बाबा नवाथे!
तसे बाबा नवाथे जॉली होते. वयस्करच होते. ८० प्लस म्हणा ना! अलिकडेच वारले!
सोसायटीत सर्वांशी तसे मिळून मिसळून वागायचे. गच्चीत जायच्या जिन्यावर नेहमी बसलेले असायचे. पण सोसायटीतलं पब्लिक नेहमी त्याची थट्टा-मस्करीच करायचं. आणि ती करताना बर्याचदा त्यांच्या वयाचा मुलाहिजा राखला जात नसे. पण बाबा नवाथे कधी कुणावर रागावायचे नाहीत! पुढे पुढे तर लोकं त्या म्हातार्याची जास्तच भंकस करू लागले, टेर उडवू लागले.
नाही, तसं बाबांचही चुकायचं. म्हातार्याला बसण्या-उठण्याची जराही आदब नसे. उघडेबंब, आत लंगोट नसलेली चट्टेरीपट्टेरी हाफ चड्डी घालून बघावं तेव्हा म्हातारा गच्चीत जायच्या जिन्यात बसलेला असायचा.
मिसळपाव
आता हिचा फोटो काढायचा ठरवल्यावर तिला तात्पुरते खूष करणे क्रमप्राप्त होते, म्हणून आधी तिच्या कडून दोन झेंडे विकत घेतले.