Skip to main content

राजा रायगड

लेखक गणेशा यांनी रविवार, 19/06/2011 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
३ जुनच्या संध्याकाळीच लोणावळ्यामध्ये कोसळणाऱ्या पावसाच्या सरी धुंद करत होत्या, तरीही मनाला वेध लागले होते उद्याच्या रायगड ट्रेकचे. रायगड हा शब्दच शिवरायांची.. जाणत्या राजाची आठवण मनात उत्तेजित करत जातो.., ६ जून शिवराज्याभिषेक दिन, या पवित्र दिनासाठी रायगडावर जायचे भाग्य लाभते आहे, हेच आमचे नशिब होते. आणि माझे मन भरकटले होते त्यावेळेसच्या दिमाखदार सोहळ्याच्या स्वप्नांमध्ये. त्या वेळीही अशाच सरी कोसळत असतील... अखंड आसमंत शिवाराज्याभिषेक करण्यास उत्सुक असेन.. राज्यातील प्रत्येक माणुस राज्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची अशीच वाट पाहत असेन..

विहीर

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 17/06/2011 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
परसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अप्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या मागच्या अंगणाला लागूनच विहीर होती. आजही आहे. माझ्या बालपणी पंप, नळ वगैरे आधुनिक सेवांचा आम्हाला गंधही नव्हता. रोज विहिरीवरून पाणी भरायला लागायचं. अंगणातल्या माडांना आणि फुलझाडांना विहिरीचंच पाणी काढून घालावं लागायचं. आजोबा या कामात एकदम पुढे असायचे. आम्हाला कळायला आणि झेपायला लागल्यापासून आम्हीही मग त्यांना मदत करायचो. मला आठवतंय, तेव्हापासून विहिरीचं पाणी काढायला दोन रहाट होते. त्याआधी त्यांच्या मध्ये एक तिसरा रहाटही होता, अशी आख्यायिका ऐकायला मिळायची.

जंगल ! चित्रे मुद्दाम मोठी टाकली आहेत. लोड व्हायला वेळ लागेल.. But it's worth it....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 15/06/2011 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
राकेशचा माझ्या सेलवर निरोप आला की रात्री ९.३० वाजता जंगलाच्या सफरीवर निघू. होकार कळवून आम्ही जेवायची गडबड उरकून तयार झालो. आम्ही चौघे माझ्या गाडीत आणि बाबा व त्याचा मित्र त्यांच्या मोटरसायकलवर असे निघालो. माझ्या शेजारी राकेश हातात मोठा टॉर्च घेऊन खिडकीतून बाहेर झाडांवर काही दिसते आहे का ते बारिक नजरेने बघत होता. चालत्या गाडीतून याला असे काय दिसणार असे म्हणून मी मनात हसलो आणि गाडीचा वेग खूपच कमी केला. पण बेट्याची नजर भलतीच तयार होती हे थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले. थोड्याच वेळात राकेशने गाडी थांबावायला सांगितली आणि आम्ही खाली उतरलो.

आणि दरवाजा तोंडावर बंद झाला.. किस्सा नवी दिल्लीचा .

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 15/06/2011 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट हवाईदलातील ... असे अनेक प्रसंग येतात कि तेंव्हा काय करावे सुचत नाही. धीर धरून त्यातून मार्ग काढला तर अनपेक्षित परिणाम होतो. माझ्याबाबत असे अनेकदा घडले. पैकी एक किस्सा... हवाईदलाच्या पोलिसांची व्हॅन. पुढे मी, वेस्टर्न एयर कमांड कँपसचा सिक्युरिटी ऑफिसर म्हणून. मागे दोन रिव्हॉल्वरधारी बळकट एयर वॉरियर साथिदार. नवी दिल्लीतील रिंग रोड वरून डिफेंन्स कोलोनीच्या एका कोठीपाशी आम्ही थांबलो. कडक गणवेष, वर पीक कॅप, हातात व्हीआयपीची ब्रीफकेस मागे दोन हत्यारबंद सहकारी, असा मी ऐटीत घराची घंटी वाजवून दरवाजा उघडायची वाट पहात उभा. किलकिला दरवाजाकरुन आतल्या व्यक्तीने अंदाज घेतला.

' वर्षा सहल - ०१ - जुन २०११

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 14/06/2011 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
चिंब भिजलेले.... तुम्हाला हे गाणं माहितच असेल ना, चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. काय नाही माहीत, असं कसं होईल, एवढं फेमस गाणं अन माहीत नाही, बघा बघा आठवा, छान पाउस पडतोय, आणि आजुबाजुला हिरवाई आहे, पाना पानातुन थेंब टपकताहेत आणि लांब कुठंतरी नदीच्या उफाणाचा आवाज येतोय, नेहमी करपट वाटणारे दगड पण जिंवत वाटतात, आणि त्यावेळी मनात हे गाणं घुमायला लागतं.. चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले.. नाही आठवलं अजुन, अवघड आहे मग...

एक शोकांतिका

लेखक शरद यांनी सोमवार, 13/06/2011 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच वर्षांपूर्वी दिवे आगरला गेलो होतो. सोन्याच्या गणपतीची मूर्ती सापडून त्याचे देऊळही बांधून झाले होते.ही काही पूजेतील मूर्ती नक्कीच नव्हती; पण धंदा जोरात चालला होता. दुर्वा, फुले, नारळ यांना चढ्या भावातही चांगले गिर्‍हाईक मिळत होते. पर्यटन क्षेत्र, धार्मिक क्षेत्र नव्हे, म्हणून दिवे आगरचे भविष्य सगळ्यांना, विशेषत: स्थानीकांना लक्षात येऊ लागले होते. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातले चढे भाव लोकांना खुणावत होते. पुण्यात ६ रुपयांना मिळणारा मोदक तेथे आठ रुपयांना मिळत होता. समुद्र किनारा, वाड्या इतरत्र कोकणांत असतात तश्याच होत्या पण त्यांचे गुणवर्णन केले जात होते.

..बेंगलोर पासपोर्ट सेवा केंद्रामधील गम्मत..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 08/06/2011 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझा पासपोर्ट नुकताच एक्स्पायर झाला त्यामुळे नव्या पासपोर्टसाठी अर्ज केला होता. मोठ्या मुश्किलीने अर्ज केल्यानंतर दोन महीन्यांनी पासपोर्ट सेवा केंद्रात अपॉईंटमेंट मिळाली. जाताना पुन्हा हेलपाटा नको म्हणुन लागणार्या सर्व कागदपत्रांची दोन दोन झेरोक्स प्रत बरोबर ठेवली होती. थोडक्यात माशी कुठेही शिंकु नये ह्याची योग्य खबरदारी घेतली होती. पण शिंकायची तिथे माशी शिंकलीच. माझे अप्लिकेशन फेटाळुन लावण्यात आले. कारण.. माझ्याकडे माझे स्वतःचे अ‍ॅड्रेस प्रूफ डॉक्युमेंट नव्हते. पण मी विवाहीत आहे आणि माझ्या पत्नीच्या नावाचे तसे डॉक्युमेंट आहे. त्यामुळे माझ्या बाळबोध बुध्दीनुसार माझे मॅरेज सर्टिफिकेट आणि बायकोच