Skip to main content

शर्यत रे जिंकली!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 07/03/2011 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
"कासव' हा काही उत्साहानं पाहायला जाण्याजोगा प्राणी नाही. मुलांनाही ससा आणि हत्ती-वाघाची जेवढी क्रेझ वाटते, तेवढी कासवाबद्दल वाटण्याची काहीच गरज नाही. एवीतेवी पडला हळू चालणारा, सगळ्यांच्या मागे असलेला आणि कुणाच्या अध्यात-मध्यात न येणारा प्राणी. पण वेळासच्या महोत्सवानं कासव ही सुद्धा पाहण्याची गोष्ट असते, हे सिद्ध केलं. आम्ही वेळासला गेलो, तर किनाऱ्यावर नुसती कासवाची पिल्लं पाहायला दीड-दोनशे पर्यटक मुंबई-पुणे, अन्य कुठल्या कुठल्या शहरांतून आले होते! एका सहकाऱ्यानं ही टूम काढली होती. मलाही बऱ्याच दिवसांत कुठेतरी उलथायचं होतंच. त्यामुळं सहकुटुंब जायचं ठरवलं. मंडणगडला आधी कधी गेलो नव्हतो.

.... उचल ना फोन..

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 07/03/2011 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसात जाताना असं होतं, कधी कधी माझा आणि बायकोचा वाद झालेला असतो, आम्ही तसेच ऑफिसला जातो, चेहरा लगेच कार्पोरेट झालेला असतो, पण आत काहीतरी बोलायचं राहिलेलं असतं, काहीतरी ऐकलेलं डोक्याच्या बाहेर निघायला तयार नसतं. टेबलवर फोन वाजत असतो, टॅण टॅ धॅन टॅ . voice call from **** टॅण टॅ धॅन टॅ .. मी फोन उचलत नाही तर सायलेंट करुन ठेवतो, पुन्हा ४-५ मिनिटांनी फोन टॅण टॅ धॅन टॅ . voice call f******* टॅण टॅ धॅन टॅ , आता चिडणारा दुसरा कोणितरी असतो पण डायलॉग तोच -'अरे उचल ना फोन ' . मी तरी ही फोन उचलत नाही.

मिशन हस्ताक्षर

लेखक पिंगू यांनी शनिवार, 05/03/2011 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
सांगायच कारण काय तर आज काल हाताने केलेले लिखाण खूपच वाईट यायला लागलय. काय कारण असेल बर याचं. जरा धांडोळा घेतला तर लगेच कारण उमजले. काय असेल ते तर गेल्या दोन वर्षात मी पेन आणि पेन्सिल वापरून काही लिहिलेच नाही. तेव्हा जरा भूतकाळात डोकावण्याची इच्छा झाली. शाळेतील ते दिवस आठवले. पाचवी-सहावीला असताना माझे अक्षर म्हणजे शाळेत असताना एक अगम्य होतं. शिक्षक म्हणायचे कार्ट्या काय ह्या कोंबडीच्या नख्या काढल्यात. त्यामुळे कधी कधी गृहपाठाची वही डोक्यात पडायची. हा नित्यनेम सातवीत जाईपावेतो असाच होता.

दाबेली काका

लेखक गुड्डु यांनी शनिवार, 05/03/2011 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी माझा एक अनुभव सांगणार आहे. ज्यामुळे मी माझी कोणालाही नावे ठेवण्याची सवय सोडली नाही पण खुप कमी केली. तर गोष्ट ८ वर्ष जुनी आहे.मी आणि माझी बहीण रोज संध्याकाळी फीरायला जायचो येताना ८.३०,८.४५ वाजता एक दाबेली च्या गाडीवर एक जुजबी ओळख असलेले काका दिसायचे. ३-३,४-४ दाबेल्या आपले खात असयचे. आता बघा ७५-८० वय असलेला माणुस असा जंक फूड खाताना बघुन काय विचार येणार?

गोपे घाट आणि शिवथर घळ

लेखक केदार बर्वे यांनी शुक्रवार, 04/03/2011 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व भटक्यांना नमस्कार, पुणे आणि परिसरातील जवळ जवळ बहुतेक किल्ले बघून झाल्या मुळे २ दिवसात छोटा असा कुठला ट्रेक करता येईल असा विचार करत होतो, मध्यंतरी आनंद पाळंदे यांचे चढाई आणि उतराई हे पुस्तक वाचनात आले होते आणि त्यामुळे जुन्या घाट वाटांची पुस्तकी माहिती झाली होती, त्यातलाच एक घाट म्हणजे गोपे घाट. गोपे घाट आणि शिवथर घळ असा ट्रेक करायचा असे ठरवले, २०१० च्या पावसाळ्यातच उपांडे घाट आणि शिवथर घळ असा ट्रेक एका खासगी संस्थे बरोबर केल्याने थोडी माहिती होती तरी पण गुगल च्या मदतीने नकाशा नजरे खालून घातला, आनंद पाळंदे यांचे चढाई आणि उतराई हे पुस्तक मदतीला होतेच पण पाळंदे यांनी हे

पहिला पहिला क्रश ......

लेखक पियुशा यांनी बुधवार, 02/03/2011 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला पहिला क्रश ...... प्रत्येकाच्या आयुष्यात हा दिवस येत्तोच (अपवाद वगळता) आमच्याही आयुष्यात हा दिवस तसा जरा लवकरच आला असेच म्हणावे लागेल . त्यावेळी मी नववीत असेन ,आमच्या धिंगाणेबाज कंपूत आम्ही ५-६ मुली होतो आमच्या वर्गात दोन मॉनिटर होते एक मुलांचा ,आणि एक मुलींची ,(ती मी होते ) त्यामुळे काही मुली माझ्यावर नेहमी खार खाऊनच असायच्या वर्ष संपत आले होते जवळ जवळ, पण ग्रुप मधल्या काही मुलीन मधला बदल थोडा उशिराच लक्षात आला माझ्या ! म्हणजे तमुक तमुक मुलगा दिसला कि चोरून चोरून स्मैलींची देवाणघेवाण.......