कुणी मखरात बसवून आवडीचे पदार्थ करून खायला घालण्याची शक्‍यता नसल्यामुळे मुदपाकखान्यात स्वतःचं कौशल्य आजमाविण्याविना पर्याय नव्हता. उपाशी राहायला लागणार नाही, एवढा स्वयंपाक इयत्ता नववीत असल्यापासूनच यायला लागला होता. दहावीत असताना तर त्यावर कडीच झाली. तेव्हा रत्नागिरीत राहत होतो. दहावीचं महत्त्वाचं वर्ष होतं. वर्षभर थेटरात जाऊन चित्रपट न पाहण्याचं पथ्य वगैरे (आई-वडिलांच्या धाकामुळे का होईना,) पाळलेलं. अभ्यासाचं "शिवधनुष्य' पेलताना खांद्याचे पार वांधे झालेले. त्यातून नेमकं फेब्रुवारी का मार्च महिन्यात आत्तेबहिणीचं पुण्यात लग्न ठरलं.

माझ्या म्हातारीची इष्टेट..!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 06/09/2008 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आज ५ सप्टेंबर. शिक्षक दिन! खरं सांगायचं तर आजचा दिवस उजाडल्यापासून, आज ५ सप्टेंबर म्हणजे 'शिक्षक-दिन' आहे इतकीच माहिती मला होती. 'तसे अनेक दिन असतात त्यापैकी हा एक' एवढीच माझी भावना होती. परंतु आजच्या दिनाचं माहात्म्य काय, मोल काय, हे मला समजायला, किंबहुना अनुभवायला संध्याकाळ उजाडावी लागली! अर्थात, अद्याप माझी पिढी तेवढी मुर्दाड बनली नाहीये हेही तितकंच खरं! प्रांजळपणे सांगायचं तर आज सकाळी उठल्यापासून मला माझ्या कोणत्याही शिक्षकाची याद आली नाही, आठवण झाली नाही. परंतु त्याचसोबत हेही तितकंच खरं की 'शिक्षक' नावाच्या माणसावर माझी खूप श्रद्धा आहे.

अचानक छोटेखानी मिपा कट्टा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 04/09/2008 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, कालची बाप्पाची सुट्टी संपली आणि आज आम्ही नेहमीप्रमाणे आमच्या रोजच्या कामधंद्यात गर्क होतो. एका अशिलाच्या हापिसात काही कामानिमित्त बैसलो होतो. तेवढ्यात आमचा भ्र ध्वनी किरकिरला, "तात्या, मी बिपिन. बिपिन कार्यकर्ते. आहेस का खपलास रे? तुला भेटायचंय!" अरे वा! कार्यकर्तेसाहेब आम्हाला भेटू इच्छितात याचा आम्हाला लै आणंद (च्यामारी, मा**व त्या शुदलेखनाच्या!) वाटला.