Skip to main content

बातमी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 22/03/2011 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही हिस्स बघितला आहे का? हा तोच तो. मल्लिका शेरावतचा. बघितला आहे असे उघड उघड मान्य करणारे लोक या पृथ्वीतलावर फार कमी सापडतील. तसा हिस्स मीही बघितलेला नाही आहे. खरेच सांगतो. पण मल कथा महिती आहे. तिच ती जुनी कथा. इच्छाधारी नागिण आणि तिचा प्रतिशोध. विषयही तसा जुना आहे. यापुर्वी नागिन (सुनील दत्त, संजय खान, फिरोज खान रेखा, रीना रॉय फेम), जानी दुष्मन (डझनावारी हीरो फेम) असे बरेच चित्रपट नाग / नागिणींच्या प्रतिशोधावर येउन गेले आहेत. या सगळ्या चित्रपटातले एक समान सूत्र असे आहे की हे सगळे चित्रपट नेहेमी मल्टिस्टारर असतात. (मल्लिका शेरावतचा हिस्स सोडुन.

रंगपंचमी तील अनिष्ट प्रकार

लेखक शुचि यांनी रविवार, 20/03/2011 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
रंगपंचमीचा अंगावर काटा आणणारा अनुभव लिहीते आहे. खूप वर्षे झाली त्या गोष्टीला. नवरा जहाजावर होता आणि आमचा फक्त साखरपुडा झालेला होता. मी मुंबईच्या एका महाविद्यालयात शिकत होते आणि हॉस्टेलवर रहात होते. दर शनिवारी, रवीवारी मी सासरी जाऊन रहायचे कारण नवरा एवीतेवी नव्हताच त्यामुळे आईबाबानी परवानगी दिली होती. त्यायोगे सासरच्या लोकांशी ओळख होत असे, रीतीभाती समजत असत. एका रवीवारी नेमकी रंगपंचमी आली. आणि मी परत हॉस्टेलवर निघाले. मला सासूबाईंनी जाऊ दिले. त्यांच्या लक्षात आले नसावे की या दिवशी स्त्रियांनी मुंबईत बाहेर पडणे किती धोक्याचे असते. झाले मी रेल्वे स्टेशनवर गेले, सामसूम होती.

भोग

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 19/03/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
या जन्माची पापं या जन्मातच फेडायला लागतात म्हणे. आयुष्याचे भोग प्रत्येकाने भोगायलाच पाहिजेत असाही एक प्रवाद आहे. पण मी आयुष्यात अशी कुठली पापं केली आहेत की माझे भोग संपता संपत नाहीत हे कळेना झालय. नाही मी काही 'तसला' विचार मांडत नाही आहे किंवा माझी गार्‍हाणी गाण्याचा पण माझा विचार नाही. पण माझी दु:खभरी दास्तां ऐकुन तुमच्या डोळ्यात पण पाणी येइल. अजुन काही नाही तुमच्या कडुन फक्त थोड्या सहानुभुतीची अपेक्षा आहे. मी सुरुवातीलाच मोकळेपणाने कबूल करु इच्छितो की माझ्या आयुष्यात हे जे काय घडले आहे न पेक्षा जे काही नेहेमीच घडते त्यात अंशतः चुक माझीच आहे. पण पुर्णपणे मी स्वत:ला दोष देउ इच्छित नाही.

सांदण दरी - एक प्रवास वेगळाच.

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 17/03/2011 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
भुमाता अजुन वाट पाहते आहे आपल्या लेकीची, तिच्यावर झालेला अक्षम्य अन्याय पाहिलाय तिनं, त्या कष्टांना दुर करुन त्या लाडाच्या लेकीला पुन्हा एकदा काळजाशी लावुन घेउन झोपवायचं आहे तिला. त्या पराक्रमी राजाच्या वंशाच्या दिव्यांना जोजवुन निजवताना तो प्रचंड पाळणा हलवुन हलवुन थकलेले हात आपल्या हातात घेउन काळजातुन वाहणा-या गार पाण्यात त्या हातांच्या जखमा थोड्या शांत करायच्या आहेत. या साठी त्या आईनं आपल्या काळजाची वाट उघडुन ठेवली आहे, आता फक्त वाट आहे ती लाडकी लेक येण्याची.

"पुष्पक "

लेखक VINODBANKHELE यांनी सोमवार, 14/03/2011 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, मिपाकर , न बोलता फटाके फोडण्या साठी मिपा संस्थळ प्रसिद्ध आणि म्हणून खूप लोकप्रिय आहे , अर्थात हे सांगण्याची काही गरज नाही म्हणा ,पण असेच एक माईल स्टोन स्थळ माझ्या आठवणीत आणि गुगल व्हिडिओ वर आहे त्याची आणि आपली भेट घडवावी म्हणून हे लेख पुष्प .

रावसाहेब

लेखक आदिजोशी यांनी सोमवार, 14/03/2011 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
रावसाहेबांनी डोळे किलकिले करून बघितलं. आजूबाजूला कुणाची चाहूल नव्हती. अंमळ पडून रहावे असा विचार करून रावसाहेबांनी कूस बदलली. पडद्याच्या फटीतून सकाळची कोवळी किरणे रावसाहेबांना त्या थंड वातावरणात हवीहवीशी वाटणारी उब देत होती. म्हणजे, दिवस थंडीचे नव्हते, ती थंडी ए.सी.ची होती. मुंबईत राहून हिवाळा अनुभवायचा असेल तर एसी शिवाय पर्याय नाही हे त्यांना कळलं होतं. पुन्हा एकदा रावसाहेबांनी स्वतःला मऊ दुलईत गुरफटून घेतलं. मागचे काही दिवस हा त्यांचा नेहेमीचा उद्योग झाला होता. आताशा पूर्वीसारखे कुणी त्यांना सकाळी सकाळी उठवायच्या मागे लागलेले नसायचे. पूर्वी म्हणजे सकाळी घराचं जणू रणांगण झालेलं असायचं.

असा अनुभव फक्त पुण्यातच येऊ शकतो.

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सोमवार, 14/03/2011 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार-रविवारी काय करायचं हा एक मोठ्ठा प्रश्न पुण्यातच चुटकीसरशी सुटतो. The King's Speech बघायचं ठरलं आणि आश्चर्य म्हणजे घराजवळच्या ई-स्क्वेअरमधे सोयीच्या वेळेत तो दाखवतही होते. पिक्चरच्या वेळेच्या वीस मिनीटं आधी जाऊन तिकीटही मिळाली. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्कूटर पार्किंगमधे नेण्याआधी त्यांनी पिलियन रायडरला उतरवला, मला हेल्मेट काढायला लावलं, अ‍ॅक्टीव्हाच्या सीटखालची डिकी उघडून पाहिली (हँडलमधली महत्त्वाची नसावी), आणि मगच पार्किंगमधे सोडलं. दीडचा शो वेळेतच, बरोब्बर एक वाजून सदतीस मिनीटांनी सुरू झाला. सगळं कसं, आलबेल!

फुकट ते पौष्टिक?

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 14/03/2011 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
"सर, यू हॅव बीन सिलेक्‍टेड फॉर ए फ्री गिफ्ट व्हावचर...' लाडिक आवाजातल्या एका "तरुणाचा' दोन दिवसांपूर्वी फोन आला होता. सहसा अशा फोनना काय उत्तर द्यायचं, त्याला आता मी सरावलोय. पण इथे जरा माझ्या इंटरेस्टचा विषय होता. चकटफु पर्यटनाचा. "क्‍लब महिंद्रा'कडून हा फोन होता. त्यासाठी आम्हा दोघांना जोडीनं त्यांच्या हापिसात गिफ्ट व्हावचरचा आहेर साकारण्यासाठी जायचं होतं. रविवारचा दिवस ठरला. दुपारी साडेबाराला बोलावलं होतं, बाणेर रोडवर दुपारच्या उन्हात बोंबलत तो पत्ता शोधेपर्यंत एक वाजला. एक तासाचं प्रेझेंटेशन ऐकावं लागणार, ते कुठल्या तरी मेंबरशिपची गळ घालणार, कशात तरी अडकवण्यासाठी भुलवणार, सगळं ठाऊक होतं.