Skip to main content

उत्सव -शतशब्द कथा

लेखक जेपी यांनी शनिवार, 12/10/2013 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या' घरी आज बरीच वर्दळ होती ,एरवी कुणी फिरकतही नसे . पाहटेच आलेला 'तिचा' भाऊ आणि धाकटा दीर लोकामध्ये या घटनेच धार्मिक महत्व आणि पूर्वी याचा कसा उत्सव व्हायचा यावर चर्चा करत पुढची तयारी करत होते . 'तिची' ओटी भरण्यासाठी बायकांची झुंबड उडाली होती. आठ दिवसापूर्वी चेत्रागौरीला 'तिच्या' घरी कुणी हि बाई फिरकली नव्ह्ती. घरामध्ये 'तिचा' वेडा नवरा कधी नव्हे तो शहाण्या सारखा शांत बसला होता . 'तिच्या' शेजारी बसलेली 'तिची' भावजयी 'तिची' तुलना लक्ष्मिशी करत होती , धाकट्या जावेला 'तिच्या' नशिबाचा हेवा वाटत होता . असे उत्सवी वातावरण असताना ती मात्र जीवनात पहिल्यादाच मिळालेला शालू पांघरून शांत

ज्योतिषांकडे जावे का? का जावे? … आमचेही काही प्रयोग

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 09/10/2013 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
सांप्रतकाळी भारतवर्षात काय, किंवा विलायतेस काय, बरेच उच्चविद्याविभूषित जंटलमन आणि सुविद्य लेड्या ज्योतिषांची टर उडविताना दिसतात; कां की त्यांचे मते ज्योतिष हे एक थोतांड असून लबाड ज्योतिषी मडळींनी केवळ आपली तुंबडी भरण्यासाठी ते रचिलेले आहे, आणि ज्याअर्थी विश्वचूडामणि असलेल्या ‘आम्रविका’ खंडातील प्राख्यात ‘सायनस’या महासिकाची ज्योतिषविद्येस मान्यता नाही, त्याअर्थी हे थोतांड असल्याचे निर्विवादपणे सिद्धच होते, सबब समस्त लुच्च्ये ज्योतिषी हे खेटरे मारण्याच्या लायक होत.

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (८)

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 08/10/2013 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
२ ऑक्टोबर २०१३ . . तापलेल्या तव्यावर चरचरणार्‍या मच्छीचा वास.. स्वयंपाकघरातून दिवाणखान्याला चकमा देत, चुरचुरत थेट, बेडरूममध्ये माझ्या नाकाला झिणझिण्या द्यायला आत शिरला.. अन दिवसभराच्या कामाचा अर्धा थकवा तिथेच पळाला. श्रावणापाठोपाठ गणपती अन त्यामुळे थंडावलेला मत्स्याहार.. जर आजचा हा वार चुकला तर पुढचे काही दिवस नवरात्री निमित्त पुन्हा जिभेला लगाम घालावा लागणार हा विचार खायची इच्छा आणखी प्रबळ करून गेला.. अर्थात बाहेर हॉटेलात खायला तेवढी परवानगी होती, पण तिथे घरची, आईच्या हातची चव कुठे येणार.. ते नेहमीच ताकाची तहान दूधावर वाटते मला....

माझा लोकलनामा - गाडीतला तो

लेखक प्रमोद देर्देकर यांनी सोमवार, 07/10/2013 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार असल्याने गाडीला तुरळक गर्दी होती. पुढील स्टेशनावर मला उतरायचे असल्याने मी दरवाजातच उभा होतो. एवढ्यात माझ्या बाजूला दोन्ही पायाने अपंग असलेला एक तरुण मुलगा आपली चारचाकी ढकलगाडी (Trolly )घेवून दरवाजाजवळ येवून बसून राहिला. त्यालाही पुढील स्टेशनावर उतरायचे होते. डब्यातील सर्वांचे लक्ष त्या मुलाकडे लागले होते काहीजण कुतूहल म्हणून तर काहीजण चिंता म्हणून. कारण जे त्याच्या मागे येवून उभे राहिले होते ते हा कधी उतरणार आणि त्यानंतर मग आपल्यला कधी उतरायला मिळणार याच चिंतेत होते. त्याला मात्र त्याची फिकीर नव्हती, तो बिनधास्त होता.

तिहेरी शतशब्दकथा - लाडका - लाडका - लाडकी

लेखक साळसकर यांनी सोमवार, 23/09/2013 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
लाडका तो सर्वांचाच लाडका होता.. तीन भावांत शेंडेफळ म्हणून आईचा लाडका.. आपले नाव हाच काढणार म्हणून बापाचा लाडका.. अभ्यासात हुशार म्हणून शिक्षकांचा लाडका.. आणि मित्रांच्या ग्रूपची, बोले तर जान होता.. शांत स्वभाव आणि लाघवी बोलणे, कामानिमित्त जिथे जाईल तिथे आपली छाप पाडणारच.. ऑफिसमधल्या बॉसचाही लाडका न झाल्यास नवलच..!! एक दिवस पुढे आलेल्या पोटावरून हात फिरवत बायको म्हणाली, इथेही आईपेक्षा बाबाच जास्त लाडके होणार वाटते..

सैतानाचा आरसा - शतशब्दकथा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 23/09/2013 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी एखाद्या पिसाटा सारखा बेफाम धावत होतो. पुढे ती जीवाच्या आकांताने सैरावैरा पळात होती. माझ्या नजरेत विखार होता. तिला मी रोज पहायचो. आज तिला सोडायचे नाही असा निर्धारच मी केला होता. रडत, धडपडत, अडखळत, भेलकांडत धावताना ती मदतीसाठी केविलवाणे किंचाळत होती. एका क्षणी मी अगदी जवळ पोचून निर्दयपणे तिची ओढणी खेचली. ती घाबरुन अजूनच जोरात धावायला लागली. तिच्याकडे पहात धावताना मी एका दगडाला अडखळलो, तेवढ्यात ती एका बंगल्यात घूसली. गेट लावायची तिची धडपड सुरु असतानाच मी तिथे पोचलो आणि चवताळून त्या दिशेने झेप टाकली. तिने धाडकन गेट बंद केले.

॥ नामा म्हणे प्रदक्षिणा ॥

लेखक अनिल तापकीर यांनी शनिवार, 21/09/2013 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानेश्वर माउलींच्या जीवनावरील कादंबरी वाचन श्री पद्माकर गोवईकर यांनी "मुंगी उडाली आकाशी " या ध्वनिफितीत अतिशय सुंदर केले होते. मी ते सतरा अठरा वर्ष्याचा असताना ऐकले होते. आणि वारंवार ऐकत होतो. त्यामध्ये एक प्रसंग होता की आळंदीच्या ब्राम्हणांच्या छळाला कंटाळून विठ्ठल पंत मुलांना घेऊन ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करायला त्य्रंबकेश्वर येथे जातात व ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करतात. तेथे असा उल्लेख केलेला ऐकला होता कि ब्रम्हगिरिचि प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. कारण ब्रम्हगिरीचा पर्वत म्हणजे साक्षात शंकर आहे.

नर्मदेच्या खो-यातून ....(२)

लेखक आतिवास यांनी सोमवार, 16/09/2013 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पुनर्वसन नेमकं किती कुटुंबाचं करायचं यामध्ये अजून घोळ आहेत. ‘घोषित’ कुटुंबांची मध्य प्रदेशमधली संख्या आहे ५२५७; पण यात सरकारने ‘वयस्क पुत्र’ (१८ वर्षांवरील मुलगे) धरलेले नाहीत. यातही सरकारने आकड्यांचा खेळ केला आहे. उदाहरणार्थ भिताडा गाव प्रत्यक्ष पाण्याखाली गेलं ते २००६ मध्ये पण तिथलं ‘कट ऑफ’ वर्ष आहे १९९३. म्हणजे १९९३ ची कुटुंबं २००६ सालीही तशीच आणि तेवढीच राहायला हवीत सरकारच्या मते. मुलगे मोठे होणार, त्यांची लग्न होणार, त्यांना मुलबाळं होणार, ते वेगळं घर करणार – या शक्यता सरकारने कधी गृहित धरल्याच नाहीत!