आत्ताच मितान ह्यांचा हा धागा वाचला आणि अस्वस्थ झालो. साहजिकच मुलाचा विचार करायला लागलो आणि ४ महिन्यांपूर्वीचा एक प्रसंग आठवला......
हुश्श... बर्याच दिवसांनी एका कार्यक्रमाचं निवेदन करून नुकताच घरी निघालोय..... शेवटचा कार्यक्रम केला होता २००४ साली... म्हणजे ९ वर्षं झाली की.... गुड मॅन....... चांगला झाला...... असं ७० - ८० प्रेक्षकांसमोर बोलणं नेहेमीच आवडतं. कलाकाराला प्रोत्साहन मिळण्याइतक्या टाळ्याही मिळतात आणि एक निवेदक म्हणून प्रेक्षकांशी संवाद पण साधता येतो. एखाद्या वाक्याला किंवा सांगितलेल्या चुटक्यांना टाळ्यांपेक्षाही प्रेक्षकाच्या नुसत्या हुंकाराची जी पावती मिळते ना...त्यातच खरी मजा! आणि आज तर पूर्णपणे नवीन गाण्यांचा कार्यक्रम. नेहेमीचे बाबूजी, लताबाई, खळेकाकांचे किस्से नाहीत, प्रेक्षकांना आधीच माहिती असलेल्या चाली नाहीत, ओळखीच्या कविता नाहीत. माझा तर असा पहिलाच अनुभव.... पण प्रत्येक गाण्याचा बिल्ड-अप मस्त जमून आला आज......लोकांना शुन्यापासून त्या गाण्यापर्यंत घेऊन जायला जमलं गड्या.... आणि मिथिलेशनी पण अहिर भैरवचा काय समा बांधलाय... वन्स मोर द्यायला पण ५ सेकंद लागली लोकांना! शेवटी सायलीनी तर कळस चढवला.....असे कार्यक्रम झाले पाहिजेत अजून....निदान पंधरवड्या - महिन्यातून एकदा करायला मिळाले पाहिजेत...... झकास......छान वाटतंय......टार्गेट्स, टेंडर्स, प्रोजेक्ट प्लॅनिंग, रिसोर्स अॅलोकेशन वगैरे रगाड्यातून काहीतरी वेगळं करायला तरी मिळालं!
विचारांच्या तंद्रीत घरी पोचलोय...... घरी कोणीच कसं नाही? अन्या तर आज खुश असणार सलील कुलकर्णीना भेटायला मिळालं म्हंणून. (अन्या = अनीश - आमचे चिरंजीव, वय वर्ष ७. महा इब्लिस कार्टं. कुठे, कधी अन काय बोलून आपली विकेट काढेल भरवसा नाही).... पण गेला कुठे घोडा? मी हात-पाय धुवून बाहेर येतोय तोच डोअर-बेल वाजते. २-३-४-५ वेळा. अन्याच हा. मी बाहेर येईपर्यंत बायकोनी दार उधडलं आहे आणि आमचा कार्टा वारं प्यायल्यागत धावत येऊन माझ्या अंगावर उडी घेतोय.
"बाsssssssssबा" अशी आरोळी मारली जाते! पोरगं बिलगून म्हणतं "बाबा काय भारी बोललास तू. मला खूप खूप आवडलं तुझं 'भाषण'! तिकडच्या लोकांनापण आवडलं खूप.... ते टाळ्या वाजवत होते." त्याच्या मागे बायको आमचा हा पिता-पुत्र प्रेमाचा सोहळा गालातल्या गालात हसत बघतिये.
"थॅssssक्यू सायबा - आवडलं तुला?"
"खूप आवडलं."
"अरे पण आत्ता तुम्ही कुठे गेला होतात?"
"बाबा.... तू इतका भारी बोललास ना... म्हणून आज तुला माझ्याकडून पार्टी! आई आणि मी जाऊन मस्तानी घेऊन आलोय. आजी - आबा, काका - काकू पण येतायत."
"अरे वा! तुझ्याकडून पार्टी?"
बायको मला सांगते की घरी आल्या आल्या अन्यानी त्याची पिगी बेंक उपडी केली आणि म्हणाला "आज मी बाबाच्या कार्यक्रमाची पार्टी देणार". त्यानी सगळ्यांना फोन केले अन बोलवून घेतलं त्याच्या बाबाच्या पार्टीला. आई - बाबांना पण कार्यक्रम आवडलाय.... पण पोराच्या चेहर्यावरून मात्र बापाचं कौतुक ओसंडून वाहतंय.
पोरगा माझ्या मांडीवर बसूनच मस्तानी खातोय.... घरचे सगळे गप्पा मारतायत... आता त्यांच कार्यक्रामचं कौतुक अर्थातच ओसरलंय.....त्यांचे विषय वेगळेच आहेत... पण अन्या मात्र मला सांगतोय....."बाबा... त्या 'काय झाले' गाण्याला ना मला रडू येत होतं....आणि तू ती कविता पण भारी म्हटलीस.... कुठली रे??.... पुण्यनगरी???.. पुण्यनगरी म्हणजे काय रे?.... आणि तो काका ड्रम्स कसला भारी वाजवत होता ना.........आणि ना...."
मला बाकीचे चेहरे अंधुकसे दिसतायत...... अन्या बोलतोच आहे.......मला मस्तानी भरवतोय.... मी मस्तानी बरोबरच एक आवंढा गिळतो.....माझा आनंद माझ्या गालांवरून ओघळतो.
वाचने
20309
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर..
नशिबवान आहात!
नशिबवान आहात.+++1111
सुरेख लिहिलंय
मस्तच! छान अनुभव.
मस्तच
मस्त अनुभव....
नि:शब्द !! खरंच नशीबवान आहात.
किती मस्त!
वा! मस्त वाटलं वाचताना!!
काय मस्त वर्णन आहे!
एकदा मिपाकरांचा आणि
In reply to काय मस्त वर्णन आहे! by बहुगुणी
जरूर करुयात!
In reply to एकदा मिपाकरांचा आणि by जे.पी.मॉर्गन
फारच छान जेपी!
अत्यंत मनस्वी !
जबराट..
माझ्या लेकालाहि त्याच्या
फारच गोड अनुभव. अतिशय नशीबवान
खरच! बाहेरच्यांपेक्षा अस घरात
प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचेच
लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा,
In reply to प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचेच by जे.पी.मॉर्गन
अगदी नेमकं बोललात, किसनदेवा!
In reply to लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा, by किसन शिंदे
जसा आकार देऊ तशी घडतीलहे अगदी खरं आहे, आणि जेपींनी त्यांच्या तबल्याच्या सुंदर उदाहरणातून अतिशय सहजपणे ते दाखवून दिलं आहे. What is more important is: या अतिशय impressionable वयात, भली-बुरी दोन्ही options सांगून, शेवटी निर्णय मुलालाच घ्यायला लावून decision-making चा महत्वाचा आधिकार देणं हे फारच सहज रीत्या मांडलंय, ते खास भावलं.गेम टीव्ही आणि कटकट
In reply to लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा, by किसन शिंदे
बे-श-ट
तिकडे अन इकडे
खरंय पैलवान.
In reply to तिकडे अन इकडे by तुषार काळभोर
मस्तच अनुभव.
खुपच सुंदर..!!
सुंदर अनुभव
सुंदर अनुभव !
एकदम मस्त!!!!
खुपचं छान लिहिलय
सुंदर..
सहीच :)
हा मस्त धागा वाचायचा राहून
वाह !!
यप्प..
In reply to वाह !! by अर्धवटराव
सुंदर !!!
हेच तर आपल्या पिल्लांना शिकवायच असत.
ग्रेट
In reply to हेच तर आपल्या पिल्लांना शिकवायच असत. by बाबा पाटील
+१
In reply to ग्रेट by कपिलमुनी
धन्यवाद मुनीश्वर...!
भारी रे!!
मस्तं.