Skip to main content

वन लाइनर्स

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 07/01/2011 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभुमी : हा थ्रेड माझा मिसळपाव वरील पहिलाच थ्रेड होता, आता नविन ओळखी नविन मित्र त्यांच्या साठी पुन्हा येथे देत आहे. (कोणी आधी वाचला असेल तर पुन्हा येथे दिल्यामुळे शमस्व) व.पु. काळे हे माझे आवडते लेखक, त्यांच्या मुळे वाचनाचे वेड आनखिन वाढले होते .. त्यांच्या कथा कादंबरी आणि त्यातील वाक्य म्हणजे ग्रेटच त्यातल्ता त्यात पार्टनर .. आपण सारे अर्जुन.. तु भ्रमत आहासी वाया .. हय कादंबर्या म्हणजे कळसच . त्यांच्याच प्रेरणेतुन काही तरी लिखान हाती घेतले आणि त्यात आलेली माझी वाक्य मलाच आवडुन गेली.. कविता ह्या आत्मकेंद्रीत असल्याने सार्वभौमत्व लवकर मिळत नाहि त्यांना.

भाकरी निर्मिती एक कला..

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी गुरुवार, 06/01/2011 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
लष्कराच्या भाकरी थापणे जितके सोपे तितके भाकरीचे निर्माण नाही. ज्वारी, बाजरी, नाचणी ही एकदल धान्ये आता औषधापुरतीच जगतमान्य झाली आहेत. अन् अशांची भाकरी भाजणे ही एक चैन समजावी अशी परिस्थिती दिसते. मुळात भाकरी थापणे, भाजणे या फार मोठ्या कौशल्याच्या गोष्टी आहेत. गावाकडची एखादी जुनी जाणती कौशल्याबाईच ते करु जाणे. तर 'भाकरी निर्माण' ही बऱ्‍यापैकी अवघड कला. त्यासाठी धान्य निवडण्यापासून सुरुवात करावी लागेल. दळण्या अगोदर धान्यातली कच, खडे, तुसे बाहेर टाकली नाहीत तर भाकरी खमंग होऊनही चावतांना वादंग उठण्याचीच शक्यता जास्त. तेव्हा डोळ्यांत तेल घालून धान्याची निवडणूक झाली की चांगलं पीठ दळून घ्यावं लागतं.

[नीळकंठेश्वर] - नव वर्ष, नवी जागा

लेखक पारा यांनी सोमवार, 03/01/2011 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा रायगडला जाण्याचा बेत रद्द झाला, आणि मी नववर्षाच्या पहिल्या शनिवारी आणि रविवारी एकटा पडलो. सगळे मित्र कुठे कुठे गेलेले होते. त्यामुळे शनिवार फारच कंटाळवाणा गेला. तेंव्हा मी असा विचार केला की किमान रविवार तरी असा काहीच न करता वाया घालवायला नको. मग मी माझ्या पुण्यातल्या मित्रांना SMS केले की सिंहगडावर जायचं का हे विचारायला, कोणीच मला फारशी उत्साहपूर्ण उत्तर दिली नाहीत. मग मी एकट्यानेच कुठेतरी जायचं ठरवलं. बरेच दिवसांपासून हे शंकराचे मंदिर मनात घोळत होते, तर मग विचार केला, की आज तिकडेच जाण्याचा बेत करावा, आणि अस्मादिकांची स्वारी एकटीच निघाली, नीळकंठेश्वराला.

शाळा

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 03/01/2011 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा हा विषयच असा आहे की कितीही लिहा कमीच पडेल. पेनातली शाई संपेल (किंवा कळफलक दाबु दाबुन बोटे दुखतील) पण शाळेच्या आठवणी संपणार नाहीत. प्रत्येकाच्या हृदयात शाळेच्या आठवणींसाठी एक वेगळ कप्पा राखुन ठेवलेला असतो. त्या १०-१२ वर्षांच्या आठवणी नेहेमीच सोनेरी रुपेरी असतात असे नाही पण अटळ, अचल, अविनाशी नक्की असतात. माझ्या आठवणीत एक नाही अनेक शाळा आहेत. पण शाळेशी खर्‍या अर्थाने बंध जुळण्याच्या काळात म्हणजे ५ वी नंतर मी ठाण्याच्या सरस्वती मध्ये होतो.

बाबूकाका

लेखक यकु यांनी सोमवार, 03/01/2011 03:56 या दिवशी प्रकाशित केले.
डोक्याच्या घेरावर बारीक होत गेलेला पोलीसकट, पांढरे होत चाललेले केस, तरूणपणीच्या शम्मी कपूरसारखाच चेहेरा आणि अंगयष्टीही तशीच, अंगात सफारी किंवा तसलाच साहेबी वाटणारा पोषाख, हातात एक लहानशा आकाराची ब्रीफकेस असे काहीसे वर्णन करता येईल असा माणूस एसटीतून उतरण्याची वाट पाहात खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट घातलेला एक पोरगा बसस्टॅण्डवर कितीतरी वेळापासून थांबलेला असे. ते त्याचे बाबूकाका होते. बाबूकाका त्याचे आजोबा लागत असले तरी घरातील इतर सर्वजण त्यांना बाबूकाकाच म्हणत असल्याने त्याच्यासाठीही ते बाबूकाकाच होते.

भांग

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 01/01/2011 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
''बगड बबं बबं बम लहरी ऽऽ'' कैलाश खेरचा मनमोकळा स्वर कँटीनच्या म्युझिक सिस्टीममधून मदमस्त घुमत होता. चहाच्या पेल्यांच्या तळव्यांनी चिकट झालेल्या टेबलावर ठेवलेल्या काचेच्या पेल्यातील चहामृत प्राशन करत सर्व मित्रमंडळी एकेक लंब्या चवड्या बाता मारण्यात गर्क होती. ''गेल्या शिवरात्रीला आम्ही मित्रांनी भांग-पार्टी केली. काय सॉलिड मजा आली यार.... मी म्हणे व्हरांड्याच्या खांबाला धरून शोलेचे डायलॉग्ज म्हणत बसलो होतो.... मला तर काही आठवत पण नाही यार... हॅ हॅ हॅ!'' आमच्या ग्रुपमधील एकाचा नुकताच झालेला दोस्त सांगत होता. बाकीचे सर्व नग त्याचं बोलणं भक्तिभावाने ऐकत होते. मला नकळत हसू फुटले.

हैप्पी ३१ स्ट

लेखक विनायक बेलापुरे यांनी शुक्रवार, 31/12/2010 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
दारु की खुश्बू गुटके की मिठास गांजे की महेक और चरस का स्वाद भांग के पकोडे और विल्स का प्यार मुबारक हो आपको बेवडों का त्योहार हैप्पी ३१ स्ट (एका समस वरुन साभार)

आजी-माजी संमेलनाध्यक्षांची ग्रंथनगरीकडे पाठ..

लेखक अजय जोशी यांनी गुरुवार, 30/12/2010 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत मराठी साहित्यिकाच्याच बाबतीत जे विधान केले जात होते ते आता संमेलनाध्यक्षांच्या बाबतीतही करावेसे वाटते. दिनांक २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६:३०वाजता ग्रंथदिंडी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये वेळेवर पोहोचली. त्यावेळी सपट परिवार लोकमानसचा चर्चेचा कार्यक्रम मुख्य मंडपात नुकताच संपला होता. चर्चेत डॉ. द.भि. कुलकर्णी हेही सहभागी होते. त्यामुळे ते त्याच मंडपात होते. ते ग्रंथप्रदर्शनासाठी येणार आहेत काय हे पहायला मी गेलो. तोपर्यंत त्यांना कोणी चहा दिला नव्हता. म्हणून चहाची ऑर्डर द्यायला मी मंडपाच्या बाहेर आलो खरा...! पण त्याचवेळेस श्री. उत्तम कांबळेसाहेब ग्रंथदिंडी घेऊन पोहोचले सुद्धा. द.भि.