Skip to main content

मुलुंड कट्टा… केल्याने पंडितमैत्री !!!

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी बुधवार, 25/12/2013 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक महिने झाले मुंबईत कट्टा असा झाला नव्हता. काही वेळा ठरतो आहे असे वाटेपर्यंत रद्द झाला होता आणि सलग २-३ डोंबिवली कट्टे झाल्याने पुढील कट्टा खुद्द मुंबईत व्हावा अशी मंडळाच्या काही कार्यकर्त्यांची इच्छा होती. ही इच्छा मंडळाचे तरुण सळसळते रक्त मुवि काकांच्या कानावर घातली होती आणि तसे करण्याचे आश्वासन पण मिळवले होते. वाट बघत होतो ती संधीची. काही दिवसांपूर्वी अशी संधी चालून आली. एके दिवशी सकाळी सकाळी मिपावर आल्यावर डॉक्टर खरे यांचा धागा दिसला, कट्ट्याच्या आमंत्रणाचा.

जिमी (पूर्वार्ध)

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 23/12/2013 04:27 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या नोकरीचा पहिला दिवस नेहेमीच जरा भीतीदायक असतो. काम जमेल का? सहकारी कसे असतील? हजार प्रश्न. त्या नोकरीच्या वेळी तर धोपटमार्गा सोडून मुद्दाम बिकट वाटेची वहिवाट करायला घेतली होती. आमच्या सत्तावन पिढ्यांत कोणी हॉटेलात नोकरी केली नव्हती. मीही तसा कारकुनी पेशात असल्यामुळे करण्याची शक्यता नव्हतीच, पण या हॉटेलाने नोकरी देऊ केली, म्हटलं बघूया तरी कसं असतंय. मध्य मुंबईतल्या जागेचे भाव प्रचंड. त्यामुळे हॉटेलातली जास्तीत जास्त जागा गेस्ट एरिया म्हणून वापरायला ठेवलेली. त्याखालोखाल किचन, बेकरी वगैरेचा नंबर. त्याखालोखाल हाऊसकीपिंगचा.

आणि रजनीकांत रडला - धूम ३

लेखक मृत्युन्जय यांनी रविवार, 22/12/2013 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
१८ मे १९७४ भारतीय इतिहासात एक अतिशय क्रांतिकारक घटना घडली. पोखरण मध्ये पहिली अण्वस्त्र चाचणी घेण्यात आली आणि भाभा अणुसंशोधन केंद्राच्या प्रमुखांनी डॉ. होमी सेठनांनी पंतप्रधानांच्या सचिवांना दूरध्वनीवरुन ही रोमांचकारक बातमी देताना सांकेतिक भाषेत सांगितले "आ़णि बुद्ध हसला. काही लोकांच्या मते "आणि बुद्ध हसला" वगैरे असे काही सांगितले गेले नाही. ही नंतर बुद्धजयंतीचे निमित्त साधुन काही लोकांच्या डोक्यातुन निघालेली सुपीक कल्पना असेल. डिसेंबर २०१३ मध्ये एक अशीच अजुन एक क्रांतिकारक घटना घडली. धूम ३ प्रदर्शित झाला.

नेहमीचंच !

लेखक सुहास.. यांनी शुक्रवार, 20/12/2013 01:34 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी आली की मारवाडी रेशनच्या दुकानासमोर एक पलंग टाकतो, पलंगावर एक सतरंजी, काही फळांची रिकामी झालेली लाकडी खोकी खाली-वर पायर्‍यांसारखी चढण करुन विक्रीसाठी फटाक्याची रास लावतो. संध्याकाळी सात साडे-सातच्या सुमारास लक्ष्मीपुजनाचा तो दिवस, सगळी दुनिया सजलेली असते, सजवलेली असते, सगळ्यांच्या अगांत नवीन कपडे, घरा-घरातुन फराळाचा सुगंध, कुठे धुप तर कुठे दीपमाळ, कुठे लायंटिंग तर कुठे १००० फटाक्याची लड लावलेली !! चैतन्यमय आणि प्रसन्नचित्त वातावरणामध्ये 'ती' मारवाड्याच्या दुकानापुढे उभी रहाते.

हरवले मधुमुरलीचे सूर.........

लेखक तिरकीट यांनी गुरुवार, 12/12/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
"शेठ, निलेश बोलतोय...काय चाललय?" "अरे वा!.....बोला.....मी मस्त, तु काय म्हणतोयस..?" बोलण्यात कुठलाही अभिनिवेश नाही...समाधानी आवाज ऐकला की खुप बरं वाटायचं.. खरं तर त्याने फोन उचलुच नये असंही वाटायचं...त्याला फोन केला की छान बासरी ऐकु यायची, त्यानेच कुठल्यातरी मैफिलीत वाजवलेली....मधुकंस असेल बहुतेक..त्याचा आवडता राग.... उणीपुरी ५-७ वर्षांची ओळख आमची....कॉलेजमधल्या कुठल्याश्या स्पर्धेमधे झाली असेल......तेव्हा १-२ वेळेला भेटलो असु.

टेरीचा बाश्शाखान : रोमांचकारी अनुभव !

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 08/12/2013 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
असे माझे होते कधी कधी ! मित्राच्या आग्रहाखातर एखादी गोष्ट केली जाते किंवा बघितली जाते. माझ्या दृष्टीने ती गोष्ट फारशी दखलपात्र नसेल, माझी रुची नसेल. पण झाल्यावर वा बघितल्यावर असे वाटते की आपण हे केले नसते तर आयुष्यातल्या केवढ्या मोठ्या आनंदाला मुकलो असतो.…. गेल्या आठवड्यात असेच घडले. ज्येष्ठ पत्रकार, भास्कर समूहाच्या दिव्य मराठीचे मुख्य संपादक पद्मश्री कुमार केतकर माझे स्नेही आहेत. "खास एवढ्यासाठी यावे लागले तरी ये तुझी मुंबई वारी व्यर्थ जाणार नाही हे निश्चित." निमंत्रण होते एका माहितीपटाच्या सादरीकरणाचे.

डे ट्रेड.....सो एक्सायटिंग

लेखक ज्ञानव यांनी रविवार, 08/12/2013 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
किती हि तोटा झाला तरी सगळ्या ट्रेडर्सचा जिव्हाळ्याचा विषय. तेव्हा डे ट्रेड करावा की नाही ? हा प्रश्न तितकासा महत्वाचा नाही त्यांना ज्यांना करायचाच असतो त्यांना. पण मग कसा करावा हा डे ट्रेड. चला, शोधून काढू. प्रथम कोणत्या शेअर मध्ये डे ट्रेड करावा त्याचे दोन नियम आहेत. १) ज्याचा व्हॉल्यूम अवरेज ५००००० आहे असा कोणताही शेअर. त्याच बरोबर २) ज्याची वर खाली करण्याची शक्ती (व्होलाटेलीटी )किंवा स्प्रेड (हाय - वजा - लो ) भरपूर आहे. उदा. एस बी आय...

बंड्याचे बुद्धिबळ

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी शनिवार, 07/12/2013 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी शाळेत असतानाची गोष्ट आहे. उन्हाळ्याची सुट्टी चालू होती. मी माझ्या कुठल्याशा नातेवाईकांकडे काही दिवसांकरिता राहायला गेलो होतो. ज्या बिल्डींग मध्ये आमचे नातेवाईक राहत होते तिथे भरपूर मुले होती माझ्या वयाची. त्यात एक बंड्या नावाचा मुलगा होता. बंड्या तसा हुशार आणि बोलावागायला बरा होता. कधी कधी जरा तऱ्हेवाईक पणे वागायचा. एकटा आणि लाडावलेला असल्याने असेल कदाचित पण आपले तेच खरे करायची त्याला सवय होती. एकदा असेच गप्पा मारताना कळले की हा बंड्या बुद्धिबळ उत्तम खेळायचा म्हणे. नुसते उत्तम नाही तर पूर्ण सोसायटीत त्याला आजवर कुणीही हरवू शकले नव्हते.

पंचाईत

लेखक चिन्मय श्री जोशी यांनी बुधवार, 04/12/2013 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली ना माझी फार म्हणजे फारच पंचाईत होते .... काय कराव आणि कसं वागावं हेच मला कळत नाहीये असं वाटायला लागतं ... आता हेच बघा ना, परवाची गोष्ट ... ऑफिस मध्ये नवीन कलिग ने जॉईन केलं , ती मुलगी इन्फी मधून आलेली .... आल्या आल्या मला विचारते , तुला गैजेट्स नाही का आवडत .... मी सरळ नाही म्हणालो तर माझ्याकडे "कोई मिल गया" मधल्या जादू कडे बघावं तसं बघत नाक उडवून निघून गेली .... काय चुकलं माझं ?? आमच्या सोसायटी मधल्या (बिल्डींग हल्ली खूपच डाऊन मार्केट समजतात म्हणून सोसायटी ...) एका लहान मुलीला विचारलं कि तु शाळेत जाते का ... तर ती मला म्हणते कि मी शाळेत जायला काय मोठी आहे का ??

लिवैनरिलेशनितेचे आईस पत्र

लेखक खटासि खट यांनी मंगळवार, 03/12/2013 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय आई, प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लिवइनरिलेशनशिप (लिइरि) बद्द्ल कोर्टाचा निर्नय आल्यापासुण खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमारांची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लिइरि म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने. लिइरि म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे . तर लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग, कटकटी आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे. मी मला हव्या तितका वेळ झोपु शकते. मला सर्वांच्या आधी उठायची काही एक गरज नाही इन मिन दोघंच घरात. त्याला काही पाहीजे असेल तर तो करून खातो. नाहीतर आम्ही दोघे मिळून हाटेलात जातो.