Skip to main content

भांगेचे प्रयोग आणि परिणाम

लेखक आगाऊ कार्टा यांनी रविवार, 05/10/2008 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
हा मी जरा वेगळा विषय घेतला आहे. आत्तापर्यंत वाघ, साप, भूत असे गंभीर विषयांवर लिहिले. त्यामुळे सर्वांना भिती वाटू लागली.... भांग सर्वांना माहितच असेल. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांचा प्रसाद म्हणून घेतली जाते. मी अजून भांग प्यायलेली नाही. पण या भांगेचे झाड असते आणि भांगेची गोळी दुधात उगाळून ते मिश्रण आटवलेल्या दुधात मिसळतात असे मी ऐकले आहे.... ही भांग म्हणे प्यायलाही खूप चांगली लागते. खरे खोटे प्यायलेल्यांना माहित.असो. तर मुख्य विषय असा की ही भांग जर प्रमाणाबाहेर प्यायली तर चढते... आणि चढली की मग बघायलाच नको... पण भांग चढणे आणि दारु चढणे यात फरक आहे.

चल मेरी वेस्पा..

लेखक देवदत्त यांनी रविवार, 05/10/2008 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
ही माझी स्कूटर. वेस्पा १५०.
जेव्हापासूनच्या गोष्टी आठवू शकतो, आठवतात त्यापैकी ही एक. लहानपणापासून ह्यावर फूटबोर्डवर उभा राहून, मागील सीट वर बसून बाबांसोबत फिरलो. वडिलांच्या बदलीमुळे ह्या स्कूटरनेही वेगवेगळ्या शहरात संचार केला. माझ्या वडिलांना मदत केली. नागपूर-भंडारा-ठाणे-भिवंडी-अंधेरी. वडिलांनी मस्त वापर केला गाडीचा. पण त्यांच्या निधनानंतर बंदच पडून होती.

स्मरण!

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 04/10/2008 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
फुलवा यांच्या "बाकी खरंच काही नाही" या कवितेवरून सुचलेलं हे मुक्तक.... हे विडंबन नाही, स्वतंत्र कविता आहे.... तुझी आठवण मला आता, सारखी काही येत नाही डोळे भरणं दूर राहो, श्वासही अडकत नाही... पावसात भिजतो, ताप येतो, मुकाट गोळ्या खातो मी, तुझ्या गरम लापशीचं स्वप्नसुद्धा पडत नाही.... शाल पांघरून देखील तुझी माया काही मिळत नाही, वीस वर्षे झाली आता काळरात्र आठवत नाही... संसार आहे माझा आता, बाबा नि भावंडं ही पण आई, तुझ्या नसण्यानं, पोरकेपण जात नाही.... एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही....... बाकी खरंऽऽच काही नाही गं......
Taxonomy upgrade extras

अस का?

लेखक mina यांनी शनिवार, 04/10/2008 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र्-मैत्रिणी॑नो आज मी माझा एक अनुभव तुम्हाला सा॑गते..माणसाच्या आयुष्यात नोकरी मिळणे हा अत्यत महत्वाचा क्षण असतो. अन ती मिळविण्यासाठी आपण जीवाचं रान करुन प्रयत्न करतो.तसाच प्रयत्न मी देखील करीत होते. नोकरी मिळ्ण्यासाठी प्रत्यक्ष मुलाखत नावाची अग्निपरिक्षा द्यावीच लागते.अथांत ती आपल्या बुध्दीमत्तेची चाचणी असते.ज्या पदासाठी आपण अज' केला आहे त्या पदाकरीता तुम्ही कितपत योग्य आहात ही पड्ताळणी त्यातुन केली जाते. एकदा मी एका ठिकाणी मुलाखत द्यायला गेले.

माझाही अनुभव...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शनिवार, 04/10/2008 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
बरोब्बर १ वर्षा पूर्वी मला आफ्रिकेला जायचा योग आला. तशी ती माझी आफ्रिकेची पहिलीच ट्रिप असल्याने मी एकदम खुशीत होतो. नैरोबीला राहणार होतो ३ च दिवस पण एक पक्कं ठरवलं होतं काहिही झालं तरी तिथलं झू बघाच्चं म्हणजे बघाच्चंच. काम खरं म्हणजे २ च दिवसाचं होतं आणि तिसरा दिवस विमानची वेळ सोयीची नव्हती म्हणून पदरात पडला होता. म्हणजे सगळं व्यवस्थित जुळून येत होतं. गेल्या गेल्या पहिलं काम काय केलं असेल तर कंपनीच्या ड्रायव्हरला मस्का मारायला सुरुवात केली. नाहीतर आम्हाला टॅक्सी भाड्याने (टारू वाला भाड्या नाही :) ) घेऊन झू वगैरे बघायला जावे लागले असते. ते काही परवडले नसते.

साप मारण्याचा पराक्रम

लेखक आगाऊ कार्टा यांनी शनिवार, 04/10/2008 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम माझ्या अनुभवाला आपण सर्व मिपाकरांनी दिलेल्या प्रतिसादबद्दल मनापासून आभार... हा माझा साप मारण्याचा उपद्व्यापसुद्धा सुट्टीतलाच आहे पण यात आम्ही सगळी भावंडे सहभागी होतो. झालं काय.. आमच्या गावात त्या दिवशी एका घरी लग्न होते. आमचे त्यांच्याशी खूप जुने संबंध होते त्यामुळे आमच्या घरातले सगळे तिकडे गेले होते. आम्ही सगळी भावंडे सुद्धा गेलो होतो पण लग्न जरा लवकर होते आणि जेवायला थोडा वेळ होता म्हणून लग्न लागल्यावर आम्ही घरी धूम ठोकली आणि घरी दडवून ठेवलेला चिवड्याचा डबा शोधायला सुरुवात केली. थोड्यावेळाने मी कशालातरी स्वयंपाकघरात गेलो तेव्हा मांजराचा ओरडण्याचा आवाज ऐकला.

माझा अनुभव

लेखक आगाऊ कार्टा यांनी शुक्रवार, 03/10/2008 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या जीवनातील एक अनुभव लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. चु.भु.दे.घे. हा प्रसंग म्हणजे माझ्या अनेक नसत्या उचापतींपैकी एक आहे. मे महिन्याचे दिवस होते. बारावीची परीक्षा नुकतीच संपली होती. दिवसभर नुसते उंडराणे, कैर्‍या, चिंचा धोंडे मारुन पाडून खाणे आणि गावभर गजाली करत हिंडणे याशिवाय दुसरा उद्योग नव्हता. अशातच एक दिवस बातमी समजली की आमच्या गावाजवळच्या जंगलात एक वाघ आला आहे. माझा भाऊ (अभिनव) सुद्धा तेव्हा आमच्याकडे आला होता. मला ही बातमी समजल्यावर मी अभिनवला म्हटले की आपण वाघ बघायला रात्री जाऊया..... पण यात एक मोठा "पण" होता.

यासुकुनी श्राईन

लेखक सहज यांनी शुक्रवार, 03/10/2008 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
गेली काही वर्ष यासुकुनी श्राईन[समाधी/स्मारक??] हे नाव बातम्यात अधुनमधुन कानावर यायचे, की चीन सरकारने [द. कोरीया, उ. कोरीया देखील] जपानी पंतप्रधान यांनी यासुकुनी श्राईनला भेट दिली म्हणुन कडकडीत निषेध नोंदवला. तेव्हापासुन मला हा यासुकुनी स्मारक नक्की काय प्रकार आहे हे जाणुन घ्यायचे होते. काही मित्रांकडून तसेच आंतरजालावर माहीती मिळाली. त्यात हा दुवा विशेष उल्लेखनीय.