Skip to main content

हर्षा!!!

लेखक किसन शिंदे यांनी बुधवार, 27/04/2011 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
बरी-वाईट कशीही का असेना माझी ही पहिली कथा तात्यांना अर्पण...:) "हर्षा काल का नाही आलीस गं?" लॅपटॉप उघडून मी ऑफिसचे करतच बसले होते, तेव्हढ्यात दरवाज्यातून आत येणाऱ्या हर्षाला मी विचारलं. "सॉरी गं ताई, खूप काम होतं घरी म्हणून येत आलं नाही." चेहऱ्यावर असलेली निराशा क्षणभर बाजूला सारत हर्षा बोलली खरी पण तिचा चेहराच इतका बोलका कि, काहीही न सांगता मला खूप काही बोलून जातो. हर्षा!! एक अल्लड अनं निरागस मुलगी. गोरा वर्ण, बोलके डोळे, हसरा चेहरा आणि सतत बडबड करण्याची सवय यामुळेच कोणाच्याही लक्षात रहावी अशी.

जेवणाऐवजी मिल्क शेक?

लेखक खादाड अमिता यांनी मंगळवार, 26/04/2011 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात माझे एक क्लायन्ट, श्री जोशी, एका नवीन कंपनीचे 'वेट लॉस प्रोटीन शेक' त्यांच्या मित्राकडून (विकत) घेऊन आले. मी विचारल्यावर, 'मॅडम, ते माझे अगदी बालपणा पासूनचे मित्र आहेत. ते आणि त्यांची बायको, गेल्या ५ वर्षांपासून हे प्रोटीन (प्रथिन) शेक घेत आहेत. त्यांचे १२ किलो वजन कमी झालंय! त्यांच्या आग्रहाला मी बळी पडलो. तुमचं डाएट तर करतोच आणि शिवाय हे प्रोटीन शेक पण घेऊन बघतो. काही पण करून वजन कमी झालं, तर माझा फायदाच आहे न!' जोशी साहेबांच्या मित्राने समजावल्या प्रमाणे- त्यांनी दिवस भरात तीनदा त्या प्रोटीन शेक चं एक पाकीट २५० मिली दुधात घालून प्यायचा होतं.

ऑलीएंडर हॉक मॉथ

लेखक jaypal यांनी सोमवार, 25/04/2011 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
शरद काकांचा धागा वाचुन स्फुर्ती घेतली.

ऑलीएंडर हॉक मॉथ

लेखक jaypal यांनी सोमवार, 25/04/2011 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
शरद काकांचा धागा वाचुन स्फुर्ती घेतली.

हत्ती, घोडे, उंट!

लेखक रेवती यांनी सोमवार, 25/04/2011 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
दोन महिन्यापूर्वी चिरंजिवांचा शाळेतला चेसक्लब बंद झाला आणि टाऊनच्या लायब्ररीत दर दोन अठवड्यांनी होणार्‍या बुद्धीबळ स्पर्धेला जायला सुरुवात झाली. अर्थातच बाबा त्याला घेऊन जात असतात. गेल्या दोन अठवड्यांपासून मात्र मलाही तयारीत ओढण्यात आले......... म्हणजे त्यांच्या गटातून बाहेर काढले गेले. डाव चालू असताना मध्येच येऊन जेवणासारख्या कमी महत्वाच्या गोष्टींसाठी न बोलावणे, दिनक्रमाची सक्ती न करणे, हत्ती, घोड्यांच्या भाषेत बोलल्यासच म्हणणे ऐकणे, असे प्रकार सुरु झाले. भारतीय क्लबतर्फे दरवर्षी होणारी बुद्धीबळ स्पर्धा जवळ आल्याची सगळी लक्षणे होती.

एका व्यथित सॉफ्टवेअर इंजिनियरचे मनोगत!

लेखक विनीत संखे यांनी गुरुवार, 21/04/2011 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
शैशव, बाल्य, पौगंड, तारूण्य, गृहस्थ अन वार्धक्य अशा षटजीवनावस्थांमध्ये कैचर्य (असा शब्द कदाचित मराठीत सापडतो) किंवा कचेरीगिरी (साध्या भाषेत ऑफिसमनशिप) अंतर्भूत करावी असे माझ्यासारख्या नोकरमाणसाला वाटते. नवतारूण्याअंती, गृहस्थांगी अन वार्धक्यापूर्वी आपण आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा कालखंड खेचर म्हणून एका मळ्यात ओझं वाहत सोसतो. हे मळं म्हणजे ऑफिस होय. इंग्रज जाता जाता भारताला हा नोकरपणा आंदण देऊन गेले. तारुण्यसुलभ "जग जिंकायची इच्छा" ही उपजतच सगळ्यांत असते.

सरुटॉबाने कट्टा - एक सुरुवात

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 19/04/2011 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
१७ एप्रिल,रात्रीचे साडेसात वाजलेले, पुण्याच्या हद्दीबाहेर थोड्याश्या सुनसान रस्त्याच्या बाजुला एका मोठ्या इमारतीसमोर दोन धिप्पाड तरुण थोड्याश्या अंधारात उभे. समोरुन एक गाडी येते, कर्र्र्र्र्र ब्रेक दाबुन बंद पडते, एक दोन वेळा सुरु होते पुन्हा बंद पडते, त्या दोन्ही तरुणांच्या चेह-यावर हसु येतं, त्यांचे हात खिशात जातात, पुढ्च्याच क्षणी बाहेर येतात, तेवढ्यात गाडी पुढं जाते, त्या तरुणांचे हात पुन्हा खिशात. ते परत अंधारात सरकतात. गाडी थोडी पुढं जाउन पुन्हा त्या तरुणांच्या दिशेने येते, पुन्हा कर्र्र्र्र्र्र ब्रेकचा तोच आवाज पण यावेळी गाडितुन दोघं जण खाली उतरतात, त्या तरुणांच्या दिशेनं जायला लागतात.