Skip to main content

पिलु..........

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 28/01/2011 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
मी, पिलू आणि जॉगिंग .......................... पिलू चा परिचय ( पिलू हा आमचा लाडका १ वर्षाचा भू भू आहे ,१ महिन्याचा होता तेव्हा भावाने आणले होते पाळायला ,त्याला पिलू म्हणायचो आणि तेच नाव पडल ) हिवाळ्यात जठराग्नी फारच क्रियाशील असतो (असे म्हणतात ),त्यामुळ जास्ती भूक लागते ,पण ह्या जास्तीच्या खावडी मूळ माझ वजन ३-४ किलो वाढल चांगलच ! आता काय करायचं ? जिमला जायचं ?

माझं क्रिकेट जीवन.

लेखक गणपा यांनी गुरुवार, 27/01/2011 05:10 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणी ज्या काही गोष्टींच बाळकडू पाजल गेल त्यातील एक प्रमुख म्हणजे क्रिकेट. तेव्हा रेडिओ, ट्रांझिस्टर जरी घराघरांतुन आढळुन येत असले तरी टीव्ही मात्र चैन या प्रकारातच मोडत होता. आम्ही गोरेगावला एका हाउसिंग बोर्डाच्या चाळ वजा इमारतीत रहायचो. मी असेन तेव्हा ४-५ वर्षांचा. घरात आम्ही ५ माणसे. आई, बाबा, दिदि, मी आणि माझा मामा. सगळे क्रिकेट वेडे. इतकच काय अगदी आधीच्या पिढीतली आईची आत्या सुद्धा क्रिकेटची षौकीन. क्रिकेटचा मोसम चालु झाला की तरुणांच्या कानाला ट्रांझिस्टर चिकटलेला दिसायचा.

मंतरलेले चार दिवस - भीमराव पांचाळेंसोबत !

लेखक जयवी यांनी बुधवार, 26/01/2011 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
भीमराव पांचाळे नावाचा सुरांचा जादूगार कुवेतमधे येऊन गेला आणि आम्हा कुवेतकरांना त्यांच्या सुरांच्या इंद्रजालात पार अडकवून गेला. त्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाहीये. खरं तर त्यातून बाहेर यावंसंच वाटत नाहीये. त्यांनी त्याच्या साधेपणाने आम्हाला कायमचं आपलंसं करुन टाकलंय. त्यांच्या सुरांच्या प्रेमात अगदी आकंठ बुडवून टाकलंय. संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी गजलनवाज भीमराव पांचाळे आणि त्यांचे सहकारी डॉ.देवेंद्र यादव आणि जगदीश मेस्त्री कुवेतमधे आले आणि चार दिवस आम्हा सगळ्यांना त्यांचा मंतरलेला सहवास लाभला. २० जानेवारीची २०११ ची सकाळ.

पंगा

लेखक प्रास यांनी सोमवार, 24/01/2011 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
पुलाखालून खूप पाणी वाहून गेलय आता तरी विद्यार्थीदशेत पंगेगिरी अशी ब~याचदा केलीय. तसं त्यातलं काही अंगलट आलं नाही पण अनुभवसम्रुद्ध मात्र नक्की करून गेलं. आयुर्वेद महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत असतानाची गोष्ट. परिक्षा महिन्याभरावर आलेली, जर्नल्स लिहीण, ती तपासून घेण, परीक्षेत काय विचारलं जाईल याचा माग काढण वगैरे वगैरे सगळे उद्योग चालू होते. एरवी मी शिक्षकांच्या फार गुड बुकात नसलो तरी ब्याड बुकातही नसायचो (असं तेव्हा मला वाटायचं.) शिक्षकांना सतावणे वगैरे व्हायचं ते त्यांना सोडवायला त्रास होईल अशा शंका विचारण्याने किंवा चालू वर्गात थोडी भंकस करून त्यांचा जीव मेटाकुटीला आणण असंच.

काका हलवायाकडची जिलबी..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 24/01/2011 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
परंतु आज नीलकांताने मुखपृष्ठावर, आज काही काळ मिसळपाववर भीमसेनांच्याच संबंधी धागे यावेत आणि ज्यांना ज्यांना त्यांच्या विषयी लिहायचे असेल त्यांनी तसे लिहावे असं म्हटल्यामुळे लिहायला बसलो आहे, परंतु खरं तर काहीच लिहायला सुचत नाही..सारा दिवस कसाबसा गेला परंतु आता रात्र मात्र अंगावर येऊ पाहाते आहे. अक्षरश: ओक्साबोक्षी रडावसं वाटत आहे, पण धड रडूही येत नाही. गेल्या दोनचार दिसापूर्वी मीच त्यांच्याकरता मारे विमान वगैरे मागवलं होतं, अर्थात त्यांचा त्रास, अंथरुणातल्या हालअपेष्टा संपाव्यात म्हणून. परंतु वास्तव इतकं सोपं नसतं.

स्वरभास्कराची महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाने घेतलेली मुलाखत.

लेखक गणपा यांनी सोमवार, 24/01/2011 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज मटामध्ये, तीस-एक वर्षांपुर्वी आकाषवाणीवर पुलंनी अण्णांच्या घेतलेल्या मुलाखतीचे काही अंश छापुन आलेत. त्याच मुलाखतीची ही ध्वनीफीत.

किल्ल्यांवरची हागणदारी...!

लेखक हेम यांनी रविवार, 23/01/2011 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
तिनेक दिवसांची जोडून सुट्टी आली की हौशा- नवशा- गवशा तथाकथित ट्रेकर्स लोकांची धिंगाणा घालायला काही हॉटट्ट डेस्टिनेशन्स ठरलेली आहेत. नाणेघाटाची गुहा, हरिश्चंद्रगड आणि रतनगड! ...त्याच्यात पावसाळ्याचे दिवस असतील तर ही सगळी झुंबड डॉट कॉम राजमाचीला लॉग इन असते! त्यांचा गोंगाट, प्लास्टीक कचरा आणि एकूणच वर्तणुकीचा पारंपारिक त्रास सगळ्यांना नेहमीच होतो आणि हे प्रमाण वाढतंच रहाणार आहे. आणखी एक त्रासाचा प्रकार गेल्या पावसाळ्याअखेरीस आम्ही रतनगडला अनुभवला तो म्हणजे या गडावर मुक्कामी असलेल्यांच्या प्रातर्विधीचा!