Skip to main content

सिनेमा...सिनेमा!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 22/01/2011 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
`भानुविलास' टॉकीजची परवाच्या अंकातली बातमी आणि आजचा म.टा.मधला अभिजित थिटेचा लेख वाचून माझ्याही आठवणींना धुमारे फुटले. अभिजितनं "भानुविलास'च्या आठवणी छानच जागवल्या आहेत. आपली गोची हीच असते, की जुन्या आठवणी सोडवत नाहीत आणि नव्याही हव्याशा वाटतात. आपल्या बालपणाच्या वेळची शाळा, मित्र-मैत्रिणी, घरं, रस्ते, ते वातावरण, तो गणवेश, सगळं सगळं तसंच राहावंसं वाटत असतो. आपण मात्र खूप बदललेलो असतो. आणि ही बदललेली स्थिती आपल्याला सोडायची नसते. पण जुनंही सगळं हवंहवंसं वाटत असतं.

लेखनसीमा

लेखक निशदे यांनी गुरुवार, 20/01/2011 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनशक्ती ही मानवाला उगाच दिलेल्या अनेक निरुपयोगी शक्तींपैकी एक आहे असे माझे मत आहे. आता मी म्हणजे कोणी जगन्मान्य कर्तृत्ववान व्यक्ती नसल्याने माझ्या मताला देखील काही किंमत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. पण माझ्या एका (स्वघोषित) सहस्त्रबुद्धे आजोबांच्या शिकवणीनुसार " (लोकांचे कितीही डोके उठले तरीही) माझे मतप्रदर्शन मी करणारच " या उक्तीवर माझा गाढ विश्वास असल्याने मी बोलणारच. आणि शिवाय लेखनाचे फायदे किती यावर लेखनप्रेमी मंडळी कायमच बोलत असतात. तर लेखनाचे तोटे किती यावर आमच्यासारखी लेखनद्वेष्टी मंडळी कधी बोलणार ? " दिसामाजी काहीतरी.....

आभास हा.....

लेखक रेवती यांनी बुधवार, 19/01/2011 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
अर्पणओळ - नववर्षात व्यायामाचा संकल्प सोडलेल्या सर्वांना! बाहेर मस्त थंडी पडलिये, पहाटे उठून आलं घातलेला वाफाळता चहा प्यावा, दिवस लवकर सुरु करावा, डोंगरामागून येणार्‍या सूर्यनारायणाचं दर्शन घ्यावं असं मला अजिबात वाटत नाही........ म्हणजे लहानपणापासून कधी वाटलंच नाही, पण तसं वाटावं म्हणून मी प्रयत्न भरपूर केले. आई, आज्जी बरेचदा जवळच्या देवळात काकडआरतीला जात असत. किती मस्त वाटतं वगैरे वर्णनंही करत्.....तरीही पहाटे उठणं हा माझा घास नव्हे. मुलांना पहाटे उठण्याची चांगली सवय लावावी असं आईला नेहमी वाटत असे. तिला त्यात कधी यश मात्र आलं नाही.

आई मी पतंग उडवीत होतो..................

लेखक पियुशा यांनी बुधवार, 12/01/2011 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
आई मी पतंग उडवीत होतो.................. काल परवा दोन तीन छोटे शुर शिपाई हातात काठी आणि त्याला पुढे आकडी असा लवाजमा घेऊन काटलेल्या पतंगाच्या मागे पळत होती त्याला पाहून मला पण आमचे लहानपण आठवले "अरे यार आपण पण असेच होतो कि , पतंग पकडायला आकडे घेऊन पळणारे ,कुणाच्या गच्चीत ,कुणाच्या कम्पौंड मध्ये घुसणारे ! पतंग हा शब्द ,लहानपणी ऐकला तरी हवेत तरंगायला व्हायचं आम्हाला.... तुम्ही म्हणाल हे मुलाचं खूळ तुला कस ग ?(लहानपणापासून आम्ही मुलांचेच खेळ जास्ती खेळलो, कॉलनीत १०-१२ मुल आणि दोन चार मुली मग जास्तीची म्याजोरटी कळल !) क्रिकेट पासून विट्टी दांडू ,

१२७ अवर्स

लेखक सेरेपी यांनी मंगळवार, 11/01/2011 04:23 या दिवशी प्रकाशित केले.
एका मित्राने काही दिवसांपूर्वी अचानक विचारलं, '१२७ अवर्स' च्या प्रायवेट स्क्रीनिंगचे पासेस आहेत. मला जायला जमणार नाही, तुला जायचं असेल तर सांग'. त्या क्षणापर्यंत मला हि काय भानगड आहे पत्ता नव्हता. तशी मी काही फार 'मूव्ही बफ' वगैरे म्हणण्यासारखी नाही, पण एका कंटाळवाण्या संध्याकाळी कोणी फुकट पास देत असेल तर नाही का म्हणा? म्हटलं दे. तर संध्याकाळी घाईघाईने थेटरात. कसला चित्रपट, कोणाचा काही माहित नव्हतं. शेवटी २-३ मिनिटं उशिराने पळत पळत जाऊन बसलो.

भावड्याची खुषखबर तसेच बुलककार्ट देखील

लेखक भीडस्त यांनी रविवार, 09/01/2011 02:34 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना आमच्या वर्गात भावड्या नावाचा वर्गमित्र होता. भावड्या पायर्‍या पार करत करत आमच्या वर्गात पोहोचता झाला नव्हता तर एकाच पायरीवर अंमळ जास्तच रेंगाळल्याने स्वारी आमच्या बरोबर वर्गात दाखल झाली होती. त्यामुळे भावड्या इतर वर्ग सोबत्यांपेक्षा थोराडच दिसे. वर्ण देखील महाराष्ट्र देशीच्या उन्हातान्हात तापल्याने चांगलाच रापलेला. भरीत भर म्हणून त्या अनगढ वयातल्या आम्हा सगळ्या १२-१३ वर्षीय मित्रांसाठी भावड्या म्हणजे सर्वज्ञ असे. त्याच्या पोतडीतले किस्से म्हणजे अलिबाबाची गुहाच जणू. तर असा हा आमचा भावड्या आमच्या वर्गात असताना, त्या एका वर्षात त्याने उडवलेली ही काही धमाल.

नाटकवाला

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 08/01/2011 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
तसं म्हणाल तर बालपणापासूनच नाटक अंगात मुरलेलं. हवी ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी रडण्याचं नाटक करायचं किंवा एखाद्या किर्तनकाराची हुबेहूब नक्कल करीत वाहवा मिळवायची. शालेय जीवनात अनेक सोंगे करुन उपस्थितांना हसवलं. 'चोरीचा मामला' मधील सदाशिवरावांची व्यक्तिरेखा साकारली. 'वेड्यांच्या इस्पितळा'त पोस्टमन म्हणून वावरलो. कॉलेजच्या पहिल्या वर्षी पु.लं. च्या 'सारं कसं शांत शांत' मधील भटजीची भूमिका करून अनेकांची शाबासकी सुद्धा मिळवली.