Skip to main content

काळ थांबला कधीचा...

लेखक राघव यांनी गुरुवार, 02/10/2008 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
या दोन्ही कविता मी बर्‍याच आधी लिहिलेल्या आहेत. माझ्या एका जिवलग मित्राच्या मनःस्थितीचे वर्णन पहिल्या कवितेत करण्याचा प्रयत्न मी केलेला. सोबतची दुसरी कविता कदाचित त्या मनःस्थितीतून बाहेरची पडण्याची एक वाट असावी.

अमेरिकेची नवी वाट

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 02/10/2008 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी माझ्या माहितीतले जे लोक अमेरिकेला जात असत ते सगळेजण आधी न्यूयॉर्कला जाऊन तिथून पुढे शिकागो, बोस्टन, फ्लॉरिडा वगैरेकडे कुठे कुठे जात. मला अमेरिकेच्या भूगोलाची माहिती नसल्यामुळे त्याचा कांही संदर्भ लागत नसे. अमेरिकेला जायचे म्हणजे न्यूयॉर्कला जाऊन स्वातंत्र्यदेवीचे दर्शन घेऊनच पुढे जायचे अशी माझी भाबडी समजूत होती. न्यूयॉर्कला जाण्यासाठीसुद्धा दोन टप्प्यात प्रवास करावा लागे. आधी मुंबईहून लंडन, फ्रँकफूर्ट यासरख्या युरोपातल्या एका शहराला जाऊन, तिथे थोडी विश्रांती घेऊन पुढे जाणारे विमान पकडावे लागत असे.

आपापले जग.

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 01/10/2008 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या कोठेतरी गर्भप्रतिबंधित गोळ्या आणि गरबाच्या पार्श्वभूमीवर हे लेखन करत आहे. काल्पनिक वाटले तर तो माझ्या लेखनाचा दोष समजावा. ज्याचे मन तरल आहे त्याने हे वाचण्याचे शक्यतो टाळावे. आता विषय प्रवेश. २५/३० वर्षापूर्वीचा प्रसंग. स्थळ १५००० वस्तीच्या गावातील मित्रांशी गप्पा. अनेक विषयानंतर खालील चर्चेचा प्रसंग. माझा मित्र, अरे आपल्या अमूक अमूक चे लग्न ठरले होते ते माहित आहे ना? मी : हो, माहित आहे. तो : अरे त्याचा काडीमोड झाला. मी : असे कसे? काहीकाळापूर्वीच त्याचे आमंत्रण पाहिले होते.

सलामत हरी राया!!!

लेखक स्वप्ना हसमनीस यांनी बुधवार, 01/10/2008 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
मलेशियासारख्या मुस्लिम राष्ट्रात "हरी राया" हा सण आपल्याकडील दिवाळीसारखा मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा केला जातो. ह्या सणापूर्वी एक महिना अगोदर "रमाधान"महिना सुरु होतो.महिनाभर येथील लोक सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी काहीही खात पीत नाहीत. त्यामुळे दिवसभर शांतता पण संध्याकाळपासून जागोजागी खाण्यापिण्याची तंबूवजा हॉटेल्स माणसांनी खचाखच भरुन वाहत असतात. रमाधानच्या काळात सर्वत्र 'प्रमोसी'(सेल) चालू असतात.लोक भेटवस्तू खरेदी करतात.सकाळ संध्याकाळ प्रार्थना केल्या जातात. कामानिमित्त शहरामध्ये वास्तव्य असलेले लोक,हरी रायाच्या

सार्थक्..(एक मुक्त प्रवाह)

लेखक प्राजु यांनी बुधवार, 01/10/2008 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी अलवार जाग आली.. उठून बाहेर आले. सहज पॅटीओचं दार उघडलं..समोर पसरलेली हिरवळ डोळ्यात साठवत तशीच बसून राहिले त्या खुर्चीवर.. ४ दिवसापूर्वीच तो येऊन गवत छाटून गेला होता आणि आज परत.. एकेक पातं जणू तलवार.. !!!!:) पहाटेनं जाताना बहाणा केला धुक्याचा आणि दवाचं वाण देऊन ती परत निघाली होती..प्रत्येक पातं चांदीच्या कोंदणामध्ये मोती ल्यायला होतं..आणि एकमेकाला विचारत होतं "कोण जास्ती सुंदर आहे रे??" अचानक एखादी वार्‍याची कोवळी झुळूक हळूच येऊन एका गवताच्या टोकदार पात्याच्या कानात फुंकर घालून गेली.. ते पातं आळस देत उठलं आणि तो चांदी मोत्याचा साज उतरवत...

आनंदोत्सव

लेखक जयवी यांनी रविवार, 28/09/2008 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी मन खूप आनंदात असतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनासारख्या घडतात. म्हणजे सकाळी अलार्म कर्कश्श न वाजता..... नाजूक किणकिणतो..... रात्रीच तयारी करुन ठेवल्यामुळे सकाळी अजिबात धावपळ न होता नवरा, मुलं व्यवस्थित ऑफीसात आणि शाळेत जातात. मनासारखा व्यायाम होतो. आरशातली छबी सुद्धा बरीचशी बारीक दिसते. तसं हे एकुलतं एक कारणही ब्रम्हानंद द्यायला पुरेसं असतं ती गोष्ट वेगळी ;) आवडत्या मैत्रिणीचा फ़ोन चांगला तासभर चालतो. "सेल" ची बातमी कळते. झक्कपैकी स्वयंपाक होतो. मनसोक्त आंघोळ होते. टिव्हीवरही आवडते कलाकार मनोरंजन करतात. इतकंच काय तर नव-याचा ऑफिसमधून खास फोनही येतो.

सोलापुरची आणखी एक खासीयत

लेखक पांथस्थ यांनी शनिवार, 27/09/2008 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाजलेले मटण सोलापुरला भाजलेले मटण म्हणुन एक खाद्य प्रकार मिळतो. खाटिका कडुन मटण विकत घ्यायचे. त्याला सांगायचे की भाजुन घेण्यासाठी हवे आहे. म्हणजे तो मटणाचे थोडया वेगळ्या प्रकारे तुकडे करतो आणि चिरा मारुन देतो. बोनलेस पाहिजे असल्यास तसे सांगावे. हे मटण घेउन भाजणार्‍याकडे जायचे. ते लोक मटणाला त्यांचा पारंपारिक घरगुती मसाला लावुन काहि वेळ मुरत ठेवतात (मटणाला चिरा मारल्यामुळे मसाला आतपर्यंत जाण्यास मदत होते - अर्थात खाल्ल्यावर आग किती लागली पाहिजे हे सांगितल्यावर त्यानुसार मसाला लावला जातो).

सोलापुर- छायाचित्रे

लेखक झकासराव यांनी गुरुवार, 25/09/2008 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
मी मध्यंतरी सोलापुरला जाउन आलो. तिथे फिरायला जाण्यासारख एकच ठिकाण आहे. ते म्हणजे सिद्धेश्वर मंदीर. ह्या मंदीराची खासियत म्हणजे हे एका तलावाच्या मध्येच आहे. :) चारी बाजुनी पाणी आणि मध्येच मंदीर. एकदम मस्त वाटत. ही मी काढलेली तिथली काही प्रकाशचित्रे. हा त्या तलावाचा एक व्ह्यु. ह्या तलावात आधी मासे देखील दिसायचे बरेच. आता दिसत नाहीत. बहुद्धा जाळ टाकुन पकडतात. :( हा त्या मंदीरात जायचा रस्ता.

लेकरू

लेखक स्वाती फडणीस यांनी गुरुवार, 25/09/2008 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
लेकरू ======================== ती इतकी निरागस! ती इतकी सुंदर! ती इतकी बोलकी! ती इतकी चंचल! तिच ते खट्याळ हसणं, तिच ते सशावाणी उड्या मारणं, तिच ते फुलपाखरा सारखं कुणाही भोवती भिरभिरणं. तिचं आई बरोबर बोट धरून फिरणं.. तिच देवळात तल्लीन होवून डोलणं.. तिच कुणाला ही आपलंसं करणं... तिच कुणात ही मिसळून जाणं... तिच माझ्या दिशेनं धावत येणं.. माझं घाबरत पुढे सरकणं तिच्या आईच्या डोळ्यात डोकावणारी उदास खंत एकदा बोलली ती माझ्याशी... आता मी आहे. पण माझ्या पुढं? चाळीस पंचेचाळिशीचं लेकरू सांभाळू तरी कसं!! ======================== स्वाती फडणीस ................... ११-०३-२००८
Taxonomy upgrade extras