भांगेचे प्रयोग आणि परिणाम
हा मी जरा वेगळा विषय घेतला आहे. आत्तापर्यंत वाघ, साप, भूत असे गंभीर विषयांवर लिहिले. त्यामुळे सर्वांना भिती वाटू लागली....
भांग सर्वांना माहितच असेल. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांचा प्रसाद म्हणून घेतली जाते.
मी अजून भांग प्यायलेली नाही. पण या भांगेचे झाड असते आणि भांगेची गोळी दुधात उगाळून ते मिश्रण आटवलेल्या दुधात मिसळतात असे मी ऐकले आहे....
ही भांग म्हणे प्यायलाही खूप चांगली लागते. खरे खोटे प्यायलेल्यांना माहित.असो. तर मुख्य विषय असा की ही भांग जर प्रमाणाबाहेर प्यायली तर चढते...
आणि चढली की मग बघायलाच नको... पण भांग चढणे आणि दारु चढणे यात फरक आहे. दारु चढल्यावर माणसाचे नियंत्रण सुटते. तो वाट्टेल ते बरळायला लागतो, चालताना भेलकांडायला लागतो, गटारात ओकतो आणि त्यातच लोळत झोपी जातो. भांग चढल्यावर यापैकी काहीच होत नाही. काय होते ते पुढील किश्शात कळेलच...
का किस्सा मला बाबांनी कधीतरी बोलता बोलता सांगितला आहे.....
सुमारे तीस ते पस्तीस वर्षांपुर्वी, बाबा त्यावेळी कॉलेजला रत्नागिरीला होते आणि बाबांचे तिघे मित्र मुंबईत शिकायला राहिले होते. त्या मित्रांचे हे उपद्व्याप आहेत.
त्या दिवशी महाशिवरात्र होती आणि या तिघांना त्यांच्या मित्रांनी रात्री भांग प्यायला बोलावले होते. त्याप्रमाणे हे सगळे रात्री गेले. आटवलेले गोड दूधातली भांग ती... मग काय विचारता, गोड लागते म्हणून सगळे दणकावून प्यायले. नंतर थोड्या गप्पागोष्टी करुन सुमारे दहा वाजता सगळे आपल्या खोलीवर परत आले. त्यातला एकजण पार्टटाईम रात्रीची नोकरी करत असे. तो सायकल घेऊन दादर स्टेशनला जात असे व तिथे सायकल ठेऊन लोकल ट्रेन ने पुढे जात असे. त्या तिघांनाही भांगेबद्दल फारशी महिती नव्हती पण भांग चढते हे माहिती होते. म्हणून तिघेही खोलीवर आल्यावर थोडावेळ तसेच बसले पण कोणालाही काही फरक जाणवला नाही. त्यामुळे भांग चढते हे खोटे आहे असा लगेच निष्कर्ष काढून मोकळे झाले. त्यातला एक जण जो नोकरी करत असे तो सायकल घेऊन निघाला आणि बकीचे दोघे आपआपल्या पलंगांवर आडवे झाले....
अशीच पाच-दहा मिनिटे गेली. एव्हाना सगळ्यांना चढायला सुरुवात झाली होती. थोड्यावेळाने तो गेलेला मित्र तंबाखूची पुडी विसरली म्हणून परत आला. परत आल्यावर बघतो तर एकजण नाट्यसंगीत आपल्या सुमधूर (?) आवाजात गात बसला होता. आणि दुसरा आडवा राहून आपले हात असे वर करुन काहीतरी तोलून धरावे तसा पडला होता....
परत आलेल्या त्या मित्राने आपली तंबाखूची मळी लावली आणि म्हणाला, "काय रे साल्यानो? भांग चढली की काय"? ......
तो आडवा पडलेला मित्र म्हणाला, "छे! छे! अजिबात नाही".....
"मग तू हात असे वर का केले आहेस?" तो तंबाखू मळता मळता म्हणाला..
"अरे हे छप्पर सारखं खाली खाली येत आहे म्हणून हाताने सारखा वर ढकलतो आहे."
थोड्यावेळाने तंबाखूवाला मित्र निघून गेला आणि पुन्हा पाच दहा मिनिटांनी परत आला. इकडे यांचे आपले चालूच. एक जण तीच तीच नाट्यपदाची ओळ पुन्हा पुन्हा म्हणतोय आणि दुसरा सारखा छप्पर वर ढकलतो आहे...
गाण्याचा कर्कश आवाज अगदी असह्य झाल्यावर उरलेल्या दोघांनी त्या गाणार्याला दाबून झोपवले आणि रुमालाने त्याचे तोंड जाम बांधून टाकले....
तंबाखूवाला मित्र निघून गेला आणि या गायकाने रुमाल सोडून टाकला आणि तो पुन्हा ताज्या दमाने गाऊ लागला....
तो गेलेला मित्र थोड्यावेळाने पुन्हा परत आला. शेवटी या छप्पर ढकलणार्या मित्राने छप्पर सावरून धरत त्याला विचारले, "अरे तू जातोस पुन्हा परत येतोस पुन्हा जातोस.. हा प्रकार तरी काय"?
तो म्हणाला, "फार मोठ्ठा घोटाळा झाला आहे".
"असं झालय तरी काय"?
"अरे कसं सांगू तुला? मि मघाशी दादर स्टेशन वर गेलो होतो आणि पाहतो तर काय....."?
"काय?"..
"अरे अख्खं दादर स्टेशनच गायब झाले आहे. मी आजूबाजूला शोधून पहिले पण मिळालेच नाही म्हणून शेवटी परत आलो".
"मग आता तुला काही जाता येणार नाही, तेव्हा तू आता इथेच बस."
एव्हढे बोलणे झाल्यावर त्या तंबाखू मळणार्याने पुन्हा तंबाखू मळायला सुरूवात केली.
नंतर तो सारखा तंबाखूच मळत होता. मळलेला तंबाखू पुन्हा मळत होता...
आणि बाकी दोघांचा छप्पर ढकलण्याचा आणि गाण्याचा कार्यक्रम चालूच होता तो सुमारे पहाटे पर्यंत...
पहाटे केव्हातरी सगळ्यांना झोप लागली....
..
....
अजूनही काही छान छान किस्से आहेत... वेळ मिळाला की टाकतोच...
तुम्हालाही असे काही किस्से माहित असले तर येथे टाका...
वाचायला मजा येईल...
वाचने
9980
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
अजून
हे घ्या किस्से
तेचतेच करण्याचा सदुपयोग
In reply to तेचतेच करण्याचा सदुपयोग by धनंजय
जबरदस्त... आ
In reply to जबरदस्त... आ by बिपिन कार्यकर्ते
अर्रे वा .. हे तर मस्तच आहे ..
In reply to अर्रे वा .. हे तर मस्तच आहे .. by टारझन
कोनमिती
In reply to अर्रे वा .. हे तर मस्तच आहे .. by टारझन
अनुभव
येऊ द्यात
In reply to येऊ द्यात by विसोबा खेचर
झकास
साली
आमचा ही किस्सा
मी बरीच
माझ्या
मजा आली..
यू टू देवकाका ?
वरचे सगळे
नाम्या झंगाट -भांगी
जबराट रे कार्ट्या!
In reply to जबराट रे कार्ट्या! by चतुरंग
रंगाशेठ,
In reply to रंगाशेठ, by बिपिन कार्यकर्ते
होय बिपिनराव, बंडखोर बंडूने
भन्नाट !
In reply to भन्नाट ! by मुक्तसुनीत
घरपोच...
हाहाहा..
जबरा
हेहे काय