किस्से एका डॉक्टरचे
मायमराठीतले (आणि सावत्रमाय विंग्रजीतले) काही शब्द आपल्यामागे एक एक इमेज घेऊन वावरत असतात. मंत्री (मराठीत मिनिष्टर ) म्हटल्यावर डोक्यावरची गांधी टोपी सावरत कडक इस्त्रीच्या खादी जाकिटाची बटणे कुरवाळत फर्डे भाषण करणारा बगळासदृश्य मनुष्य डोळ्यासमोर येतो. वकील हा सहसा घाऱ्या कावेबाज डोळ्यांचा धूर्त इसम असतो. आणि डॉक्टर हा शब्द उच्चारताच एक सौम्य धीरगंभीर, सौहार्द आणि कणवपूर्ण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निर्व्यसनी व्यक्तिमत्व नजरेसमोर उभे राहते.
खारकर डॉक्टर हे याला शंभर टक्के अपवाद होते. होते म्हणायला कारण आता ते नाहीत.
मिसळपाव