Skip to main content

विचार रथ सारथ्य आणि संवाद धनुष्य !!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 29/10/2013 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मनातल्या विचारांबाबतचा एक नवा विचार मी येथे मांडत आहे. त्या नव्या विचाराचा स्वीकार झाल्यास तसे जरूर कळवा.

टकाटक

लेखक आतिवास यांनी सोमवार, 21/10/2013 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
परारथना झाली की हजरी घेतेत गुर्जी. घरी बसलेल्यांना पकडून आणाया पोरास्नी पळवत्यात. कंदी कामं असत्यात. तळ्यावरनं पाणी आणा; अंगण झाडा; फळा काळा करा. गमभन लिऊन झालं की पाडे. लंबरपरमानं येकेकाला हुबा करतेत. तेनं वरडायचं, “येक रे ..” की आमी “येकाचा”. धापत्तुर. मंग “येकावर येक अकरा”. पन्नासपत्तुर. गुर्जी येकदम बायेर. च्या प्यायाला, तमाकू खायाला. रोजला तेच. म्या पेंगाया लाग्ली. मंगली वराडली, “आन्जे, पाडे म्हन, नायतर गुर्जीस्नी नाव सांगते बग”. शिवाजीम्हाराज समजतेय सोताला. मंगली वराडली, “साहा रे” म्या हळूच “आटाचा” बोल्ली. कुणाला कायबी नाय समजलं.

एक महाचित्रपट

लेखक तिमा यांनी सोमवार, 21/10/2013 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
काल टीव्हीवर फुकट मिळाल्यामुळे एक चित्रपट बघिटलो. त्याचं नांव सांगण्यापेक्षा गोष्टच सांगावी. एक मिठाईवाला असतो. फारच दीर्घायुषी. त्याचा नातू एकदम हिरो असतो. त्याला मिठाई विकताना कोणी मुलींनी 'भैया' म्हटलं तर आवडत नसतं. मिठाईवाला सचिनचा पंखा! तर होतं काय की मधली पिढी पडद्यावरुन एकदम डिलिट होते आणि आजोबा,आजी आणि नातूच रहातो. आजोबांचा शंबराव्वा वाढदिवस. त्याच दिवशी सचिनची मॅच. आजोबा टीव्हीवर डोळे लावून बसलेले आणि नातू टोळभैरव मित्रांबरोबर गोव्याला कसे जायचे याच्या चिंतेत. सचिन नव्व्याण्णव वर! आजोबा गॅसवर! मित्र ,गोवा ट्रीपच्या परमिशनच्या चिंतेत. सचिन च्या चिंतेत आजोबा परमिशन देऊन टाकतात. आन...

मुलं - काही नोंदी

लेखक मितान यांनी सोमवार, 21/10/2013 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हाताळायला मिळतायत. आलिप्त राहून काम करायचे ठरवले तरी मनात अस्वस्थता दाटून राहतेच. लिहिल्याने थोडे बरे वाटेल असं वाटतंय म्ह॑णून हा प्रपंच..लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे. अवनी. वय १७. गेली चार वर्षं दरवर्षी एक अश्या कुटुंबातल्या ४ व्यक्तींचा मृत्यू या मुलीने पाहिलाय. आता एकटी आहे. १२ वीत उत्तम गुणांनी पास झाली आहे. तिचा प्रश्न " माझ्या आजूबाजूची एकेक माणसं मरतायत आणि मी मजेत जगतेय..

एक धाव पोटासाठी

लेखक बलि यांनी शुक्रवार, 18/10/2013 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी लवकर जाग आली म्हणून सहज फिरायला म्हणून गेलो होतो . थंड हवेचा आस्वाद घेत असताना समोर २ वेगवेगळ्या घटना दिसल्या . एक स्त्री सायकलवरून जाताना दिसली . एकंदरीत पेहरावावरून गरीब घरातली असावी . सायकलला पुढे एक थोडीशी मलिन झालेली पिशवी होती . बहुधा जेवणाचा डबा असावा त्यात . धापा टाकत , हळुवारपणे , सावध गिरीने रस्त्यावरील इतर वाहनांचा अंदाज घेत ती सायकल चालवत होती . प्रचंड घामाघूम झालेली . दुसरी घटना म्हणजे थोड्याच वेळाने तिथून आणखी एक लट्ठ अशी स्त्री मॉर्निंग वॉक साठी जाताना दिसली . तीही प्रचंड घामाघूम झालेली, रस्त्याचा अंदाज घेत चालत होती अधून मधून पळत होती .

न्यायव्यवस्थेत लोकांचा सहभाग.

लेखक खटपट्या यांनी शुक्रवार, 18/10/2013 04:48 या दिवशी प्रकाशित केले.
न्यायव्यवस्थेत लोकांचा सहभाग. अमेरिकेत काम करत असताना, माझा एक अमेरिकन सहकारी मला म्हणाला कि तो उद्या ज्युरी ड्युटीवर आहे. मी त्याला विचारले कि ज्युरी ड्युटी म्हणजे काय? तर त्याने सांगितलेली माहीती खालील प्रमाणे. अमेरिकेत प्रत्येक मतदात्यास तेथील न्यायव्यवस्थेत सहभागी होण्याची एक दिवस संधी मिळते, त्या दिवसाला ते ज्युरी ड्युटी असे म्हणतात. शासनाकडून प्रत्येकास एक पत्र येते कि तुमची निवड ज्युरी ड्युटी करता झाली आहे. आणि या या दिवशी अमुक न्यायालयात तुम्हाला हजर राहायचे आहे. सधारण ५० लोकांना एका दिवशी बोलावले जाते. मुख्य न्यायाधीश त्यातून १२ लोकांची ज्युरी म्हणून नीवड करतात.

कथा एका निवडणुकीची

लेखक हर्षद खुस्पे यांनी बुधवार, 16/10/2013 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रामधील सातारा जिल्हा म्हणजे दऱ्या डोंगरांनी भरलेला. बारमाही वाहत असलेल्या नद्या असलेला परीसर जास्तीत जमिनीवर असलेले नगदी ऊसाचे पिक ह्यामुळे हातामध्ये खुळखुळत असलेले पैसे. ह्यामधुन शेतीतून उरणारा वेळ व त्यातून वेळ घालविण्यासाठी म्हणुन गावाच्या राजकारणामध्ये असलेला सहभाग. कातोली असंच एक गाव. कुठल्याही गावामध्ये असतात तसे इथेही दोन गट होतेच, आबा आणी नाना. आबा आणी नानां साखर कारखाना आपापल्या ताब्यात ठेवण्यासाठी अश्या अनेक गावांमधील लोकांना झुलवत ठेवत त्यातून गावांमध्ये मारामाऱ्या , दंगल, झालाच तर खून इ. ला तर निवडणूक काळामध्ये तर अगदी उत येत असे.

म्हैस माजावर येते

लेखक धन्या यांनी मंगळवार, 15/10/2013 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
माज आलाय म्हशीला सालीला. लहानपणी गाय, म्हैस किंवा अगदी एखादया लहान मुलीचा किंवा स्त्रीचा काही कारणास्तव प्रचंड राग आला की ही शिवी आम्ही मुलं देत असू. गाय किंवा म्हशीला दयायची असेल तर समोरासमोर. स्त्री किंवा लहान मुलगी असेल तर ती व्यक्ती नजरेआड झाल्यावर. त्या वयात शब्दांच्या अर्थाशी काही देणं घेणं नसायचं. अर्थात जेव्हा प्रौढ व्यक्तीसुद्धा जेव्हा एखादयाला आई किंवा बहिणीवरुन शिव्या देते तेव्हा त्या व्यक्तीला तरी कुठे त्या शिवीच्या अर्थाशी घेणे देणे असते.

शर्ट ची गोष्ट

लेखक हर्षद खुस्पे यांनी रविवार, 13/10/2013 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
मला एक लिनेन चा शर्ट चा कापड भेट म्हणुन मिळाले. देणाऱ्याने काहीतरी १५०० - २००० रु. चे कापड आहे हे सांगून, चांगल्या शिप्याकडे शिवायला टाक असा सल्लाही दिला. अर्थात असे महागडे कपडे भेट म्हणुन मिळाल्यावरच घालायला बरं वाटतं हा भाग निराळा. अर्थात मध्यमवर्गीय विचारसरणी मुळे ही असं वाटत असेल. असो, तर मी काय सांगत होतो. कापड घेऊन मित्रा ने सुचविलेल्या नारायण पेठ पुणे येथील शिंप्याकडे गेलो. गडबड असल्याने ट्रायल न घेता मस्त पैकी शर्ट शिवून आणला, ज्या कार्यक्रमासाठी शर्ट लागणार होता त्या दिवशी शर्ट घातला तर तो बऱ्यापैकी मोठा झाला.