Skip to main content

जडण-घडण...6

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 21/07/2014 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
डी.एड्. च्या त्या दोन वर्षांनी मला भरभरून दिलं. उत्तम गुण मिळवून पाणावल्या डोळ्यांनी आम्ही सर्वांनीच विद्यालयाचा निरोप घेतला. आधी वरचेवर होणारं बोलणं कालांतराने कमी होत गेलं पण मैत्रीची नाळ मात्र टिकली. त्यानंतर सुरूवात झाली नोकरी शोधायला. डी.एड्. करण्यापूर्वी वरचेवर वर्तमानपत्रात दिसणाऱ्या पाहिजेत च्या जाहिरातींना आता महत्व आलं. हो -ना करता-करता घरापासून चालत २०-२५ मिनीटांच्या अंतरावर असणाऱ्या एका विद्यालयात प्राथमिक शिक्षकाचं पद रिक्त असल्याचं समजलं. उत्साहाने शाळेत पोहोचले. पहिला पाठ घेतला आणि निरीक्षकांनी 'उद्यापासून या' असं सांगितलं. मी खूष. पगार... पाचशे रूपये फक्त.

बो, बॉब आणि आयफोन

लेखक हेमंत बेंडाळे यांनी शुक्रवार, 18/07/2014 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस: फेब्रुवारी २०१० २रा आठवडा (नक्की दिवस आठवत नाहीये पण सुट्टी होती त्यानंतर ) स्थळ: Superior ,CO वेळ: असेल रात्री ७, ८ वाजेची मी आणि माझा सहकारी योगेंद्र बस मधून उतरून lawn तुडवत शोर्टकट मारत माझ्या अपार्टमेंट वर चाललो होतो अचानक मला माझ्या पायाखाली काहीतरी तुडवल्यसारखे वाटले बर्फ होता पण त्याखाली काहीतरी होतं थोडा अंधार होता तिथे जे काही होता ते उचलला आणि पुढं जाऊन बघतो तर काय मी पायाखाली चक्क आयफोन तुडवत होतो. बापा जन्मात कधी आयफोन बघितला नवता आणि तो पायाखाली. मला वाटला गेला आता तो, पण बनावट चांगली आहे म्हणावा नाहीतर काय ७० किलो चा भर सहन केला त्याने आणि तरी चालू होता.

"टी "

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 13/07/2014 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
असाच ऑफिस मध्ये पाट्या टाकण्याचा अजून एक दिवस . पावसाळी दुपार . एके काळी आपण स्वतहाशिच काय काय गगनचुंबी promises केली होती आणि आपण आता हे काय करत आहोत हि मनातून मधूनच टोचण्या देणारी जाणीव अजूनच टोकदार झालेली. असेच स्वतहाला कुरतडत बसण्याचा खेळ चालू असताना एकदम फोन वाजतो. फोन त्याचाच असतो. " जिवंत आहेस का? बऱ्याच दिवसात तुझा उदास आवाज कानावर पडला नाही . म्हंटल आपणच फोन करावा ।" "अरे काही नाही रे. असाच busy होतो ऑफिस च्या कामात. " " तुझा आवाज बराच cheerful येतोय .

जडण-घडण...5

लेखक माधुरी विनायक यांनी बुधवार, 09/07/2014 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
गिरगावातल्या सेवासदन अध्यापिका विद्यालयातली ती दोन वर्षं कमाल होती. शाळेच्या सातवीपर्यंतच्या शिक्षणानंतर खूप काळाने मनाजोगा कंपू भेटला होता. हो, आता कंपू ची जाणीव होऊ लागली होती. घरापासून अंधेरी स्टेशनपर्यंत बस, तिथून २ नं. प्लॅटफॉर्मवरून सकाळी ८.५७ ची चर्चगेट स्लो लोकल. रेल्वेच्या नियमित प्रवासाचा पहिला अनुभव, तिथे पाच जणींचा एक कंपू. मग विद्यालयात आमचा १० जणींचा मोठ्ठा कंपू. पूर्ण वेळ अभ्यासक्रम, म्हणजे अख्खा दिवस आम्ही सगळ्या सोबत असायचो. पूर्ण वेळ साडी नेसणं अनिवार्य. सवय नसल्यामुळे सुरूवातीला काही मुली विद्यालयात जाऊन कपडे बदलून साडी नेसायच्या, मग हळू-हळू सरावल्या.

कुंथुनी .. काय घेता??? मोकळे होता..मिळे स्वर्ग!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 06/07/2014 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
ढुश्श..-क्लेमर :- ज्यांना हलकं फुलकच खाल्लेलं पचतं..अश्यांनी सदर लेखन वाचू/चावू नये. उद्या सकाळी त्रास-झाल्यास आंम्ही जबाबदार (रहाणार) नाही! आणि हो..स्मायल्या'ही बर्‍याच आहेत,त्या सह न करत वाचावे.कारण आंम्हास स्मायल्या न लावल्या शिवाय,लेख-होत नाही..(तिकडल्या-प्रमाणेच! *lol* ) त्यामुळे णाविलाज! *biggrin* ................................ सद्ध्या पांजाबीफुड,चमचमीत आहार असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ.खारीक* खा पटापटा.) असे बलवंत(मंजे हेल्थकाँशस हो!) लोकांचे सुरु असते.

माउलींच्या पालखी सोबत एक दिवस :- भाग २

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 03/07/2014 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
माउलींच्या पालखी बरोबर एक दिवस - भाग १ साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला| ठायीच मुरला अनुभव|| कापुराच्या वाती उजळली ज्योती| ठायीची समाप्ती झाली जैसी|| मोक्षरेखे आला भाग्ये विनाटला| साधूंचा अंकीला हरिभक्त|| ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी| हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी|| फोटो क्र. ३१ फोटो क्र. ३१ या वारीत अनेक बलुतेदारसुध्दा सामिल झाले होते.

माउलींच्या पालखी बरोबर एक दिवस - भाग १

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 01/07/2014 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ॥१॥ जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन मोहरा आपुलिया ॥२॥ सर्व सुकृतांचे फ़ळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडुरंगीं ॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलाची भेटी । आपुलिये संवसाठीं करुनि ठेला ॥४॥ पांडुरंगाच्या भक्ती मधे आकंठ बुडालेल्या वारकरी सांप्रदायाच्या भक्ती मार्गातला परमोच्च बिंदु असलेल्या माउलींच्या पालखी सोहळ्यात सामील व्हायची, पालखी बरोबर बरोबर चार पावले चालायची इच्छा बरेच दिवसांपासुन मनात होती पण कधी माउलींचे बोलावणे येत नव्हते. या वर्षी तो योग जुळून आला.

पढत मुर्ख व मुर्खाची लक्षणे

लेखक आयुर्हित यांनी मंगळवार, 01/07/2014 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
एका पढत मूर्खाची एक गोष्ट आहे. एक पढत मुर्ख एका गाढवावर बसला होता आणि गाढव पळत होता. त्याच त्याचं रस्त्यावरून तो बराच वेळ गोल गोल फिरत राहिला. तेव्हा कुणीतरी त्या सज्जन गृहस्थाला विचारले की,” मी बराच वेळ तुम्हाला इथेच फिरताना बघतो आहे. तुम्हाला नक्की कुठे जायचे आहे? तर तो म्हणतो, “मला माहित नाही. गाढवाला विचारा.” बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असेच होते. आपण समजून न घेताच काम करत रहातो, अनेक गोष्टी करत रहातो की याचा उद्देश काय आहे? असे करताना निसर्गाने जे उपलब्ध केले आहे त्याचा आनंदही उपभोगत नसतो.

शॉपिंग

लेखक वाचनपिपासु यांनी सोमवार, 30/06/2014 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारची दुपार मस्त ताणून द्याईचा प्लान होता ,तितक्यात कानात काहीतरी कुजबुज होते थोडा समान आणैईचा होता मार्केट मधून .....!! अलॉखे ,पिलॉखे घेत का - कु करत हो म्हणत तयार झालो . थोड्या फार अनुभवा वरुन एक गोष्टा शिकलो , ती मणजे बाहेर कोणतेही आणि कितीही समान आणैचे असल्यास , एक लिस्ट करून घ्यावी सामानाची . लिस्ट करण्याचे 2 फ़ाइदे , एक तर तुमाला स्मरण शक्तीचे खेळ खेलाईची गरझ नाही , आणि दुसर आणि महत्वाचा ,उद्या जौन तुमच्या वर आरोप होऊ शकतो की ही गोष्टा सांगितली होती आणि ती नई आणली , ही लिस्ट प्रूफ म्हणुन दाखवू शकता. आणि जमले तर रिजिस्टर्ड पोस्ट प्रमाणे घरी आल्या वर त्या वर सगळे समान आले अशी साही न शिक

उमड घुमड ...

लेखक मैत्र यांनी शनिवार, 28/06/2014 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारपासून उकाडा जास्तच जाणवत होता. कुठे जावं तर रस्त्यावरची गर्दी नकोशी वाटत होती. गाडी चालवण्यासाठी किंवा वाट काढण्यासाठी होणारी चिडचिड लक्षात घेता तो बेत रहित केला. उगाच काहीतरी किरकोळ उद्योग करत घरीच बसून राहिलो. घरात कोंदट वाटत होतं म्हणून अनेक दिवसांनी बाल्कनीत जाऊन बसलो थोडी मोकळी हवा मिळावी अशा विचाराने. फोनचा चाळा होताच वेळ घालवण्यासाठी. थोड्या वेळाने काहीतरी फरक जाणवला की हवा बदलते आहे. वारा सुटला आहे. आजूबाजूची मोठी झाडं सळसळत होती. छोटी झुड्पं वार्‍याच्या वेगाने थडथडत होती... आभाळ भरून आलं होतं.. एखाद्या उत्तम जलरंग चित्रासारखे ग्रे ढग पसरले होते.