कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस...
१.
मुंबैचा चोरबाजार. म्हणजे गोल देउ़ळ, भेंडीबाजारचा भाग. या चोरबाजाराबद्दल पुन्हा केव्हातरी सवडीने आणि डिट्टेलमध्ये. इथे काय काय मिळू शकतं, त्याचे भाव काय असतात, भावाची घासाघीस कशी चालते, अवचित गुंडगिरी-दादागिरी कशी चालते ते सगळं मी अनुभवलं आहे.