Skip to main content

According To Accordion

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 08/05/2012 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
निमित्त होतं ते Accordion या जादुई वाद्याच्या १८३व्या वाढदिवसाचं... मा.चौराकाकांच्या मुळे मी व मोदक (दिनांक ६ मे रोजी) या एका अभूतपूर्व कार्यक्रमाचे सह-भागी होऊ शकलो...होय सहभागीच..!

मनाची कवाडे बंद करु नका...

लेखक योगप्रभू यांनी मंगळवार, 08/05/2012 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
(पैसा सोडून बोल.. हा धागा नुकताच वाचला. तिथे प्रतिसाद फारच लांबलचक झाला असता म्हणून हा स्वतंत्र धागा) ................................................................................................................................. आयुष्यात पुष्कळदा आपल्याला मनस्ताप देणारे अनुभव येतात. विशेषतः आपण विश्वास टाकून मित्र म्हणवणार्‍यांना रक्कम उसनी देतो, पुस्तके वाचायला देतो, वस्तू वापरायला देतो आणि ते त्याची किंमत ठेवत नाहीत. देणे खुशाल बुडवतात, पुस्तके लंपास करतात, वस्तू मोडतोड करुन परत देतात. आपलेच पैसे आपल्याला वारंवार मागायला लावतात. सबबी सांगतात.

सूर तेच छेडिता- एक संध्याकाळ अमिट(त) "अ‍ॅकॉर्डियन" बरोबर !

लेखक चौकटराजा यांनी सोमवार, 07/05/2012 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रि वाहिनीवर अमित वैद्य या पुणे स्थित कलाकाराची अ‍ॅकॉर्डियन वादनाची झलक दाखविणारी मुलाखत पाहिल्यानंतर वर्तमानपत्रात अशाच कार्यकमाची जाहिरात ही पहायला मिळाली.व कार्यक्रम विनामुल्य असल्यामुळे चिंचवड ते पुणे असे अंतर काटण्यास मन लगेचच तयार झाले. मोदक पुण्यातून आपले काम आटपून कार्यक्रमाच्या जागी भेटणार होता. मी दुपारी साडेतीनच्या सुमारास निघालो. रविवार असल्याने रस्त्यावर रहदारी बेताचीच. साडेचार चे सुमारास पुण्यात पोहोचून मग डेक्क्नवर इकडे तिकडे भटकत टाईम पास चा कार्यक्रम केला.व नव्यापेठेतील गांजवे चौकात आलो. पत्रकारभवन शेजारी कार्यक्रम होता म्हणून अंदाजानेच एका इमारतीत घुसलो,.

उपासाचा किस...(घेतला का कधी?)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 07/05/2012 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
बराच वेळ मनाशी मी हाच विचार करत होतो की उपासाला नेमका हा किस कसा चालतो..? उपासाला जड असे काहिच खायचे नसते..म्हणे! मग हे कसे चालते..? बारश्याला तेराव्याचे गाणे? खिचडी काय..नी..किस काय? हलके थोडेच असतात..होय? माणसे कशी शोधुन काढतात उपवासालाच सुखाची सोय? उपवसाला शास्त्रात म्हणे निराहार ही संज्ञा आहे पण लोक केवढा किस काढतात की पाहुन वाटतं..काय हे..? खिचडी काय...नी थालपिठं काय सगळं जडच खातात तर काहि दुसरं टोक गाठणारे पाणी पिऊन उपाशी रहातात. तुंम्ही म्हणाल,जाऊ द्या हो... ज्याची त्याची अवड..! मी म्हणतो,,बा धर्मा.. आता तुझ्या अस्थी सावड धर्म ही अफूची गोळी हे वचन आज मला पटलं आणी त्यांना ग

पैसे सोडून बोल...

लेखक धन्या यांनी सोमवार, 07/05/2012 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
पंधरा दिवसांपुर्वीची गोष्ट. लोकेश, माझा क्युबिकलमेट मला अचानक म्हणाला, "सरजी थोडा हेल्प चाहीये." लोकेश आणि मी गेले वर्षभर एकाच क्युबिकलमध्ये बसतोय. दोघांचंच क्युबिकल. त्यामुळे आम्ही फक्त कलीग न राहता बर्‍यापैकी मित्र झालो आहोत. माझ्याच वयाचा आहे तो. लग्नाला तीन वर्ष झालेली. एक छोटी मुलगीही आहे त्याला. त्यामुळे अधूनमधून पाच दहा हजार मागायचा माझ्याकडे. आठवडयाभरात परतही करायचा. आताही त्याने असेच पैसे मागितले. पण थोडे जास्त. तीस हजार. "क्यूं रे इतना? कुछ प्रॉब्लेम हैं क्या?" "अरे नही सरजी. एक दोस्त को बहुत जरुरत हैं. आप दे दो.