Skip to main content

गौराई आली माझ्या घरा...

लेखक नाटक्या यांनी मंगळवार, 08/09/2009 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
गौराई कोणाच्या पावलाने आली? 'गौराई सोन्याच्या पावलांनी आली..". गौराई कोणाच्या पावलांनी आली? "गौराई मोतियाच्या पावलांनी आली.." अशा गजरात, चांदीच्या ताटात गौराईचे आमच्या घरात आगमन झाले. गौराई घरी येणार म्हणून आम्ही आरास केली होती. घरात करंज्या/पापड्या करून ठेवले होते. दारात सुबक रांगोळी काढली होती, दाराला तोरण लावलं होतं. दारात लक्ष्मीची पावलं हळदी-कुंकवाने काढली होती. अमेरिकेत घरात सगळीकडे कार्पेट असल्यामुळे घरात मात्र पावलं काढता आली नाहीत. कुळाचाराप्रमाणे चांदीच्या ताटातून गौरीचे मुखवटे घेऊन सौ. घरात आली. दारात हळदी-कुंकू/अक्षता वाहून ओवाळलं. दुधाने पाद्यपुजा केली, भाकर-तुकडा ओवाळून टाकला.

माझे जगावेगळे छंद-२

लेखक पाऊसवेडी यांनी सोमवार, 07/09/2009 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
एका रविवारी माझ्या साप पकडण्याची सुरुवात होणार हे एकदाचे ठरले आणि मग त्या रविवार पासून दर रविवारी खूप छानआणि खुंपच वेगेळे म्हणजे जे मला वाटत होते त्यापेक्षा वेगेळे अनुभव आले त्यातलेच मी काही मी तुम्हाला सागणार आहे पहिल्याच दिवशी मी गेले होते तेव्हा मला सापाचा स्पर्श कल्पनेतच होता कारण याआधी मी कधीही सापाला हात लावला नव्हता. पहिल्या दिवशी सगळ्याच लोकांनी लीम्बुतीम्बुची (पक्षी:माझी) मनसोक्त मजा केली. हे कोण नवीन ?? साप पकडायला शिकायचंय का??

राजजींच्या 'रोखठोकनाम्या'ची 'ब्ल्यू प्रिंट'

लेखक भोचक यांनी गुरुवार, 03/09/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा घेऊन पुढे निघालेले तेजतर्रार नेते, मराठी माणसाची बुलंद तोफ, उत्तर भारतीयांचे निर्दालक, हिंदीनिर्मूलक श्रीमान राजजी ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' नामक संघटनेने गत काही दिवसांत तमाम मराठीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुराणकाली राक्षस ही संज्ञा वापरली जायची, तद्वतच हल्ली महाराष्ट्र देशी 'भय्या' ही संज्ञा जवळपास त्याच अर्थी वापरली जात आहे. तर सांगायचे असे की या भय्या मंडळींचे महाराष्ट्र देशीची राजधानी मुंबई व इतर नगरांत वर्चस्व वाढू लागल्याचे राज यांच्या चाणाक्ष चष्म्याने टिपले आणि नवनिर्माण बाजूला ठेवोन त्यांनी 'झाडाझडती' हाती घेतली.

अलीकडचे "चिडके बिब्बे" ऑस्ट्रेलियन खेळाडू

लेखक पारंबीचा भापू यांनी गुरुवार, 03/09/2009 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
हे माझे पहिले-वहिले लेखन आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे! ================================================ क्रिकेटची गोडी मला लागली १९६० पासून. त्यावेळी इंग्लंडचे कप्तान होते लेन हटन व नंतर पीटर मे, ऑस्ट्रेलियाचे होते हॅसेट् व रिची बेनो, पाकिस्तानचा करदार, वेस्ट इंडीजचे वॉरेल वगैरे. भारताचे कप्तान सारखे बदलायचे, कधी पॉली उम्रीगर, कधी बुधी रामचंद कधी अमरनाथ वगैरे. आपण क्वचितच जिंकत असू, त्यामुळे भारताच्या विजयाची अशी मनात जिद्द वाटायची नाहीं, पण ऍशेस् सीरीजकडे मात्र खूप लक्ष असायचं. इंग्लंडने आपल्यावर राज्य केलं म्हणून असेल, पण ऍशेस् सीरीजबाबत ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकावी असे मनोमनी वाटायचे.

नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली असती - तमिल जाणकार मिळत नाही हो

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 03/09/2009 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय वाचक, अंनिसवाले पळपुटे आहेत असे आपणास वाटत असेल तर आपण वर्तमानपत्रातून वाचा फोडा. एक सल्ला. अहो, मी कशाला वर्तमानपत्रांकडे धाव घेऊ, जे लाखो रुपयांचे वर्तमानपत्रातून जाहीर आव्हान देतात त्यांची कशी केविलवाणी अवस्था होते ते आपण नुसते एक पत्रातून वाचलेत. अदितीबाईंना तर हे लिखाण अत्यंत जहरी वाटले. अंनिसवाले याहीपेक्षा अत्यंत हीन शब्दात नाडीग्रंथांवर व अनुषंगाने माझ्यावर व अन्य नाडी ग्रंथप्रेमींवर टीका टिप्पणी करतात. याची अदितींना कल्पना नाही. त्यांची एकएक पत्रे व लेख आपण वाचावेत. आपण माझ्या चिकाटीचे कौतुक केलेत, ठीक आहे.

क्विक गन मुरूगन -माईंड ईट

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 01/09/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
क्विक गन मुरूगन हा एक ईंडियन काऊबॉय असतो ज्याचा जिवनाचा उद्देश हा गाईंना वाचवण्याचा असतो. क्विक गन मुरूगन ची लॉकेट लव्हर ही गेल्या जन्मीची प्रेयसी असते. राईसप्लेट रेड्डी हा गाईंना मारून त्यांना डोशात घालून सगळे व्हेज हॉटेल नॉन व्हेज करण्याचा त्याचा डाव असतो. क्विक गन मुरूगनला राईसप्लेट रेड्डी मारतो. मुरूगन स्वर्गात जातो. चित्रगुप्ताकडे तो गाईंना वाचवण्यासाठी पुन्हा प्रूत्थीवर जाण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन करतो. तो नंतर परत मुबंईला येतो. राईसप्लेट रेड्डी ईकडे डोसा बनवण्यासाठी मॅक डोसा नावाची कंपनी टाकतो. त्यात डोशाची आर अँन्ड डी स्थापन करून सायंटीस्ट लोकांना नोकरीला ठेवतो.

पश्चिमेचा गार वारा

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी रविवार, 30/08/2009 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस किती पटापट निघून जातात! नाही? इथे पिलाणीला येऊन महिना होत आला, कळलंसुद्धा नाही. सध्याच्या काळात इथे प्रचंड उकडतं. हवामानशास्त्रीय भाषेत बोलायचं, तर वातावरण उष्ण आहे आणि हवेत आर्द्रता आहे. त्यामुळे दुपारी अर्ध्या मिनिटासाठी जरी पंखा बंद झाला, तरी "घर्मस्नान" घडतं. आज मात्र रोजच्यापेक्षा थोडं थंड वाटलं. इथली सवय झाल्यामुळेही असेल कदाचित. संध्याकाळी घरी आल्यावर सगळ्या खिडक्या उघडल्या तेव्हा मस्त गार वारा अंगावर आला. तसा तो रोजच येतो. पण आज तो जाणवला. अमेरिकेत माझ्या घरातल्या स्वयंपाकघराचं दार उघडं ठेवल्यावर असाच वारा यायचा पश्चिमेकडून. दोन महिन्यांपूर्वी मी अमेरिकेच्या घरातच होतो.