Skip to main content

प्लान! ... एक गूढकथा ...

लेखक विनीत संखे यांनी मंगळवार, 05/04/2011 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
"थेरडे! थेरडे सोड तिला. अगं दम काढशील तिचा. मरेल ती. सोड! सोड म्हणतेय ना मी.", हवालदारीण मंजुळाला पकडून खेचत होती. पण आज मंजुळा दोन पोलिसांना ऎकत नव्हती, एवढी तिच्या हाती ताकद आली होती. सवित्रीला जाऊ द्यायचेच नाही असे तिने ठरवलेले. आज शनिवारची नामी संधी मिळाली होती तिला. कपड्यावरचे डाग नीट धुतले गेले नाहीत म्हणून सकाळी सावित्री आली अन तिने मंजुळाशी वाद घातला. मंजुळानेच साऱ्याजणींचे कपडे धुतले होते. सावित्रिचे मात्र मळलेले होते. मग काय दोन रान मांजरी भिडल्या. आपल्या बापाचं ज्यांनी कधी ऎकलं नाही त्या एकमेकींचं काय ऎकून घेतील? झालं मग द्वंद्व.

क्रिकेट विश्वचषक - २०११ 'अभिनंदन'

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शनिवार, 02/04/2011 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
आय सी सी क्रिकेट विश्वचषक - २०११ जिंकल्याबद्द्ल भारतीय क्रिकेट संघाचे मनापासुन अभिनंदन! आपण एक इतिहास घडवलेला आहे! एक स्वप्न सत्यात उतरले! - (अतिशय आनंदी) इंट्या.:)

पारंपारिक प्रतिस्पर्धी

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 30/03/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर आज बघा. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० मिनिटांनंतर २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे. आजचा भारत - पाकिस्तान सामना हा तिसर्‍या महायुद्धापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा आहे. याआधी विश्वचषकाच्या इतिहासात हे २ देश कधीही उपांत्य फेरीच्या सामन्यात समोरासमोर आले नाहीत. याआधी कधीही त्यांची लढाई अस्तित्वाची लढाई नव्हती.

पाचवी खोली

लेखक आदिजोशी यांनी मंगळवार, 29/03/2011 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
गिरगावातल्या चाळीत वाढलेल्या आमच्यासारख्या लोकांचं घराबद्दलचं एक स्वप्न असतं. स्वप्न सुरू - घरात एक प्रशस्त, हवेशीर संडास असावा - स्वप्न समाप्त. जास्त अपेक्षा नाहीत. मजल्यावरच्या ४ बिर्‍हाडात मिळून एक असलेल्या सार्वजनीक संडासाला आम्ही प्रेमाने पाचवी खोली म्हणत असू. काही लोक त्याला 'मालकाची खोली' असंही म्हणत. संडासाला 'मालकाची खोली' म्हणण्यामागे चाळ मालकाला नावं ठेवणं इतकाच हेतू नसून त्या बोलण्याला 'फक्त खोलीचं भाडं देऊन संडास फुकट वापरता' असं मालकाने ऐकवल्याची पार्श्वभूमी असे. चाळीतला संडास हा क्लिओपात्राच्या बाथ-टब सारखा लेख लिहायच्या लायकीचा जिन्नस नाही.

बर्मा फ्रंटवरून........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 27/03/2011 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, माझ्या मराठालाईट इन्फंट्रीच्या आभ्यासादरम्यान हे एका सैनिकाने त्याच्या प्रेयसीला लिहीलेले पत्र सापडले. त्याचे भाषांतर केले आहे. सैनिकांची मनस्थिती यात बरीच समजून येते. हे पत्र बर्माहून लिहीले आहे. प्रियतमे, पंख असते तर तू उडत येथे आली असतीस असे सारखे म्हणतेस, पण खरंच तुला येथे यायला आवडेल का ? तुला आवडेल की नाही हे मला माहीत नाही पण तू येथे आलेले मला आवडणार नाही हे निश्चित. येथे येण्यात धोके आहेत, नाही असे नाही, पण याही पलीकडे काही कारणे आहेत. धोके तर आमच्या आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत.