Skip to main content

उत्सव - वाटेवरील रंग

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 22/10/2008 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
सहा ऋतुंचे सहा सोहळे. पण मला बुवा या न्यु इंग्लंडातली पानगळती (फॉलियेज/फॉल) फार आवडते. उन्हाळा संपून गुलाबी थंडी सुरु होते तसा हिरवा गर्द असणारा निसर्ग रंग पलटू लागतो. उंच-उंच झांडांचे शेंडे पिवळे-लाल पडू लागतात व बघता बघता सगळा परिसर पिवळा धमक व लाल भडक मखमलीने सजून गेलेला असतो. वरमाँट, न्यू हँप्मशरला तर सगळेच जातात. पण दररोज आनंद देणार्‍या कामावर जाताना दिसणार्‍या आजूबाजूंचा झाडांचे कौतुकही करावे म्हणून मी विषेश चित्रे काढली.

दुरून डोंगर साजिरे

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 21/10/2008 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
"बडा घर पोकळ वासा ", "नांव सोनूबाई, हाती कथिलाचा वाळा ", "वरून कीर्तन आंतून तमाशा " अशा "दिसतं तसं नसतं " या अर्थाच्या किंवा जे दिसतं आणि जे असतं यातला विरोधाभास दाखवणार्‍या अनेक म्हणी प्रचारात आहेत. "दुरून डोंगर साजिरे " ही तशीच एक म्हण आहे. या म्हणीचा "जवळ जाता दर्‍या खोरी " हा उत्तरार्ध प्रचलित आहे. त्यातल्या खोल दर्‍या जरी भयावह वाटल्या तरी त्यांची सांगड खोर्‍यांबरोबर कां घालावी? खोर्‍यांमध्ये झुळुझुळू वाहणारे पाण्याचे प्रवाह असतात, त्यांच्या काठाने झाडाझुडुपांचे विश्व बहरलेले असते, त्यांच्या आधाराने विविध प्राणी आणि पक्षी रहात आणि संचार करत असतात.

ती येण्याची चाहूल लागली

लेखक धुमधडाका यांनी शुक्रवार, 17/10/2008 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
थवे फ़ुलले पक्ष्यांची शाळा भरली संध्याकाळ बासरीने गुणगुणली मला ती येण्याची चाहूल लागली पाणी बेभान थिरकले डोंगर संधीप्रकाशाने उजळले दिवसाची घालमेल थबकली मला ती येण्याची चाहूल लागली सृष्टी चैतन्यात चिमुकली झाली अंबरात सांज ऊतू गेली पायवाटांत ओढ भिरभिरली मला ती येण्याची चाहूल लागली मेघ रेशमी गारव्याच्या अंथरुणात उतरले डोळे संध्येच्या पंखांनी झाकले अरुणाने रात्रीला हाक दिली . मला ती येण्याची चाहूल लागली !!!! मला ती येण्याची चाहूल लागली !!!! ---हे वाचलेलं आवडलं अशी जर खरचं आली तर स्वागत करीन धुमधडाक्यात
Taxonomy upgrade extras

इंदौर...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 17/10/2008 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
खोबार सारखं इंदौर पण आमच्यामनातला एक कोपरा अडवून बसलं आहे. लहानपणी इंदौरला जायचा / राहायचा खूप योग आला. १९८३ साली एक दिवस बाबा संध्याकाळी घरी आले ते ही बातमी घेऊनच की त्यांची बदली इंदौरला झाली आहे आणि आई बाबा आणि माझी ताई असे इंदौरला जाणार. माझे शिक्षणाचे महत्वाचे वर्ष असल्याने मी काही जाणार नव्हतो. मला फक्त दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत इंदौरला जायला मिळणार होतं. त्यानिमित्ताने, इंदौरला भरपूर येणंजाणं झालं. तो पर्यंत मुंबई एके मुंबई करणार्‍या आम्हाला इंदौर एक स्वर्गच वाटायला लागला होता. माझ्या (किंबहुना आमच्या सर्वांच्याच) आयुष्यातला तो एक खूपच सुंदर काळ आहे.

तुझ्याशिवाय

लेखक धुमधडाका यांनी गुरुवार, 16/10/2008 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्याशिवाय माझं आयुष्य वजा तू फक्त एक शून्य तुझ्याशिवाय जगणं मी जगणं समजतचं नाही प्रत्येक पावलागणिक तुझा विचार असतो तू नाहीस ही कल्पनाच मी करत नाही. तुझ्याशिवाय जगणं मी जगणं समजतचं नाही मी खूप भांडतो तुझ्याशी पण त्याच्या कित्येक पटीने प्रेम करतो तुझ्यावर नकळत दुःखवले जातो आपण मी मुद्दाम तसं करत नाही तुझ्याशिवाय जगणं मी जगणं समजतच नाही मला ही आयुष्याची वाट चालायचीय अजून पण तू हवीस तू नसशील तर मला हे चालणेच नकोय देवाकडे दुसरं काही मागत मी नाही तुझ्याशिवाय जगणं मी जगणं समजत नाही. ----हे वाचलेलं आणि अनुभवलेलं. आपला धुमधडाका
Taxonomy upgrade extras

ती

लेखक हर्षदा विनया यांनी गुरुवार, 16/10/2008 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
ती तशी अनोळखी, कारण तिचं नावही माहीत नाही मला !! पण मनात रूतून राहीली ती कूठेतरी.. आता poverty वर लिहायला घेतले आणि ती परत आठवली.. ती.. मी शाळेतून ज्या रस्त्याने यायचे, त्या रस्त्यात एक मैदान लागायचे, तिथे कधी मधे वर्षातून एखादा कार्यक्रम झाला तर व्हायचा! बाकी मात्र झोपड्यांचे प्रस्थान.. तिथेच दिसायची ती.. ती.. काळ्या कूळकूळीत रंगाची, पण विशेष चमकदार डॊळे !

बिघडलीये काच!

लेखक नीधप यांनी बुधवार, 15/10/2008 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीची काच बिघडलीये. दोन प्रतिबिंबं दिसतात हल्ली. एक साधंच एक डोळे वटारणारं. चोरून आणलेल्या चांदीच्या देवाच्या डोळ्यांसारखे माझेच डोळे काचेत बसून रहातात. मी आक्रसत रहाते स्वतःला. त्याचा फोन.. एखादी धुंद आठवण.. एक गम्मतनाच.. जुनेपाने कपडे घालून वावर.. देहामनाची तगमग... सगळं सगळं त्या डोळ्यात टिपलं जातं. मी आक्रसत रहाते.. चांदीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात खरंच बिघडलीये ही काच बदलली पाहिजे! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
Taxonomy upgrade extras

माझ्या हिंदीचा बोलु कवतिके

लेखक भोचक यांनी बुधवार, 15/10/2008 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला हिंदी चांगलं कळतं असं मराठी माणसाला उगाचच वाटत असतं. म्हणजे त्यात थोडं तथ्य नक्कीच आहे. अहिंदी भाषिकांमध्ये मराठी लोकांनाच हिंदी जास्त चांगली कळते आणि बोलताही येते. पण म्हणून आपण आपली संपूर्ण अभिव्यक्ती त्या भाषेत करू शकतो असं नाही. आता हा अनुभव महाराष्ट्रात तितका येणार नाही. पण उत्तरेकडे गेल्यानंतर अनेकदा हिंदी चांगली समजत असूनही अनेकदा आपला 'मोरू' होतो. इंदूरमध्ये सुरवातीला आल्यानंतर हिंदीत संवाद साधणं काही कठीण नाही, अशीच भावना होती. पण काही दिवसात आपोआपच विकेट पडायला सुरवात झाली. बायकोने एकदा तूप आणायला लावलं. इथे दुध-दुभतं भरपूर. त्यामुळे त्याची दुकानही बरीच.

आपल कोल्हापुर

लेखक झकासराव यांनी बुधवार, 15/10/2008 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, कोणी जर कोल्हापुरला फिरायला जात असेल तर त्याला काय काय बघाव ह्याची लिमिटेड लिस्ट माहिती असते. ह्यातच जर अजुन काहि भटकंती करणार्‍या लोकाना फार प्रसिद्ध नसलेल्या जागांविषयी माहिती कशी द्यावी?? किंवा मला तरी सगळ्या कोल्हापुरतील जागा माहित आहेत का?? मी प्राथमिक शाळेत असताना आमची एका दिवसाची सहल जात असे. अशा सहलीत मी कात्यायनी, खिद्रापुर अशा फारशा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणी देखील जावुन आलो आहे. ही ठिकाण बाहेरच्या (कोल्हापुरच्या बाहेरच्या लोकाना जे तिकडे पर्यटनाला येतात) कोणालाच विशेष माहिती नसतात. मग त्याची माहिती कशी मिळेल. आपल्याकडच्या पर्यटन खात्याबद्दल काहि न बोललेलच बर.

प्रिय कोकिळा

लेखक शर्मीला यांनी मंगळवार, 14/10/2008 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय कोकिळा :SS रंग नाही , रुप नाही नाही पक्षाची राणी तरी अमुल्य ठेवा आहे तुझियाकडे ज्याने तु प्रसिध्द आहे ठायी-ठायी तुझिया गाणे ऐकताना थोरा-मोठ्या सर्वाचं भान हरपून जायी रंग रुप यांवर मिरवणे अशी आहे रित जगाची पण गुण-हुशारी यावर जग आधारित तु आहेस आदर्श याचा एक सामान्य असली तरी नाव कमावलसं मला व्हायचयं तुझ्यासारखं रंग नसला - रुप नसले तरी नाव कमावलसं मला व्हायचयं तुझ्यासारखं..........
Taxonomy upgrade extras