जंक फूड चं घातक जाळं
शनिवारी मी माझ्या मैत्रिणी बरोबर जवळच्या मॉल मधे खरीदी करायला गेले होते. सोबत तिचा ३ वर्षाचा मुलगा- रोहन पण होता. मॉल च्या दारातच एक मोठा विदुषक होता जो सर्व मुलांना फुगे देत त्यांच्या 'फास्ट फूड' रेस्टॉरन्ट मधे यायचा आग्रह करत होता. ते बघताच रोहन 'मम्मा फ्राईज' 'मम्मा बर्गर' 'मम्मा आईस्क्रीम' अश्या बऱ्याच विनवण्या व मग हट्ट करू लागला. तिथून त्याला कसं बसं समजावून पुढे निघालो तर तो 'कुकीझ' म्हणून ओरडला. आई तशीच पुढे निघून जातीये हे लक्षात येताच, त्याने तिथेच फतकल मारून चांगलाच गोंधळ घातला. शेवटी वैतागून माझी मैत्रीण त्याला फूड कोर्ट मधे घेऊन गेली आणि त्याचे हट्ट पुरव्ल्यावरच तो शांत झाला.
आपण सगळ्यांनीच अश्या मुलांना मॉल मधे, शाळे बाहेर, किराणा च्या दुकानात, ई. असा गदारोळ घालताना बघितलं असेल. तात्पर्य हे, की आज आपल्याला पदोपदी जंक फूड ला सामोरं जावं लागतं- विशेष करून अश्यावेळी जेव्हा आपल्याला खूप भूक लागलेली असते, दिवसभर काम करून दमलेलो असतो, घरी संपूर्ण स्वयंपाक करायला वेळ नसतो किंवा जेव्हा आपण करमणुकीसाठी बाहेर पडतो. तर हे जंक फूड म्हणजे नक्की काय असतं? जंक फूड म्हणजे असे पदार्थ ज्यातून आपल्याला, प्रमाणात कमी खाऊन पण खूप जास्त, एम्प्टी कॅलरी मिळतात. म्हणजे ज्यात बाकी काहीच पोषण नसते- जसं की प्रथिने, जीवन सत्व, खनिज , फायबर ई. अश्या ह्या जंक फूड चे दुसरे वैशिष्ठ्य म्हणजे त्यात सोडियम, फॅट आणि साखरेचे प्रमाण बरंच जास्त असते. काही संशोधनात आढळून आलंय की प्रत्येक व्यक्ती ची जंक फूड ची भिन्न परिकल्पना असली तरी सगळेच त्यात फ्रेंच फ्राईज, चिप्स, आईस्क्रीम, बर्गर, पिझ्झा, केक/पेस्ट्री, ईन्स्टन्ट पास्ता/ नूडल्स चा समावेश करतात. पण त्या व्यतिरिक्त चॉकलेट/ गोळ्या, चुईंग गम, प्रोसेस्ड रेडी टू ईट पदार्थ जसे सॉसेज, सलामी, चिकन नगेट, फिश कटलेट, पराठे, समोसे आणि शुगर/चॉकलेट कोटेड ब्रेकफास्ट सीरिअल (हो, हे पण!) - जंक फूड असतात.
वारंवार जंक फूड (आठवड्यातून एकदा खाणं पण जास्त असतं) खाल्ल्याने लहान मुलांच्या एकाग्रते वर विपरीत परिणाम होतात. वाढत्या वयात एवढ्या अतिरिक्त कॅलरी पोटात जाऊन त्यांच्या चरबी साठवणारया पेशींची वाढ होते व फक्त लहानपणीच नाही तर प्रौढावस्थेत पण त्यांचा जाड होण्याकडे कल वाढतो. हल्लीच झालेल्या एका अध्ययनात लक्षात आलंय की जंक फूड खाण्याचे पण व्यसन लागू (असू) शकते. अश्या व्यक्तींना जर जंक फूड खायला मिळालं नाही तर ते अस्वस्थ होऊन त्यांना कशातच रुची वाटत नाही. जंक फूड ने लट्ठपणा तर वाढतोच, शिवाय हायपर टेन्शन (हाय ब्लड प्रेशर), मधुमेह, हाय कॉलेस्टेरॉल, मज्जातंतूंचे विकार- ह्याची पण शक्यता वाढते.
सगळ्यांना माहित आहे की जंक फूड खाणं हेल्दी नसतं तरी पण ते पूर्णपणे टाळणं का अवघड होतं?
- आपल्या एवढ्या धकाधकी च्या जीवनात आपल्याला वेळ खूप कमी पडतो. साहजिकच स्वयंपाका मागचा वेळ पण आपण कमी करू बघतो. ऑफिस मधून दमून आल्यावर रेडी टू ईट पराठा मायक्रोवेव्ह मधे गरम करून खाणं त्यावेळी 'घरी' पराठा बनवण्यापेक्षा सोपं असतं.
- सहजतेने घरपोच गरम गरम मिळणारे पंजाबी, चायनीज व पिझ्झा सारखे जेवण.
- जागोजागी आकर्षक पॅकीन्ग मधे दिसणारे चिप्स व स्नॅक्स
- जंक फूड ची लोभाव्णारी चव व किंमत. उ.दा. 'मोठा पिझ्झा वर लहान मोफत', 'मिडीयम पिझ्झा वर पेस्ट्री मोफत'
- टी.व्ही., रेडियो, इन्टर्नेट व इतर माध्यमातून होणारे सतत जंक फूड चे मार्केटिंग.
अश्या कारणांना आपण बळी पडतो.
मग ह्यावर उपाय काय?
-आठवड्या भराचे दोन्ही वेळ चे जेवण व स्नॅक्स प्लॅन करून लिहून ठेवा. म्हणजे रविवारीच किती/काय फळं भाज्या आणायच्या आहेत ह्याचा अंदाज येईल आणि रोज 'आता जेवणाला काय करायचं' हा प्रश्न संकटासारखा समोर येणार नाही.
-घरातल्या 'सर्वांची' मदद घेऊन जास्तीत जास्त घरी स्वयंपाक करून खा.
-लहान मुलांप्रमाणेच आपल्या पण भुकेच्या वेळी लक्षात ठेवून त्यावेळी खायला एखादं फळ, चिवडा (घरी केलेला), चणे दाणे सोबत ठेवा.
- तुमच्या फ्रीज मधे फ्रोझन प्रोसेस्ड फूड, आईस्क्रीम असे पदार्थ आणून ठेवूच नका, म्हणजे आपोआप ते वेळी अवेळी खाण्याचा मोह होणार नाही.
वर्गीकरण
आमच्या सारख्या बॅचलर लोकांच काय
ओबेसिटी
शंका
माझा प्रतिसाद उडालेला दिसतोय.
In reply to शंका by नितिन थत्ते
घरी
लेखन आवडले. घरगुती स्नॅक्स
चान चान!
सगळेच लेख वाचतोय. काहिंना
प्रश्न...
In reply to प्रश्न... by सूर्यपुत्र
>> >>>आणलेली फळं(सालीसकट)
In reply to प्रश्न... by सूर्यपुत्र
गावंढळ प्रतिउत्तर
In reply to गावंढळ प्रतिउत्तर by chipatakhdumdum
?
In reply to ? by पंगा
........पण 'मार्मलेड' नावाचा
उत्तम लेख!! बघुया यातलं काय
अरेरे!
आई तशीच पुढे निघून जातीये हे
In reply to आई तशीच पुढे निघून जातीये हे by प्रभाकर पेठकर
प्रतिसाद
जंकफूडइतकीच कार्बोनेटेड शीतपेये घातक...
In reply to जंकफूडइतकीच कार्बोनेटेड शीतपेये घातक... by योगप्रभू
लिंबू सरबत आणि कोकम सरबतात
In reply to लिंबू सरबत आणि कोकम सरबतात by नितिन थत्ते
घरगुती सरबतात साखर कमी असते, इतकेच सांगू शकेन..
In reply to जंकफूडइतकीच कार्बोनेटेड शीतपेये घातक... by योगप्रभू
साखर ....
In reply to साखर .... by प्रभाकर पेठकर
डबा = टिन = ३३० मिलि धरले तर
In reply to डबा = टिन = ३३० मिलि धरले तर by नितिन थत्ते
जाळीव साखर...
In reply to जाळीव साखर... by प्रभाकर पेठकर
नॉन कोला पेये
In reply to नॉन कोला पेये by नितिन थत्ते
निर्णय..
In reply to निर्णय.. by प्रभाकर पेठकर
ओके
In reply to निर्णय.. by प्रभाकर पेठकर
पेठकर काका! काही संदर्भ देईन म्हणतो..
In reply to पेठकर काका! काही संदर्भ देईन म्हणतो.. by योगप्रभू
>>त्यामुळे 'कृत्रिम शीतपेये
In reply to >>त्यामुळे 'कृत्रिम शीतपेये by नितिन थत्ते
हे मासिक केवळ छापील आवृत्तीत आहे...
In reply to पेठकर काका! काही संदर्भ देईन म्हणतो.. by योगप्रभू
नुसती साखर नाही....
In reply to नुसती साखर नाही.... by प्रभाकर पेठकर
+१
In reply to +१ by नितिन थत्ते
सरसकट अमूक कॅटॅगरीतले (पक्षी-
चांगला लेख! श्री. पेठकर यांचा
In reply to चांगला लेख! श्री. पेठकर यांचा by स्वाती२
?
In reply to ? by पंगा
जंक फूड न खाणे/ कमी खाणे हे
In reply to जंक फूड न खाणे/ कमी खाणे हे by स्वाती२
'जस्ट वॉटर, नो आईस' हे सांगणे
In reply to जंक फूड न खाणे/ कमी खाणे हे by स्वाती२
इतर!
चांगला लेख
In reply to चांगला लेख by प्रियाली
सवय....
In reply to सवय.... by प्रभाकर पेठकर
सवय लागणे
जळ्ळ्यां त्या पालेभाज्याच
छान..