आमच्या १० वी ची पंचविशी..
आपल्याला क्रिकेटचा विश्वचषक जिंकून जितकी वर्षे झाली ना तितकीच वर्षं आम्हाला १० वीचा चषक जिंकून(की हारून?)झाली.
त्यामुळे पेपराततल्या रौप्यमहोत्सवाच्या बातम्या वाचून आमच्या मित्रमंडळींना आठवण झाली की आपल्या १०वीने पंचविशी गाठली की! मग एकेकाचे विरोप यायला सुरूवात झाली.मागच्या २ ,३ बॅचनी १० वीची पंचविशी कशी कशी साजरी केली त्याची वर्णनं समजायला लागली.
मिसळपाव

लहान मुले करमणूक तर करतातच, पण कधीकधी भयंकर उपद्व्याप करून सळो की पळो करून सोडतात.
माझा भाचा आहे. तो घरात कोणी नसताना ब्लेडने बाहुलीचं नाक कापत होता. नाकावरून ब्लेड सटकून त्याच्या तळहाताला कापलं आणि रक्त यायला लागलं. मग त्याची आई रागवेल म्हणून त्यानी जखमेत फेविकॉल भरला. मग दुसर्या दिवशी पस होउन ठणकायला लागल्यावर बोंबलला आणि त्याच्या आईला सगळा प्रकार कळला!