Skip to main content

अनुभव

अनुभव — मिसळपाव सदस्यांचे खरेखुरे जीवनानुभव. प्रवास, नोकरी, घर-संसार आणि आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांच्या मराठी अनुभवकथा येथे वाचा.

शिवजयंतीची 'वरात'

लेखक महेश_कुलकर्णी यांनी सोमवार, 21/02/2011 14:53 या दिवशी प्रकाशित केले.

वेळ : शनिवार १९ फेब्रुवारी २०११, संध्याकाळ
ठिकाण : छोटेसे तरुण गणेशोत्सव मंडळ.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची सरकारी जयंती (अनेक तिथी असल्यामुळे नक्की कोणते ते नमूद केले).
सर्व शिवभक्तांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण. तरुण मंडळीना तर काय करू आणि काय नको असे झाले होते.
शिवजयंतीनिमित्त एका तरुण गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संध्याकाळी मिरवणूक काढण्याचे ठरवले.
उंट, घोडे , भगवे ध्वज, डॉल्बी, वेशभूषा या सगळ्यांची जुळवाजुळव सुरु झाली.

विरंगुळा - ऑनलाईन चित्रपट

लेखक सहज यांनी शनिवार, 19/02/2011 08:15 या दिवशी प्रकाशित केले.

संदर्भ - इतिहास, संस्थळचर्चा इ इ

एक चित्रपट अधुन मधुन वेगवेगळ्या चॅनेल्सवर लागतो आजकाल. म्हणले तर जुना म्हणले तर नवा आहे. नाव बहुतेक 'अभी तक पचपन्न' का कायसेसे आहे. त्याची कथा तुम्हाला ऐकवतो. चित्रपट व कथा काल्पनिक आहे संबध लावायला गेलात तर
चक्रवाल! एन्जॉय करा.

"सिंगिंग इन द रेन"

लेखक प्रास यांनी बुधवार, 16/02/2011 16:17 या दिवशी प्रकाशित केले.

आजच बातमी ऐकली की उत्तर भारतामध्ये जोरदार पाऊस झालाय आणि मला एका पाऊस-गाण्याची आठवण झाली. गाण्याबरोबर आठवला ते गाणं ज्या चित्रपटात आहे तो चित्रपट आणि त्याचे अप्रतिम, देखणं सादरीकरण. या माझ्या एका आवडत्या हॉलिवूडपटाची - म्युझिकलची मिपाकरांना ओळख करुन द्यायचा छोटासा प्रयत्न!

१९५२ साली एका हॉलीवूड चित्रपटाचा मूकपट ते बोलपट प्रवास गमतीशीर पद्धतीने सांगणारा हा एक चित्रपट निघाला होता. जीन केली आणि स्टॅनली डोनन यांनी दिग्दर्शित केलेला आणि स्वत: जीन केली व बरोबर डेबी रेनॉल्ड्स, जीन हेगन आणि डोनाल्ड ओ'कॉनर याच्या सहज सुंदर अभिनयाने नटलेला हा चित्रपट होता, "Singing In The Rain".

"माझी व्यथा"

लेखक वपाडाव यांनी मंगळवार, 15/02/2011 11:42 या दिवशी प्रकाशित केले.

चीगोंच्या मार्गाथा वरून आम्हाला आणी एक किस्सा आठवला...
आणी हो तो सांगण्यासारखा पण आहे..
त्याची अगोदर पार्श्वभूमी सांगणे गरजेचे आहे. म्हणून हा परिच्छेद !!!

टीप: हा भीत-भीत का होईना इतक्या दिवसानंतर पहिला-वहिला लेख (वाटला तर लेख, नाहीतर टवाळगिरी म्हणा) मिपावर टाकतोय, विशाल मनाने ह्याला झोळीत घ्या. आणी काही चुका असतील तर कळवाव्यात.

अख्खा मसूर आणि दीड (शहाणे) आम्ही!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 14/02/2011 00:24 या दिवशी प्रकाशित केले.

सातारा रस्त्यावरच्या "अख्खा मसूर'वर बऱ्याच दिवसांपासून डोळा होता. कधीतरी त्याचं नाव कुणाकडून तरी ऐकलं होतं. तिथं जायचं डोक्‍यात होतं, पण योग येत नव्हता. तसा मी फारसा हॉटेलप्रेमी नाही. आहारात चवीपेक्षाही "उदरभरण नोहे' हा मंत्र जपणाऱ्या अंतू बर्व्याचेच आम्ही अनुयायी. त्यामुळं अमक्‍या हॉटेलात तमकी डिश चांगली मिळते वगैरे तपशील माझ्या गावी नसतात. कुणी सांगितलं आणि सहज जमलं, तर मी ठरवून एखाद्या हॉटेलाकडे वाट वाकडी करतो. नाहीतर कुठेही हादडायला आपल्याला चालतं.

जनगणना २०११ , टप्पा दुसरा , सहकार्य करा !

लेखक पिलीयन रायडर यांनी शुक्रवार, 11/02/2011 16:52 या दिवशी प्रकाशित केले.

लोकहो, ही माझी पहिलीच वेळ आहे मिपा वर लिखाण टाकण्याची.मी नवीन सदस्य आहे. पण वाचक फार पूर्वी पासून..
माझी आई सध्या जनगणना ह्या भयंकर कामात आहे. तिच्या सोबत अख्खा मे महिना रणरणत्या उन्हात फिरून काम केलेले असल्याने ह्या कामात किती अडथळे येतात हे मी पहिले आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये परत एकदा एक फेरी होत आहे ज्यात अजून २९ प्रश्न विचारले जातील. जनजागृती करूनच ह्या समस्या कमी करता येतील असे माझे मत आहे. यंदा जो फोर्म आला आहे त्यातील २९ प्रश्न मी इथे देत आहे . जेणेकरून हि माहिती लोक गोळा करून घरी राहणाऱ्या सदस्याजवळ ठेवतील.
१. व्यक्तीचे नाव
२. कुटुंब प्रमुखाशी नाते
३. लिंग

आत्मविश्वास

लेखक असुर यांनी गुरुवार, 10/02/2011 07:23 या दिवशी प्रकाशित केले.

प्रसंग आहे एका शनिवारी मी लंडनहून गावी परतत होतो तेव्हाचा. लंडनहून घरी परतताना मी नेहेमी रात्री १०:१४ ची ट्रेन पकडायचा प्रयत्न करतो, कारण या गाडीला अजिबात गर्दी नसते. तुरळक प्याशिंजर लोक आपले इथंतिथं सांडलेले असतात. आणि मोजून चार ष्टापात गाडी आमच्या ठेसनात पोहोचतेदेखील. अशी अजिबात गर्दी नसलेली गाडी पकडली की मलासुद्धा फोनाफोनी करायला आणि मोकळ्या आवाजात गप्पा हाणायला बरं पडतं!

स्त्रिया सुद्धा गैरफायदा घेतातच

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 08/02/2011 16:08 या दिवशी प्रकाशित केले.

अजाणत्या वयात मी एका मुलीच्या प्रेमजालात फसलो. तिला हव्या त्या ऑडिओ कॅसेट आणून देणं, तिच्यासाठी लेडीज रूमाल, बिंदाया, टिकल्या, मेकअप बॉक्स खरेदी करण्यातच मी परमानंद अनुभवला. परंतु जेव्हा ती मी दिलेली फेअरनेस क्रिम लावून दुसऱ्याच महाभागाला भेटायला गेली तेव्हाच तिचा माझा संबंध (जो कधी नव्हताच) संपला.
*