बडबड गीते/ बालगीते

अव्यक्त's picture
अव्यक्त in काथ्याकूट
24 Jun 2012 - 11:49 pm
गाभा: 

..बालगीते/बडबडगीते मनाला कित्ती आनंद देवून जातात ह्याचा प्रत्यय मी नुकताच अनुभवलाय... त्याच अस्सं झाला माझा ८ महिन्याचा मुलगा चि. शौनक बालसुलभ लीला करत होता, तो आणखी रमावा म्हणून मी बडबड गीतांची एक सी डी लावली..."चांदोबा चांदोबा भागलास काय ?" त्यावेळ्स अस्मादिकांच्या सौ.ने तिच्या बालपणी ऐकलेल्या प्रसिद्ध गायिका राणी वर्मा ह्यांच्या बालगीते /बडबडगीते ह्यांच्या आठवणींना उजाळा दिला..."एक होत्ता उंदीर मामा इटुकला पण धीतुकला...भारी बेटा अक्कलवाला, डोकेबाज..." बरेच दिवस मी ही आणि अशीच असंख्य बडबडगीते शोधतो आहे, पण ती अद्याप मिळाली नाहीत...कोणाला ह्या बालगीताच्या सी डी चे नाव माहित आहे काय किवा ह्या अश्या राणी वर्मांच्या बालगीते कोणाकडे असतील तर कृपया mp3 स्वरुपात द्यावीत.... आणि अजून अशा प्रकारचीच काही प्रचलित/अप्रचलित बालगीते /बडबडगीते मला द्यावीत ही विनंती....मला माहित आहे की मिसळपाव वर बर्रेच रसिक आणि जाणकार तज्ञ ह्यांचा राबता असतो..त्यामुळे भरघोस प्रतिसाद अपेक्षित आहेच...तसदीबद्दल क्षमस्व...लोभ असावा..

ता.क. मला बाजारात मिळालेली सी डी original sound track मध्ये नाहीत...तरी original sound track अपेक्षित आहे. मी आणलेल्या सी डी पुढील गाणी आहेत पण ती ओरीगीणाल गायिकेनी गायलेली नाहीत.. असावा सुंदर choclate चा बंगला, झुक झुक झुक झुक अगीन गाडी, सांग सांग भोलानाथ, ससा रे ससा, किलबिल किलबिल पक्षी बोलती असे आणि अनेक गाणी हवी आहेत.

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

25 Jun 2012 - 12:21 am | श्रीरंग_जोशी

ससा कसा होता कसा,
कासवाला पाहून हसा
कशाला मिळवावा ऐसा झटपट दुप्पट पैसा,

कासवानं पैसे जमा केले हळू हळू,
अल्पबचतीचा लाभ त्याला लागे कळू,

झटपट दुप्पट कंपनीला लागलं कुलूप
ससा रडे कासवाला पैसा मिळे खूप...!

अल्पबचत संचालनालय महाराष्ट्र राज्य यांची आमची वाहिनी सह्याद्री वाहिनीवरील ही जुनी जाहिरात मी गेली अनेक वर्षे माझ्या भाच्या पुतण्यांना ऐकवतोय. दुर्दैवाने त्याची चित्र किंवा ध्वनिफीत जालावर मिळू शकली नाही. योगायोगाने ही फीत आपल्याला मिळाल्यास मलाही पाठवा.

बाकी आजकाल गाण्यांच्या मूळ फिती मिळवणे अवघड झालेले आहे.
कर्वे रस्ता, पुणे येथील प्रसिद्ध अलूरकर म्युझिक हाउस मध्ये मिळू शकतील असा अंदाज आहे. त्यांचा दूरध्वनी क्र. ०२०-२५४४०६६२ हा आहे.

पुरुषांनी म्हणायचे अंगाईगीत म्हंटले की 'रवी गेला रे सोडूनी अवकाशाला नीज नीज माझ्या बाळा' आठवते. कारण माझे वडील मला व धाकट्या भावाला झोपवताना ऐकवायचे. हे गाणे ही जालावर अजून मिळालेले नाही. प्रयत्न सुरू आहे.

संजय क्षीरसागर's picture

25 Jun 2012 - 12:41 am | संजय क्षीरसागर

काय गाण लिवताय राव! लेखक काय मोलकरणीला अंगाई गीत नाही म्हणताये.

श्रीरंग_जोशी's picture

25 Jun 2012 - 1:21 am | श्रीरंग_जोशी

अहो लहान बाळं पण तीच तीच गाणी ऐकून कंटाळतात, मग अशी गाणी ऐकली की खूश होतात.
अर्थात सुरांना चेहऱ्यावरचे भाव व लयबद्ध शारीरिक हालचालींची जोड हवी. म्हणजे सस्याचे गाणे म्हणताना हत्तीचे सोंग आणू नये...!

अन लेखकांना हे काम अजून काही वर्षे करावे लागणारच नं.

तुम्ही राँग गाणं दिलय

श्रीरंग_जोशी's picture

25 Jun 2012 - 1:41 am | श्रीरंग_जोशी

एक प्रश्न - तुम्ही मूळ चित्रफीत पाहिली आहे का? ही जाहिरात लागायची सायंकाळी ७ च्या बातम्या संपल्यावर. ऍनिमेशन सुरेख होते. माझ्या भाच्या पुतण्यांनी या गीताचा नेहमीच आनंद लुटला. त्यांच्या साठी ससा नि कासव महत्त्वाचे होते त्यांचे कारनामे नाही ;-).

जेनी...'s picture

25 Jun 2012 - 2:20 am | जेनी...

_/\/\/\_
:D.... :D ...... :D

मुक्त विहारि's picture

25 Jun 2012 - 4:10 am | मुक्त विहारि

ससा ... ससा.. रे कापूस जसा

त्याने कासवाशी पै ज लावीली
की, वेगे वेगे धावू,
अन डोंगरावर जावू
ही शर्यत रे आपूली...

मूळ गाणे खाली देत आहे...

(http://www.youtube.com/watch?v=3SGOVOEgjto)

आणि धन्यवाद , कारण त्यामूळे मला पण मला हवे असलेले एक गाणे मिळाले..

येरे येरे पावसा
तबडक तबडक घोडोबा
घोड्यावर बसले लाडोबा
हे पण आहे
मला येत नै :(

त्रिवेणी's picture

29 Oct 2012 - 9:09 pm | त्रिवेणी

तबडक तबडक घोडोबा
घोड्यावर बसले लाडोबा
लाडोबाचे लाड करते कोण
आजोबा आजी नि मावश्या दोन

अन्नू's picture

25 Jun 2012 - 12:48 am | अन्नू

चार ससे पिटुकले
त्यांनी केले नाटुकले.
नाटकाचे नाव काय
"खाली डोके वर पाय!"

एक ससा घसरला,
दुसरा भाषण विसरला,
तिसरा बसला लपून,
चौथा गेला पळून.

धडाड-धुम वाजले ढग
आता गंम्मत बघ!
सगळेच पळाले ससे
आता नाटक होणार कसे? ;)

:) हे भारीच! मुलाला ऐकवण्याचे विसरून आपणच एन्जॉय करावीत अशी.
विंदांची पण अशीच काही आहेत, 'एटू लोकांचा देश' मध्ये.

तबडक तबडक घोडोबा
घोड्यावर बसले लाडोबा
लाडोबाचे लाड करतय कोण??
आजोबा आजी मावश्या दोन

मला आठवली :D

शोधा म्हन्जे सापडेल's picture

25 Jun 2012 - 10:51 am | शोधा म्हन्जे सापडेल

कर्वे रस्त्यावरचं अलुरकर बंद पडून ३-४ महिने झाले. तिथे आता दागिन्यांचे दुकान चालू झाले आहे. पहिल्यांदा जेव्हा नुतनीकरणासाठी पाडलेलं बघितलं तेव्हा ध्वनीफितींचा जमाना संपल्याची किंवा संपत असल्याची दु:खद जाणीव झाली. (वर्तमानपत्राची रद्दी विकून आवडते सिनेमे बघणे किंवा त्या गाण्यांच्या ध्वनीफिती विकत घेणे ह्या आठवणी जाग्या झाल्या.)

५० फक्त's picture

26 Jun 2012 - 12:05 am | ५० फक्त

हे दुकान किंवा तिथलं सगळं सामान हे विजय टॉकिज जवळच्या एकानं विकत घेतलं असं कळालं होतं, पण ते दुसरं दुकान सापडलं नाही मला, कुणाला माहिती आहे का याबद्द.

चतुरंग's picture

4 Jul 2012 - 12:14 am | चतुरंग

मुंजाबाच्या बोळाकडे जाणारा जो रस्ता आहे (अभ्यंकर ऑप्टीशियन आणि हरि गणेश साने यांच्या दुकानांच्या मधे असलेला) त्या रस्त्याने खाली जा, की उजव्या हाताला मुंजाबा बोळ सोडून जरा पुढे गेलास की उजव्या हाताला 'गोपी'म्हणून छोटेसे दुकान आहे. त्याच्याकडे बराच साठा आहे. गेल्या भारतवारीत मी त्याच्याकडून जोगांच्या 'गाणारे वायोलिनच्या' ७ सीडीज घेतल्या. बरेच कलेक्शन दिसते त्याच्याकडे. (विजय टॉकीजजवळचा हाच असावा असे वाटते. चूभूदेघे.)

-रंगा

ऋषिकेश's picture

25 Jun 2012 - 10:54 am | ऋषिकेश

ऐसीवर ग्लोरी यांनी वरीच छान बडबडगीते प्रकाशित केली आहेत. इथे वाचता येतील

प्रेरणा पित्रे's picture

25 Jun 2012 - 11:50 am | प्रेरणा पित्रे

जिंगल टुन्स ची येरे येरे पावसा ची सीडी ८ महिन्यांच्या मुलासाठी अतिशय उपयुक्त आहे.... यातील "तबडक तबडक घोडोबा" "भटो भटो" "करंगळी मरंगळी" ही व अशी अनेक गाणी सर्वांना आवडतील अशीच आहे...हायली रेकमेंडेड...

जिंगल टुन्स चीच "रे मामा रे" "नानी तेरी मोरनी" "चॉकलेटचा बंगला" ही गाणी असलेली एक सीडी आहे पण नाव आठवत नाही..

कुठल्याही सीडी शॉप मधे मिळतील.. खेळिया मधे नक्की मिळेल....

फाउंटन च्या पण बर्यांच आहेत...

मराठमोळा's picture

25 Jun 2012 - 12:13 pm | मराठमोळा

कुठेतरी वाचलेलं एक बडबडगीत. कुठे ते आटवत नाही.

एक होती ईडली
ती फार चिडली
पळता पळता अडली
सांबारात जाऊन पडली
सांबार होते गरम गरम
ईडलीची झाली हाडे नरम
चमच्याने बघत ईकडे तिकडे
ईडलीचे केले तुकडे तुकडे.

लहानपणी बर्‍याच जाहीराती आणि सिरियल्सचे टायटल साँग्स पण लक्षात रहायचे.
जसं..
तुझको पसंद, मुझको पसंद स्वादभरा वारना श्रीखंड
वॉशिंग पावडर निरमा
मेलडी है चोकलेटी
मोगली, पोटली बाबा की, डक टेल्स ... ई चे टायटल साँग्स

योगप्रभू's picture

26 Jun 2012 - 12:33 am | योगप्रभू

एक होती इडली
ती होती चिडली
धावत धावत आली
सांबारात बुडाली
सांबार होते गरम गरम
इडली झाली नरम नरम
चमचा आला खुशीत
जाऊन बसला बशीत
चमच्याने पाहिले इकडे तिकडे
इडलीचे केले तुकडे तुकडे
इडली होती फारच मस्त
आम्ही मुलांनी केली फस्त :)

RUPALI POYEKAR's picture

25 Jun 2012 - 12:27 pm | RUPALI POYEKAR

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
ऐकू आली फोनची रिंग -
कुणीच नाही फोनपाशी
उंदीरमामा बिळापाशी !
उंदीरमामा हसले मिशीत ,
टेबलावरती चढले खुषीत -
फोन लावला कानाला
जोरात लागले बोलायला -
" उंदीरमामा मी इकडे ;
कोण बोलतय हो तिकडे ? "
- विचारले मामानी झटकन
उत्तर आले की पटकन-
" मी तुमची मनीमावशी,
कालपासून आहे उपाशी ."
- मनीमावशी भलती हुषार ,
टुणकन मामा बिळात पसार !!

अमृत's picture

25 Jun 2012 - 12:40 pm | अमृत

प्रथमच वाचली...

अमृत

विदेश's picture

3 Jul 2012 - 3:11 pm | विदेश

आभारी आहे .

http://mee-videsh.blogspot.in/2011/01/blog-post_16.html

माझी आणखी बालगीते तिथे आणि आपल्या ह्याच मिपा वर वाचायला मिळतील .

अमृत's picture

25 Jun 2012 - 12:58 pm | अमृत

अ‍ॅलीस इन वंडरलँड - टप टप टोपी टोपी टोपे मे जो डुबे... फर फर फर्माईशी देखे है अजुबे..
लकडी की काठी..
नानी तेरी मोरनी को मोर ले गये...
सिंदबाद जहाजी - डुबे ना डुबे ना मेरा जहाजी
अलुचिक बलुचिक दही दूध लोणी - पूर्ण येत नाही

अमृत

श्रीरंग_जोशी's picture

26 Jun 2012 - 12:45 am | श्रीरंग_जोशी

>> सिंदबाद जहाजी - डुबे ना डुबे ना मेरा जहाजी

हे शीर्षकगीत फारच मधुर होते.

यासाठी विशेष आभार.

माझ्याजवळ खालील गाणी Mp3 (बहुतेक २-३ वगळता वरिजणल आवाजात.) आहेत.

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
सासा तो सासा की कापुस जसा
सांग सांग भोलानाथ.
कुणास ठाउक कसा.
खोडी माझी काढाल तर.
झुक झुक झुक अगिन गाडी.
दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ.
निंबोणीच्या झाडामागे.
पीर पीर पीर पीर पावसाची
अ आ आई, म म मका
गोरी गोरी पान.
ये रे ये रे पावसा.
पुस्तक नंतर वाचा.
बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला.

इथुन उतरवुन घेता येतील.

http://www.filefactory.com/file/7dp0kjnwbqzz/n/BalGite_rar
(सगळ्यात खाली जाउन फ्री डाउनलोड वर क्लीक करा.)

अमृत's picture

25 Jun 2012 - 1:14 pm | अमृत

वाखुसाआ

अमृत

काही पर्यायी व्यवस्था करता येईल काय?

खेडूत's picture

26 Jun 2012 - 12:47 am | खेडूत

कांदा लसूण मिरची आलं
एकदा सगळ्यांचं भांडण झालं
काकू आल्या पदर खोचून
सगळ्याना काढलं चांगलंच ठेचून
चटणी झाली सुरेख चटणी
चटणी भरली बशीत
मनू (किंवा जी/ जो कुणी) आली खुशीत!!

बॅटमॅन's picture

26 Jun 2012 - 12:00 pm | बॅटमॅन

मस्त आहे हो तुमची चटणी!!!

विकास's picture

26 Jun 2012 - 1:00 am | विकास

चिव चिव चिमणी
गाते गाणी, पिते पाणी
बांधलं घरट, झाल उलट
पडले पिलू
पहाते लिलू
पिलूनी बोट चावल
लिलू लागली रडायला
आई समजूत घालायला
लाडू दिला खायला
लिलू लागली हसायला
एक लाडू खाल्ला
घशामध्ये अडकला
खाली काही जाईना
वर पण येईना
आई आली भराभर
बुक्की मारली मानेवर
लाडू पडला खाली
अन अश्शी गंमत झाली!

अजून एक..
एक होती मुंगी
तिने नेसली लुंगी
तिने ऐकाली पुंगी
तिला आली गुंगी
गुंगीत गेली स्वप्नात
स्वप्नात होता महाल
त्यात राही खुशाल
नोकर करती सेवा
मुंगी खाये मेवा
एकदा तिने खाल्ली खूप खूप बडीशेप
मग तिला आली खूप खूप झोप
झोपेत दिसले माकड
त्याने मारली थापड
थापड लागली जोरात
मुंगी पाळली वेगात
पळताना सुटली लुंगी
मुंगीची उतरली गुंगी

अन्नू's picture

26 Jun 2012 - 10:48 am | अन्नू

एके दिवशी काsय जाहलेsss...
ससा म्हणाला कासवाला, चल आपण शर्यत लावू;
ससा म्हणाला कासवाला, चल आपण शर्यत लावू.
कासव म्हणालं सश्याला, मग यावेळी मी पण झोप काढू?!! ;)

योगप्रभू's picture

26 Jun 2012 - 11:08 am | योगप्रभू

पोपट आणि ससा यांची गाणी बच्चे कंपनीची ऑल टाईम फेवरिट...
(एका माकडानं काढलंय दुकान... हे नाचण्यासाठीचे लोकप्रिय गाणे)

पुढील गाणी पारंपरिक आहेत. कॅसेटमध्ये नसावीत बहुधा...

पोपट पोपट मिठूमिया
चोरुन खातो मिरचीच्या बिया
तिखट खातो, गोड बोलतो
अशी कशी रे जादू करतो
टिल्लू जोकर, राणीचा नोकर
चोरुन खातो तूपसाखर
राणी मारते छमछम छड्या
टिल्लू मारतो टुणटुण उड्या
पोपट पोपट, बोलतोस गोड
डाळ खा पण माझं बोट सोड
पेरु खातोस कच्चा
मला म्हणतोस लुच्चा

ससा ससा दिसतो कसा
कापूस पिंजून ठेवलाय जसा
लाल लाल डोळे छान
छोटे शेपूट मोठे कान
पाला खाऊन फुगतो टुम
चाहूल लागताच पळतो धूम
ससुल्या गडी मारतो उडी
मोडीन म्हणतो वाघोबाची खोडी

अमोल केळकर's picture

26 Jun 2012 - 11:56 am | अमोल केळकर

काही बालगीते इथे ही आहेत,
पहा आवडतात का ?

अमोल केळकर

माझी मुलगी ६-७ महिन्यांची असल्यापासून मी तिच्यासाठी बरीच बडबडगीते जमा केली होती. आठवतील तशी देते.

१) बाहूलीची शाळा
बाहुलीच नाव आई घालूया का शाळेत?
मिच घेऊन जाईन तिला शाळेच्या वेळेत
आई तिला गणवेश देशील ना शिउन?
छोटस दप्तर देशील ना घेउन?
डबा बिबा नको आई सांगू का तुला,
माझ्यातली पोळीभाजी देईन मी तिला.

२) मिरची कोथिंबीर
मिरची, कोथिंबीर, आल
त्या तिघांच भांडण झाल.
आजीबाई आल्या पदर खोचून
त्या तिघांना काढल ठेचून
त्यांची केली सुरेख चटणी
ती ठेवली बशीत
जेवण झाले खुषीत.

३) अडगुल मडगुल
अडगुल मडगुल
सोन्याच गडगुल
रुप्याचा वाळा
तान्ह्य बाळाला तिट-तिळा.

सागर's picture

3 Jul 2012 - 4:14 pm | सागर

अव्यक्त,

माझ्याकडे अनेक ओरिजनल बालगीतांच्या एमपीथ्री आहेत. ऑफिसातून मर्यादीत वावर असल्यामुळे तुम्हाल त्याचे थेट दुवे देऊ शकत नाहिये.

संध्याकाळी घरुन ऑनलाईन आलो की दुवे देतो.
तूर्तास काही गाण्यांची नावे देतो -

१.
या वार्‍याच्या बसुनि विमानी ,
सहल करु या गगनाची ,
चला मुलांनो आज पाहूया,
शाळा चांदोबा गुरुजींची

२. बाहुलीचं लगीन झोकात लागलं
नवरोबानं भांडण काढलं

३. (हे गाणे सुषमा श्रेष्ठ ने म्हटले आहे)
किलबिल किलबिल पक्षि बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती,
पानोपानी फुले बहरती, फूलपाखरे वर भिरभिरती,
स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई !

या शिवाय तुम्ही उल्लेखिलेली बहुतेक सर्व ओरिजिनल (मूळ) गाणी माझ्याकडे आहेत.
संध्याकाळी एमपी थ्री अपलोड केल्या की येथेच त्यांचे दुवे देतो...

स्मिता.'s picture

3 Jul 2012 - 6:07 pm | स्मिता.

लहान माझी बाहुली
तिची मोठी सावली

नकटे नाक मिरविते
घारे डोळे फिरविते

(पुढचं आठवत नाही :()

लहान माझी बाहुली
तिची मोठी सावली
घारे डोळे फिरविते
नकटे नाक मिरविते
भात केला, कच्चा झाला
वरण केलं, पातळ झालं
पोळ्या केल्या, करपून गेल्या
केळ्याची शिकरण करायला गेली, दोनच पडले दात
आडाचं पाणी काढायला गेली, धुप्पकन पडली आत!

(बाबा, वॉट इज "आड".. )?

स्मिता.'s picture

3 Jul 2012 - 8:54 pm | स्मिता.

मराठेसाहेब, पूर्ण गीत दिल्याबद्दल अनेकोनेक आभार. माझं लहानपणीचं आवडतं गाणं होतं (तरी कसं काय विसरले काय माहित) :)

आमची नुकतीच (तरी झाली सात आठ वर्षं) रिविजन झाली आहे ना म्हणून आठवताहेत.

चतुरंग's picture

4 Jul 2012 - 12:18 am | चतुरंग

"बाबा, वॉट इज आड?" हा बालसुलभ प्रश्न ऐकून 'इकडे आड आणि तिकडे विहीर' असे वाटत असणार! ;)

(पोहरा)रंगा

सागर's picture

3 Jul 2012 - 10:46 pm | सागर

अव्यक्त,

http://www.4shared.com/folder/E_TKusDG/ORIGINAL.html

या ठिकाणी मी गाणी अपलोड केली आहेत. एकूण २२ बालगीते आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे ती सर्व मूळ गाणी आहेत.
इंटरनेटवर कित्येक ठिकाणी ही सर्व गाणी उपलब्ध आहेत मी ही तेथूनच उतरवली होती.

यादीत नसलेले एखादे गाणे तुम्हाला हवे असेल तर अवश्य सांगा. मी मिळवण्याचा प्रयत्न करेन.

वरील लिंक व्यक्तिरिक्त स्कायड्राईव्ह वर पण मी अपलोड केले आहे.

स्कायड्राईव्ह दुवा : https://skydrive.live.com/?cid=0213a8a56fe51587&resid=213A8A56FE51587!209&id=213A8A56FE51587!209

धन्यवाद

रानी १३'s picture

30 Oct 2012 - 1:45 pm | रानी १३

सागर, असा निरोप येतोय.......The file link that you requested is not valid.