Skip to main content

निमित्त कॉफीचं

लेखक आतिवास यांनी बुधवार, 10/07/2013 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
वैभवला कशाचा तरी आनंद साजरा करायचा होता, कसला ते तो मला आधी सांगायला तयार नव्हता. पण त्यासाठी तो मला एका प्रसिद्ध ‘कॉफी शॉप’मध्ये घेऊन गेला. वैभवने मला हुकूम सोडला. “साधं-सरळ वाच. तुझं उर्दू वाचन इथं आत्ता दाखवायची गरज नाही.” छे! मला उर्दू वाचता येत नाही. पण ‘जनरेशन नेक्स्ट’च्या या मुलाला आमच्या पिढीची सवय माहिती आहे. हॉटेलमध्ये मेन्यू कार्ड वाचताना आधी उजवीकडची पदार्थाची किंमत वाचायची आणि मग नेमकं काय आपल्या खिशाला परवडतंय याचा अंदाज घ्यायचा ही माझी (आणि माझ्या पिढीतल्या अनेकांची) सवय. वैभवचे आई-बाबा माझे मित्र आहेत.

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (५)

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 09/07/2013 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसभर पायाला भिंगरी लावलीय, असे धावपळीचे आयुष्य आम्हा मुंबईकरांचे. संध्याकाळी परतताना मात्र पळत सुटायचे काम ट्रेनवर सोपवून आम्ही निवांत बसतो.. नेहमीचेच कंपार्टमेंट, अन आवडीचीच जागा, पण नेहमीच काही गप्पा मारल्या जात नाहीत किंवा पुरेश्या मारून झाल्या की आपापल्या आवडीनुसार हाताला चाळा अन बुद्धीला खाद्य पुरवायला सुरुवात होते. ती मोबाईल गेम्स उघडते, तर मी माझ्या तोडक्यामोडक्या ईंग्रजीच्या भरवश्यावर न्यूजपेपरमध्ये शिरतो. आजही तसेच काहीसे.. मांडीवर ठेवलेल्या पेपर वरून नजर भिरभिरवत सहज सवयीनेच एक नजर उजवीकडे तर एक नजर डावीकडे.. तर फिरून पुन्हा आणखी एक नजर उजवीकडे फिरवली..

प्रपोजल

लेखक तिमा यांनी मंगळवार, 02/07/2013 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
सूचना: ज्यांना हे नाटक पहायचे आहे त्यांनी हा लेख आधी वाचू नये. ह्या नाटकाला २८ पारितोषिके मिळाली आहेत आणि टीकाकारांनी उचलून धरले आहे, अशी बरीच ख्याती कानावर आली होती. त्यामुळे हे नाटक बघायचे असे मनाशी ठरवले होते. त्याप्रमाणे, एकदाचा, एका रविवारी मुहूर्त मिळाला. तिकीटे काढल्यावर लक्षांत आले की डॉ. अमोल कोल्हे, आता काम करत नसून त्यांच्या जागी कोणी 'आस्ताद काळे' काम करतात.

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (४)

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 27/06/2013 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
२० जुन २०१३ आजकाल आमच्या घडाळ्यात साडेदहा वाजले की माझ्या डोक्याचे सव्वाबारा वाजतात.. त्यावेळी आमच्या टीवीवर एक सिरीअल लागते जी मला "बडी बोअर लगती है" .. न बघणे हा पर्याय संपुष्टात येतो कारण माझी आई आणि बायको.. दोघींनाही ती "बडी अच्छी लगती है" .. जेवायची आमची वेळही साधारण हिच असल्याने आणि जेवायची जागाही अर्थातच टिव्हीसमोर असल्याने इच्छा नसूनही बघावीच लागते. सासूसुनेच्या भांडणात पुरुष बिचारा मधल्यामध्ये मरतो असे म्हणतात खरे, पण जेव्हा याच सासूसुनेची युती होते तेव्हा जगणेही मुश्किल होते हा अनुभव मी गेले काही दिवस या मालिकांमुळे घेतोय.

एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !

लेखक जॅक डनियल्स यांनी बुधवार, 26/06/2013 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! ....मला घरी फोन यायचा "अहो ते साप वाले आहेत का ? आमच्या घरी/बागेत/रस्त्यावर/गच्चीवर/स्वयंपाकघरात इ.भला मोठा साप आहे...तुम्ही ताबडतोब या":- ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे. मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोन मध्ये लावायचो.

ऑफीस ऑफीस...

लेखक मोदक यांनी बुधवार, 26/06/2013 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
हाफिसात मागच्या आठवड्यात घडलेला एक किस्सा.. एखादा प्रश्न विचारला गेल्याने "न हसता आणि न वैतागता" कसे उत्तर द्यावे हे न कळणार्‍या प्रसंगांपैकी एक प्रसंग.. मंथली प्रेझेंटेशन सुरू होते.. माझ्या एका रिपोर्टमधील आकडेवारी आणि आमच्या लंडन ऑफीसमधील एकाने तयार केलेली आकडेवारी काही केल्या जुळत नव्हती... शेवटी असा निष्कर्ष निघाला की "दोन्ही रिपोर्टस चुकीचे आहेत व एक तिसराच रिपोर्ट तयार केला जावा.." अचानक आमचा एका मोठ्ठा सायेब वदला... आय अंडरस्टँड रिपोर्ट A इज इनकरेक्ट, रिपोर्ट B इज इनकरेक्ट अ‍ॅजवेल! बट व्हाय दोज इनकरेक्ट फिगर्स आर नॉट कन्सिस्टंट..?

पर बंदे अच्छे है .......... १

लेखक सुहास.. यांनी मंगळवार, 25/06/2013 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : मानसिक वय १८ आणि वरील करितांच, सत्यकथेवर आधारित. Every boy tends to become a man , few would be heros & at least one would be superhero - श्रावण मोडक ************************************************************************* समोरच्या दरवाज्याच्या उघड्या फ्रेम मधुन एक-एक करून मुली येत होत्या, सभ्य भाषेत एस्कॉर्ट, असभ्य भाषेत वेश्या, वेश्याच त्या ! मसाज पार्लची मसुर असली म्हणुन काय झाले !! कोणी स्कर्ट घालुन तर कोणी कमालीचा ओपन-नेक टी-शर्ट घालुन आप-आपल्या फिगरचे प्रदर्शन करत होत्या. मधुनच एक सावळी त्याला 'हाय' करून गेली.

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (३)

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 24/06/2013 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
१० जुन २०१३ ती नेहमी मला बोलते, जेव्हा तू मला भेटतोस, हसत नाहीस.. जसा लग्नाआधी हसायचास.. जेव्हा लांबूनच बघायचास.. नजर पडताच खुलायचास.. आता तिला कसे समजवू, उगाच हसता येत नाही मला, आणि कृत्रिम हसायला तर मुळीच जमत नाही.. लग्नाआधीची गोष्ट वेगळी होती.. आता तुला भेटणे आणि तुझ्याबरोबर घरी जाणे रोजचेच आहे.. रोज तशीच तूच दिसणार हे ठाऊक आहे.. मग का उगाचच ते औपचारीक हसणे.. पण.., गेले दोनचार दिवस मात्र हे रुटीन बदलले होते.. तिच्या कॉलेजला सुट्ट्या, तर घर ते ऑफिस माझ्या एकट्याच्या वार्‍या.. आजही एकटाच होतो.. आणि ती कसल्याश्या कामासाठी बोरीबंदरला गेली होती. ऑफिसातून निघता निघता आठवले, श्या..!

चारधामच्या निमित्ताने

लेखक तिमा यांनी रविवार, 23/06/2013 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
चारधाम यात्रा करावी का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सध्या भयानक आपत्तीमुळे चारधाम, विशेषतः केदारनाथ गाजते आहे. पण या लेखाचा विषय तो नाही. मी जेंव्हा चारधामांना भेट दिली त्याचे सचित्र प्रवासवर्णन करण्याचाही या लेखाचा हेतू नाही. तर एकंदरीतच, जे अनुभव आले त्यातून आपल्याला काही बोध घेता येतो का, याविषयी हा लेख आहे. चारधामला मी जाणार, हे कळल्याबरोबर माझ्या समविचारी मित्रांनी थट्टा केली. 'अरे,तू इथे कधी कुठल्या देवळात जात नाहीस, कुठल्याही दिवशी तुझा उपास नसतो, ३६५ दिवस तू सामिष आहार करु शकतोस, तर तिथे जाऊन काय करणार आहेस?' अशा प्रकारच्या कॉमेंटस ऐकल्या.

गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.

लेखक सुज्ञ माणुस यांनी शनिवार, 22/06/2013 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे. आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे. तरुण वयात या दोन्हीची क्रेझ असते.