Skip to main content

रंगात रंगलो मी - रंगाविना

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 26/05/2012 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
रसिक मित्रहो, नव्या तंत्रज्ञानाच्या युगाने आपल्याला अनेकविध साधने आपल्या मनोरंजनासाठी दिली, आपल्या आनंदाच्या निधानाच्या निकट जाण्याची संधी दिली. संगणक क्षेत्रात सहा फूट बाय चार फूट बाय तीन फूट या आकाराच्या संगणकावर कामाची संधी मिळाली.पण तेथे आजच्या हपिसांसारखी " चंगळ" करण्याची संधी नव्हती. एकाच रंगाचा मॉनिटर, एकच ओळ दुरूस्त करता येणारा " एडीटर" व आठ एम बी च्या दोन हार्डडिस्क ई च्या दिव्य कॉनफिगरेशन वर काम करता करता पी सी एक्स टी आला. मग क्विक बेसिक मधे रनिंग लाईट , गणपतीची आरास ,बीप चा वापर करून जन गण मन ई. उद्योग इतकी तरी " चंगळ" वाट्याला आली. मग आपल्या घरी पी सी आला रे आला .

'रम्या' चा एक नयनरम्य, सर्वांग-सुंदर नृत्याविष्कार.

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 26/05/2012 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
थोडीशी पार्श्वभूमी: सुमारे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. एकदा सहज टीव्ही वाहिन्यांची चाळवाचाळव करत असता एका 'मद्रासी' सिनेमातील नृत्य चाललेले दिसले. नर्तिका आकर्षक होती, तिचे काहीसे शृंगारिक हावभाव, पार्श्वभूमीला मंदिराच्या प्रांगणात चाललेले विविध गतिमान कलाविष्कार, संगीतातील आणि एकूण चित्रीकरणातील नाट्यमय गतिमानता इतकी भावली, की ते गाणे पुन्हा पुन्हा बघावे, ऐकावे, असे वाटू लागले.

दक्षिणायन

लेखक अमृत यांनी बुधवार, 23/05/2012 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
'एक्कड की सार?' ऑटोवाल्याचे शब्द कानावर पडले तसा मी भानावर आलो. 'सार... मिटरसे चलते सार?' 'हा जुबिली हील्स जाना है चलो' ऑटोत बसलो तसा परत मुसळभार पाऊस सुरू झाला. काल दिवसभरापासून याने पिच्छा पुरविला होता. २७ तासांचा शिणवणारा प्रवास त्यात कडी म्हणजे तिनहीवेळा जेवणात खावा लागलेला 'राइस', सोबतीला कुणीच नाही आणि प्रत्येक स्टेशनवर थांबा घेणारी ट्रेन अरेरे सगळच 'सोनेपे सुहागा'. गेल्या महिनाभरापासून या राइसने नाकी नऊ आणले होते. त्रिवेंद्रमचं एक महिन्याचं ट्रेनिंग कसं पटकन संपलं काही पत्ताच लागला नाही. या काळात ट्रेनिंग कमी आणि संपूर्ण केरळचं टुरिंग मात्र मस्त झालं.

टाकाऊ पिम्पापासून शोभेचा पिंप.

लेखक सौरभ उप्स यांनी सोमवार, 21/05/2012 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, टाकाऊ पिम्पापासून शोभेचा पिंप मी तयार केला त्याबद्दलचा अनुभव आणि तो कसा केला याबद्दल थोडेफार.. माझ्या लहानपणी मला सांभाळलेल्या व् आमच्या शेजारच्या जोशी काकूंनी माझी चित्रे लहानपणापासून पाहिली होती, आणि सध्याच माझ क्षेत्र ही कलेतच आहे हे त्यांना माहित होत....

मस्करी

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 18/05/2012 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
तसा मी शक्यतो कूणाची मस्करी करायला जात नाही.कारण कधी-कधी मस्करी मूळे पार वाट लागते.पण कधी-कधी काही जण असे काही बोलून जातात, की मग त्यांची थोडी मस्करी केल्याशिवाय राहवत नाही. मागच्या आठवड्यात पण असेच झाले.मी आणि मूलगा इंटरनेट थ्रु गप्पा मारत होतो. ...म्हणजे मी परदेशात नौकरी करण्याइतपत माझे शिक्षण झाले असून, दोन्ही घरातील इंटरनेटचा खर्च मी भागवू शकतो, हे तूमच्या लक्षांत आले असेलच.बायकोला घाबरून पळून गेलो, हे जगमान्य सत्य माझ्या आयुष्यात पण सत्य झाले, हे देखील लक्षांत आले असेलच... तेव्हढ्यांत मूलाचा मित्र आला. ...तो कसा आला? बेल वाजवून की कडी वाजवून?

नाजूक - साजूक

लेखक तिमा यांनी मंगळवार, 15/05/2012 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
एका लग्नाला नुकताच गेलो होतो. संध्याकाळी ७ ते १० अशी वेळ दिली होती म्हणून साधारण पावणेआठ वाजता पोचलो. तरीही प्रथेनुसार नवरा-नवरी स्टेजवर आलेच नव्हते. यजमान सर्वांना आधी जेवून घ्या असा प्रेमळ आग्रह करत होते. पण माझे दुसरे एक मित्र यायचे होते त्यामुळे त्यांची वाट पहायची ठरवून एका पांढर्‍याशुभ्र कव्हराच्या गुबगुबीत खुर्चीवर विसावलो. आजुबाजुला सुंदर सुंदर ड्रेसेस व साड्या नेसलेल्या (पाण्याला 'अ‍ॅव्ह' म्हणतील अशा) ललना विहरत होत्या. अनेक संभाषणे कानावर पडत होती. पण एका वैशिष्ठ्यपूर्ण बोलण्याने माझ्या कानांचा ताबा घेतला. " हाय,... अगं किती दिवसांनी भेटतोय आपण!

बेस्ट फ्रॉम वेस्ट

लेखक jaypal यांनी बुधवार, 09/05/2012 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
एका टिकाउ बायकोचा टाकाउ परंतु टिकाउ परकर घ्यावा. हा असा parkar1 नाडीच्या बरोबर अपोझिट साईडच्या ओपनिंगला चांगल्या टेलर कडुन कचकचीत टिकाउ टिप मारुन घ्या. आता या पोतडी मधे अपापल्या आवडीचे किंवा नावडीचे (किंवा पुर्वी सारखे ;-)अडगळीचे)सामान सवडीने भरा. म्हणजेच त्या परकराला गत वैभव प्रप्त करुन द्या. मी सध्या गहु भरुन ठेवले आहेत. parkar2 हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.चुकभुल माफी असावी. सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो

आठवण

लेखक रणजित चितळे यांनी बुधवार, 09/05/2012 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही जेवायला बसलो होतो. संध्याकाळचे एकत्र जेवण. अस्मादिक, बायको व मुलगा एकत्र जेवायला बसले की एकत्र जेवण असे म्हणायचे. आता एकत्र कुटुंब राहिलेले नसले, तरी जेवण एकत्र असते. पुढच्या पिढीत त्यालाही फाटा फुटेल कदाचित. विविधभारतीवर लागलेल्या "मेरी मा" हे "तारे जमीन पर" ह्या चित्रपटातले गाणे ऐकताना, एकदम माझ्या आठवणीची तार लताच्या "प्रेमा स्वरूप आई" ह्या गाण्याशी जोडली गेली. जेवता जेवता क्षणभर खूप वर्षांपूर्वीचा गोड्या मसाल्याचा तोच घमघमाट नाकात दरवळळ्याचा भास झाला. आई जाऊन बरीच वर्ष लोटली होती.