Skip to main content

तिची नशा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 08/05/2011 06:24 या दिवशी प्रकाशित केले.
थंड झुळका अंगावर येत असाव्यात, शहराच्या गजबटापासून दूर एखाद्या शांत तळ्याकाठी तो दिलनशी बार असावा, अगदी आतल्या अंधाऱ्‍या परमिट रुम ऐवजी बाहेरच हिरवळीवर अड्डा जमवण्याची मुक्त मुभा असावी, संध्याकाळची वेळ, पुनवेचा चंद्रप्रकाश, डीश भरुन ओसंडणारा आवडता चटपटीत चकणा अन् निमुळत्या ग्लाससोबत आवडीच्या ब्रँडची 'ती' उभी असावी! मित्रांनो आलं ना ध्यानात? अशा आल्हादक वातावरणात चंद्रकोरीसारखी शनैःशनैः काळजावर चढणारी तिची मऊ मुलायम नशा शब्दांत पकडता कशी येईल?

शिट्टी अन सोडा

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 02/05/2011 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळा धगधगू लागला की पोटातली भगभग थंड करण्याकामी चौक गाठावा लागायचा. तिथे मन्सूरभाईचा दाढीमय चेहरा आपल्या हातगाडीभोवती जमलेल्या गर्दीतून कधीतरी झळकायचा. तो सतत आपल्या कामात गर्क असलेला दिसायचा. भर उन्हात काहिली कमी करावी म्हणून पावलं आपोआप मन्सूरभाईच्या गाडीकडे वळायची. त्याची हातगाडी म्हणजे रंगीबेरंगी थंड पेयांचं आगरच होतं. बर्फाचा तुकडा किसून छोट्या ग्लासात काडीसह दाबायचा व अखंड बाहेर काढून त्यावर तिरंगी वेगवेगळ्या बाटल्या उपड्या करुन रंगकाम केले की झाला दिलचाहा बर्फाचा गोळा तयार! तो काडीने आडवा धरुन त्यातील थंड गोड पाणी सुर्रऽऽ करुन पिणे म्हणजे रणरणत्या दुनियेत शितलतेचा अमृतवर्षाव ठरायचा.

टक्कल

लेखक utkarsh shah यांनी सोमवार, 02/05/2011 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं काय झालं.... (असा सुरुवात केल्याने सगळे लक्ष देऊन ऐकतात अस अनुभव आणि बहुधा पु. ल. देशपांडेनी पण सांगितलाय... असो.) परवा दिवशी PMT स्टॉपवर उभा होतो. सगळ्या PMT कचरा भरल्यासारखे वाहत होत्या... कोणतीच बस आमच्या स्टॉपवर थांबत नव्हती. रिक्षावाले इतके पैसे मागत होते की त्यात अजुन थोडे पैसे टाकले असते तर एक नेनो आली असती.तर तिथे आमचे एक काका भेटले.काका म्हणजे शेजारी राहत होते.

"आदर्श महिला बचत गट

लेखक सुनिल पाटकर यांनी रविवार, 01/05/2011 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्‍यातील फाळकेवाडी हे अगदी छोटेसे गाव ! गावाची लोकसंख्याही जेमतेम ३५०-४०० . पण या छोट्याशा गावातील दारिद्य्ररेषेखालील महिलांनी एक वेगळाच आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे.हल्ली आदर्श म्हटलं कि अनेकांच्या भुवया वर जातात. पण फाळकेवाडीतील या महिलांनी "आदर्श महिला बचत गटा'द्वारे कडधान्याची शेती केली आहे.

जंक फूड चं घातक जाळं

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 30/04/2011 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी मी माझ्या मैत्रिणी बरोबर जवळच्या मॉल मधे खरीदी करायला गेले होते. सोबत तिचा ३ वर्षाचा मुलगा- रोहन पण होता. मॉल च्या दारातच एक मोठा विदुषक होता जो सर्व मुलांना फुगे देत त्यांच्या 'फास्ट फूड' रेस्टॉरन्ट मधे यायचा आग्रह करत होता. ते बघताच रोहन 'मम्मा फ्राईज' 'मम्मा बर्गर' 'मम्मा आईस्क्रीम' अश्या बऱ्याच विनवण्या व मग हट्ट करू लागला. तिथून त्याला कसं बसं समजावून पुढे निघालो तर तो 'कुकीझ' म्हणून ओरडला. आई तशीच पुढे निघून जातीये हे लक्षात येताच, त्याने तिथेच फतकल मारून चांगलाच गोंधळ घातला. शेवटी वैतागून माझी मैत्रीण त्याला फूड कोर्ट मधे घेऊन गेली आणि त्याचे हट्ट पुरव्ल्यावरच तो शांत झाला.