Skip to main content

जिथे सागरा धरणी मिळते........

लेखक JAGOMOHANPYARE यांनी गुरुवार, 15/10/2009 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
'व्हाय डोन्ट यू गो टू विजिट द सबमरिन?' डॉ. नवीनने विचारले. 'सबमरिन? मालदिव में सबमरिन है?' डॉ. अनिल. 'तिथे आहे.... ' डॉ. नविनने खिडकीतून बाहेर दाखवले.. समुद्रात दूर अंतरावर एक पांढरी बोट दिसत होती. इन्दिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून समुद्र फार देखणा दिसतो. मी मुंडके खाली वळवले आणि मुकाटपणे चहा पिऊ लागलो. मालदीवमध्ये चार महिने राहूनही इथे २०० फुटांवर पाण्यात एक सबमरिन आहे हे मला पहिल्यांदाच समजत होते! शनिवारचा दिवस म्हणजे मालदीवमधील सुट्टीचा दिवस. माझा मित्र डॉ. अनिल मगदूम भारतात परत जाणार असल्यामुळे मला भेटायला मालेमध्ये आला होता. तिथूनच तो कोचीला जाणार होता.

कामशेत - बेडसे लेणी - भातराशी... डोंगररांगेच्या माथ्यावरुन...

लेखक विमुक्त यांनी मंगळवार, 13/10/2009 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
भाजे, कार्ला, कोंडाणे आणि बेडसे ही सर्व लेणी साधारण 1st cent. B.C. कालखंडातली आहेत. ह्यापैकी फक्त बेडसे लेणी बघायची राहिली होती. एकच दिवस भटकायला मिळणार होता; म्हणून येत्या रवीवारी बेडसे लेणी बघायचं ठरवलं. लेण्यापर्यंत चाललोच आहोत तर त्याच्या मागचा भातराशीचा डॊंगरपण बघुयात असा विचार डोक्यात आला. कामशेतहून टमटमने लेण्यापर्यंत जाता येतं, पण त्यात काय मजा नाही. मग कसं जायचं? विसापुर किल्यापासून एक डोंगररांग कामशेतच्या रेल्वे स्टेशन पर्यंत आली आहे. ह्याच डोंगररांगेवर बेडसे लेणी आणि भातराशी आहे. लोकलने कामशेतला उतरायचं... डोंगररांगेच्या माथ्यावरुन चालतं बेडसे लेणी गाठायची...

मायेसाठी काहीही!

लेखक वेदश्री यांनी मंगळवार, 13/10/2009 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी आईबाबांसारखीच माया करणार्‍या मॅथ्यूंच्या घरात घुसले की माझी अखंड टकळी सुरू होऊन जाते आजकाल. रोज धावतपळत का होईना पण किमान एक चक्कर तरी मारायचीच ५-१० मिनिटाचीतरी असा अलिखित नियमच झालाय माझा. माझी त्यांना आणि त्यांची मला खूपच सवय झाली आहे आता. त्यांना त्यांच्या तब्ब्येतीच्या असंख्य प्रश्नांमुळे घराबाहेर पडता येत नाही आणि मला कामानिमित्त हापिसात जावे लागत असल्याने घरात रहायला वेळ मिळत नाही. असे असल्यानेच की काय.. त्यांची बाहेरची कामे मी करायची आणि माझी घरातली काही कामे करण्यात त्यांनी मला मदत करायची, हे अगदी न सांगता आपोआपच जमून आले आहे.

अजुन एक प्रवास - भ्रमण

लेखक हर्षद आनंदी यांनी बुधवार, 07/10/2009 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
हुश्श्य ..... सुटलो बुवा!! एस. टी तुन उतरुन खिळखिळे झालेले अवयव आळोखे-पिळोखे देत जागेवर असल्याची खात्री करुन घेतली आणि बघतो तर काय, च्यामारी, हा हॉटेलवाला कुठे चालला? "ओ भाऊ, जरा चहा मिळेल का?"इति मी, "च्यॅक, बंद केलं म्या" त्याने हातभर मान हलवत नकार दिला, "आनि, तुमी कुठं चाल्ला हो, ह्या वक्ताला?, गडावर की काय?" म्हणत भुवया वाकड्या केल्या. आम्ही न बोलताच मान हलविली आणि गावात जायला निघालो. धा-पाच पावले पुढे जाऊन, एका बाप्याला विचारले, "गडावर जायला रस्ता कोठुन?" प्रश्नासोबत, त्याच्याही चेहर्‍यावर आश्चर्य आणि मित्रांच्या चेहर्‍यावर आठ्या एकत्रितपणे जन्माला आल्या.

ज्यूरी ड्यूटी

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 03/10/2009 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
"पंचांचा निकाल काहीही असो, मी निरपराधी आहे असेच माझे मत आहे. या जगाचे नियमन करणारी.........", लोकमान्य टिळक. लहान असतांना मराठी दुसरीत गेलेली ही वाक्यं!!!! मला नेहमी प्रश्न पडत असे की जर लोकमान्य टिळकांना पंचाचा निकाल मान्य नाही तर ते टॉवेल का नाही वापरत? बाबांना हा प्रश्न विचारला तर त्यांनी हसून सांगितलं की ए येड्या, इथे पंचा म्हणजे अंग पुसायचा नाही तर पंच म्हणजे ज्यूरी...... मी लगेच बाबांना म्हटलं की मला ही ज्यूरी दाखवाच... पण स्वतंत्र भारतात जन्म झाल्यामुळे ही ज्यूरी पहाणं माझ्या नशिबी नव्हतं.

valley of flowers in india

लेखक jaypal यांनी गुरुवार, 01/10/2009 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
3