Skip to main content

चहा, सिगरेट आणि तत्वज्ञान - सुशिक्षित कि …. ?

लेखक खोंड यांनी शुक्रवार, 24/10/2014 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
"५ कटिंग दे रे…. " माझ्या कडून ऑर्डर गेली … "जोश्या चल ना … " सावंतने डोळयाने खुणावलं … दोघे सिगरेटी घेऊन आले…. "च्यायला या दुचाकी वाल्यांच्या…. " सावंत कडाडला … सकाळपासूनच मूड खराब होता "काय झालं रे " मी सावंतने फक्त निराशार्थी मान हलवली सिगरेटचा एक मोठा झुरका घेतला आणि हळू हळू धूर सोडू लागला सगळे सावंत कडे डोळे लाऊन "सकाळी ऑफिस ला येताना गाडी ठोकली एकानं … वितभर डेंत पडलाय डाव्या दरवाज्याला … " "अर्रर्र ….

डोंबिवली कट्टा पंचनामा

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 23/10/2014 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
मी, माम्लेदारचा पंखा, राहणार ठाणे असे नमूद करतो की दि. १८ ऑक्टोबर २०१४ रोजी नंदी पलेस डोंबिवली येथे संध्याकाळी ७. ३० च्या दरम्यान काही व्यक्ती कट्ट्यासंदर्भात एक गुप्त बैठक करणार आहेत अशी खबर मिळाल्यामुळे मी तिथे साध्या वेशात उपस्थित राहायचे ठरवले.

तुम्हाला तुमच्या मुलांना मॉडेल म्हणून पाहणे आवडेल काय?

लेखक योगी९०० यांनी मंगळवार, 21/10/2014 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला तुमच्या मुलांना मॉडेल म्हणून पाहणे आवडेल काय? हाच प्रश्न मला एकदा एका मॉलमध्ये कोणीतरी विचारला होता. अर्थात लगेच होकार दिला नाही. विचार करून सांगतो असे सांगितले. साधारण वर्षभरापुर्वीची गोष्ट आहे. त्याचे असे झाले, एका घराजवळच्या मॉलमध्ये आमचे नेहमी जाणे व्ह्यायचे. बाहेर वेगवेगळ्या वस्तूंचे प्रमोशन चालायचे. त्यातल्या त्यात क्रेडीट कार्ड, क्लब हॉलिडेस यांनी तर फारच छळले होते. एकदा विकांताला सहकुटूंब तेथे हिंडत असताना अशीच एक गोरी गोमटी मुलगी (साधारण २०-२२ वर्षाची) आमच्या जवळ आली. उगाचच माझ्या मुलांचे कौतूक केले आणि मला म्हणाली.

पाणी

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 19/10/2014 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख प्रहार वृत्तपत्रात प्रकाशित झालेला असून त्याचा दुवा हा: http://prahaar.in/collag/257578 काही दिवसांपूर्वी एका ट्रेकला गेलो होतो. डोंगरदऱ्यांतून फिरण्याची मजा जितकी वेगळी असते, तितकीच वेगळी असते ती म्हणजे अशा भटकंतीतून होत जाणारी स्वत:ची आणि जगाची ओळख. आपल्या ‘कंफर्ट झोन’मधून बाहेर गेल्यावर, गावातून खेडय़ांतून प्रवास केल्यावर तिथलं जीवन समोर येतं, तेव्हा कळतं की प्रत्येक गोष्टीला किती किंमत आहे आणि महत्त्व आहे. ट्रेक करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे कुठली असावी, तर ती म्हणजे ‘पाणी’.

जडण-घडण 12

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 17/10/2014 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या ऑफीस जॉबचा निरोप घेतल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस छान निवांत गेले. मनाला आलेलं साचलेपण हळू हळू निथळू लागलं. सकाळी उठायचं, रोजची कामं आवरायची, आईला मदत हवी का, ते पाहायचं, मग निवांत पेपरवाचन... दुपारच्या जेवणानंतर गेल्या अनेक महिन्यात वेळोवेळी कुठे कुठे खरडून ठेवलेल्या ओळी, कल्पना चाळायच्या... असे खूपच कागद जमले होते. छान वेळ जायचा. संध्याकाळी बाबा ऑफीसमधून आल्यानंतर आई-बाबांसोबत चहा. मग ते दोघं नेहमी एक फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडायचे. मी कधी त्यांच्यासोबत तर कधी एकटीच भटकायचे. माझे बाबा नीटीमध्ये होते. आयआयटी सारखीच नॅशनल इंडस्ट्रीयल इंजिनियरींग इन्स्टीट्यूट.

विधानसभा मतदान: १५ ऑक्टोबर २०१४ - आपले अनुभव

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 15/10/2014 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज १५ ऑक्टोबर २०१४, विधानसभा निवडणूकीच्या मतदानाचा दिवस. आज ऑफिसला मतदानाची सुट्टी असली तरीही मला आज ऑफिसमध्ये दिवसभर काम असल्यामुळे जावे लागणारच होते. तेव्हा सकाळी लवकर उठून ६.५०लाच मतदान केंद्रावर गेलो. चिंचवडच्या माटे शाळेत माझे मतदान केंद्र होते. वोटर्स स्लिप मिळाली नव्हतीच मात्र निवडणूक आयोगाच्या संस्थळावरुन अगोदरच माहिती घेतल्यामुळे मतदान केंद्र, विभाग क्रमांक, अनुक्रमांक इत्यादी तपशील घेऊन ठेवला होताच. इतक्या लवकर जाऊनही केंद्रावर माझ्याहीआधी २/३ लोक उभे होते. लगेचच माझ्यामागे १५/२० जणांची रांग उभी राहिली. एकंदरीत मतदान सुरु व्हायच्या आधीपासूनच उत्साह दिसत होता.

क्लास

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 14/10/2014 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रहार वृत्तपत्रात गेल्या रविवारी प्रकाशित झालेला माझा हा लेख इथे सादर करत आहे. मुंबई रेलवे ही भारतातल्या सर्वाधिक गर्दीच्या परिवहन सेवांपैकी एक आहे. दररोज सुमारे २५०० लोकल सेवा या मार्गांवर धावतात आणि सरासरी ७५ लाख प्रवाशांची ने-आण करतात. या रेल्वेचं मुंबईकरांशी असलेलं नातं, मुंबईकरांनाच नव्हे तर मुंबई बाहेरच्यांनाही जवळचं वाटणारं आहे. 'जवळचं' म्हणताना गर्दी, चेंगराचेंगरी नाही आठवली तरंच नवल. प्रचंड गर्दीच्या या मुंबईतील लोकल प्रवासात, भाग्यवंतांनाच बसायला मिळतं, एरवी घोड्यासारखं उभं रहाण्यावाचून पर्याय नसतो.

पुणे ट्रॅफिक पोलिस .

लेखक किशोरअहिरे यांनी सोमवार, 13/10/2014 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा अनुभव .. अत्यंत लाजिरवाना/संतापजनक आणी जनतेला कसे लिगली लुटावे ह्याचा घेतलेला हा अनुभव आभार पुणे ट्रॅफिक पोलिस . काल दिवाळी शॉपींग साठी म्हनुन कार घेऊन निघालो .. नेहमी प्रमाणे जुन्या मुंबई - पूणे हायवे ला वाकडेवाडि कडुन एक अंडर ब्रिज आहे .. तिकडुन कार काढली तर समोर साक्षात १०-१५ ट्रॅफिक पोलिस ऊभे कमीत कमी २० कार / ४ चाकी आडवुन ऊभे .. पावत्या फाडायला.. (ईतके पोलिस सोडा एक पोलिस सुध्दा कधी संध्याकाळि भव्य ट्रॅफिक जाम असतो तेंव्हा तर दिसत सुध्दा नाही ) मला पण आडवुन .. पोलिसः "ए चल लायसन काढ (अरेराविपनाने बोलत..) " (ह्याना नीट का बोलता येत नाही) मी: "लायसन हातात दिले..

निरवतापाची जत्रा

लेखक निराकार गाढव यांनी रविवार, 12/10/2014 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
अताशा निरवतापाच्या जत्रंला पूर्वीसारखी मजा नाय रावली. तुमी इचाराल ह्यो निरवताप कोणचा गाव... तर आपल्या सार्वेजेनिक पारापासून तसा अगदी हाकंच्या अंतरावर हाय. येक पाच कोस आलिकडं म्हनाना. तर निरवतापात खूप जत्रा लागतात. खंडोबाची जत्रा, नीळावण्ती देवीची जत्रा, अंबाबायचा गोंदोळ, ग्यानबाची पाल्की, नरसोबाची गाडी,...  निसता उच्छाद असतुया. पोरं आयबापाची नजर चुकावून सांजंला साळा सुटली की उणाडक्या करत जत्रंत शिरायची. मलाबी त्ये बरुबर घ्यायची. गरदीमद्दे लै धम्माल आसायची. देवीच्या म्होरं पोरं लेझीम खेळायची. मंग मोट्टे मानसं पोरांस्नी कायतरी खायाला द्यायच्ये आन एक दोन रुपं बी हाती टिकवायच्ये.

मला भावलेलं गाणं

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 09/10/2014 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
घरी येता येता ती तिच्या घराच्या दारात उभी दिसली. मन प्रसन्न झाले. खांदा दरवाज्याच्या चौकटीला टेकवून उभं राहण्याची तिची ती तर्‍हा मोहक होती. ती तशी उभी राहिली की तिच्या कंबरेची उजव्या बाजूला नाजूक कमान तयार होत असे. तिचा उजवा हात कमरेवर आणि डावा हात वेणीशी चाळा करत असे. घरी आलो. चैन पडेना. पुन्हा एकदा तिच्या घरावरून चक्कर मारण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. ती अजून तशीच उभी होती. मला पुन्हा पाहताच सुरेख हसली आणि आत पळून गेली. मनाला इतकी खुशी इतर कुठल्याच गोष्टीने होत नसे. परत घरी जायला निघालो. आभाळ भरून आलं होतं; पावसाचे थेंब पडू लागले होते. तिच्या त्या हसण्याचा गारवा मनाला गुदगुल्या करतच होता.