Skip to main content

मी कात टाकली

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 09/11/2009 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
(वैधानिक इशारा ः हा लेख म्हणजे हाताला झालेल्या इजेबाबतचा हलक्‍याफुलक्‍या शब्दांतील वर्णन आहे. कमकुवत हृदयाच्या वाचकांनी कृपया तो वाचण्याचं धाडस करू नये!) कोणतीही गोष्ट साधी, सरळ, सुव्यवस्थित होता कामा नये, हा माझ्या जीवनाचा दंडक आहे. काहितरी खुसपट, अडचण, समस्या त्यात निर्माण झालीच पाहिजे. त्यानंतरच ते काम पूर्ण व्हायला हवं. मी स्वखुशीनं स्वीकारलेला नव्हे, तर नशीबानं/दैवानं/देवानं किंवा जगण्यानं म्हणा, माझ्यावर लादलेला हा नियम आहे. बऱ्याच दिवसांत तसं काही झालं नव्हतं. यंदाची दिवाळी व्यवस्थित पार पडत होती. शेवटचा दिवस होता.

आठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई

लेखक दिपक यांनी सोमवार, 09/11/2009 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
काल पु.लंची जंयती आणि त्याच्या एक दिवस आधी सुनीताबाईंच्या जाण्याने अवघे साहित्यविश्व हळहळले. वरुन कडक शिस्तीच्या आणि करारी व्यक्तिमत्वाच्या पण आतुन मृदू स्वभावाच्या सुनीताबाई ‘आहे मनोहर तरी...’ नंतर केवळ पुलंच्या पत्नी म्हणून नव्हे तर एक उत्तम सिद्धहस्त लेखिका म्हणून साहित्यविश्वाला समजल्या. पु.लंच्या जडणघडणीतही त्यांचा वाटा मोठा आहे. आम्हा वाचकांना पु.ल. आणि सुनिताबाई त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातुन आणि थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या आठवणीतून उमजले, भावले.

अपेक्षित तरीही असामान्य.

लेखक मीनल यांनी सोमवार, 09/11/2009 06:52 या दिवशी प्रकाशित केले.
"मोहन बर्वे परत येतोय अस ऐकल". "हो का? ऐकाव ते नवलच!" "येईल तेव्हा खर!" "एकदा अमेरिकेला कुणी गेल की ती स्वप्ननगरी सोडण कठीण". अशी कुजबूज बर्वेंच्या भारतात राहणा-या मित्रपरिवारात, नातेवाईकांमधे सुरू झाली होती. पण ती बंद व्हायच्या आत मोहन पोचला की त्याच्या पुण्याच्या घरी ! पुण! जिथ तो जन्मला, शाळेत गेला, लहानाचा मोठा झाला आणि मग तिथूनच उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. पुण सोडून अमेरिकेत गेल्यावर मोहनने तिथल शिक्षण सुरू केल. पुढे अजून शिकला, नोकरी सुरू केली. लगेचच भारतात येउन मोहन राधिकाशी विवाहबध्द झाला आणि तिच्यासह पुन्हा अमेरिकेत परतला.

विकांत - मालवण (तारकर्ली).....

लेखक नाम्या झंगाट यांनी गुरुवार, 05/11/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो, येणा-या विकांतासाठी हापिसच्या गँग सोबत मालवण (तारकर्ली) येथे जाण्याचे प्रयोजन केले आहे. फिरस्त्यांना मालवण (तारकर्ली) बाबतचे (मार्ग, रहण्याची व जेवणाची सोय, कुठे-कुठे आणी कोणते ठिकाणी भेट दिली पाहिजे इत्यादि... )आपले अनूभव, सुचना, शिफारस "शेअर" करण्याची नम्र विनंती..... कळावे, लोभ असावा नाम्या झंगाट

गाडी रूळावरून सांधे बदलून जाते तेंव्हा..

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 04/11/2009 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरचा लतादीदींवरचा लेख वाचल्यानंतर डोक्यात घुसलेलं 'जो वादा किया वो' आज सकाळी गुणगुणत होतो (बाथरूम मध्ये, दुसरीकडे कुठे आमची हिंमत असायला), आवरून बाहेर गाडीकडे जात असतांना गाण्याच्या शब्दांचं शिटीत रूपांतर झालेलं. गाडी सुरू केली आणि मग पुन्हा (काचा बंद आहेत हे subconsciously लक्षात येऊन!) शिटीवरून पुन्हा शाब्दिक गाण्यावर. फ्रीवेवर गेल्यावर लक्षात आलं की आपण भलतंच गाणं गातोय आता ... 'ये दिल और उनकी निगाहोंके साये...' च्या मारी! हे गाणं कुठून आलं?

लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 03/11/2009 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक आज आपण एका सायकलपटू असलेल्या सामाजसेवकाला भेटणार आहोत. नाव आहे लक्ष्मण यादव अहिरे. त्यांनी सायकलवर भारतभ्रमण केले आहे. ते वयाच्या ७१ व्या वर्षी अजूनही सायकलवरून नशिक उजैन अशी स्वारी करू शकतात. आजही पुढील महीन्यात आपला ७२ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर सायकलवरून 'इंधन बचाओ' हा संदेश घेवून भ्रमण करण्यास ते निघणार आहेत.

याहु अकाउन्ट

लेखक पर्नल नेने मराठे यांनी रविवार, 01/11/2009 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, परवा रात्री मी याहु लॉगिन केले. काल सकाळी येउन परत लॉगिन करण्याचा प्रयत्न केला तर पासवर्ड चालत नाहिये असा मेसेज येतोय. मी customer care ला तक्रार नोन्दवीली आहे.alternate id वर रिप्लायची वाट पहात आहे. मी गुगलवर जाउन सर्च केले तर बर्याच लोकाना असा अनुभव आला आहे. माझ्या काही मैत्रीणीचे असे म्हणणे आहे कि माझे याहु अकाउन्ट /आयडी डिअ‍ॅक्टिवेट झाला. डिअ‍ॅक्टिवेट असेल तर बरे होइल कारण बरिच परर्सन्ल माहिती त्यात आहे जसे स्कॅन्ड कॉपीज(पासपोर्ट, पॅन,सर्टीफिकेट्स) म्युचुअल फन्द्स ऑनलाइन स्टेटमेन्ट्स. पण जर हॅक झाला असेल तर कठिण आहे, दुरुपयोग होउ शकतो.

अपुर्णता, निमित्त, भोगवादी पात्रं आणि मिसळ-नोंदी.

लेखक Nile यांनी गुरुवार, 29/10/2009 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
अपुर्णता: पुर्ण आहोतच अश्या भावनेने जेव्हा मनुष्य वावरतो तेव्हाच तो अपुर्णता सिद्ध करत असतो. निमित्तः जेव्हा गरज नसते तेव्हाही जे आपले अस्तित्व दाखवते ते निमित्त. भोगः भोगायचंच म्हणल्यावर वाट्टेल ते भोगता येतं. पात्रं: वरील पात्रं लेखकाच्या कल्पनेचा विलास आहेत वास्तव्याशी साम्य आढळल्यास दोष मराठी संकेतस्थळ या संकल्पनेला द्यावा. मिसळ: वरील सगळ्यांची मिसळ चाखलीच पाहीजे असं नाही. (क्रमशः)

सूर्यास्ता नंतर...

लेखक अभिजा यांनी सोमवार, 26/10/2009 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
हाजीअली जवळून टिपलेले सूर्यास्ता नंतरचे रंगतरंग...

लाडकी लेक

लेखक वेदश्री यांनी सोमवार, 26/10/2009 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो, ऐकलंत का? फीचे पैसे कधी मिळणार तुमचे? तुमच्या लाडक्या लेकीला एकही धडका ड्रेस नाही.. तो घ्यायचाय आणि जरा भाजीही आणायची होती." "आली होती पण खर्च झाली. आईला एमटी केलेत पैसे." "खर्च झाली???!!! आईंना आत्ता गेल्याच महिन्यात तर एमटी केलेलीत ना तुम्ही मग आता परत?" "भाऊला लागत होते हातऊसने.." "बास्स.. त्यांच्या उधळपट्टीला ठिगळे लावायला पैसे आहेत पण पोरांना कपडे घ्यायला नाहीत पैसे.. इतक्या दिवसांनी आलेली ती मेली फी, तीही टाकलीत देऊन आणि परत म्हणा मीच कर्कशा म्हणून.." "माझ्याकडे नाहीयेत आत्ता अजिबात पैसे. कडधान्यं कर काही दिवस." "बाबा, आईला का त्रास देता तुम्ही?