Skip to main content

सत्य घटनेवर आधारित

लेखक पाटील हो यांनी बुधवार, 20/05/2015 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
कॉल सेंटर मधून एका मुलीने कॉल केला न झाली चालू बडबडायला . ती : नमस्कार चमत्कार झाल्यावर, मी श्वेता बोलते . मी : बोल की श्वेता. ( माजी लई जुनी मैत्रीण असल्यासारख मी पण हाणून दिलो ) ती : सर तुम्ही पाटील बोलत का मी : होय. ती : सर तुमचा रेचारज संपून १५ दिवस झाले अजून का रेचार्ज केला नाही अमुक तमुक आता रेचार्ज केला तर हे ऑफर आहे , १ वर्षा चा करा हे ते …… मी : नाही ग नको कशाला … आजकाल मी tv पाहत नाही . ती : का हो सर ?

टाटा स्कायची लबाडी

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 19/05/2015 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
मला आज सकाळी टाटास्काय कडून १४०९३४०४९४ या फोनवरुन माझ्या लँडलाईनवर फोन आला.टाटा स्काय व्यवस्थित चालू आहे ना असे चारले. मी काही अडचण नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने जावेद अख्तर ॲक्टीव या बद्दल माहिती दिली. १०२ नंबर वर दिसते असे संगितले. मी ठिक आहे असे सांगितले. त्यानंतर मला एसेमेस आल तुमची विनंती पुर्ण करण्यात आली आहे व जावेद अक्तर ॲक्टीव्ह ४९/- प्रतिमहिना. इथे मी त्यांना चालू करण्याबद्दल काहीही सांगितले नसताना स्वत:च फोन करुन तुमचीच विनंती असल्याची बतावणी करुन आपल्या लबाडीयुक्त मार्केटिंगचे दर्शन घडवले. त्यांच्या वेबसाईट वर तक्रार करण्याची सोयच नाही.

चला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची) भाग २

लेखक नाखु यांनी शनिवार, 16/05/2015 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आधीची हवा
यातील काही बाबी बिनबियांच्या गोष्टी असल्या तरी काही बियांच्या आहेत, त्या त्या बिया कोल्हापूर कट्टेकर्यांना माहीती आहेत
या नंतरचे व्यक्तीमत्व हे थेट कोकणातील अस्सल लाल मातीतून आणि साक्षात लोकमान्य टिळकांच्या पावनभूमीतून आलेले आहे.म्हणजे बघा आजकाल वेगवेगळ्या टीव्ही मालिकांअमध्ये (विशेषतः १५-२० पे़क्षा कमी माणसं नसलेली कुटुंब काबीला वाल्या) एखाद स्निग्ध हसर्या चेहर्‍याची स्त्री भूमीका असते तशी ही व्यक्ती आहे. रत्नांग्री चे असूनही सरळ बोलणारे हे व्यक्तीमत्व फार दूरदर्शी आहे य

काही नवे करावे म्हणून.-भाग ३

लेखक नूतन सावंत यांनी शुक्रवार, 15/05/2015 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
"पण ते राहतात कुठे?"मी आजीना विचारले. "चला माज्यासंगाती,मी दाखवतंय.मी त्याचो डब्बोच घेवन ललंय."आम्ही आजींच्या मागून निघालो. (क्रमशः) ********************************************************************************* आजी चालता चालताही बोलत होत्या.मध्येच थांबल्या.चपापून म्हणाल्या,” तुमी कुटून आलात?कोण त्यांचे?” मी सांगितले,”नाही.कोणी नाही.

काही नवे करावे म्हणून.-भाग २

लेखक नूतन सावंत यांनी गुरुवार, 14/05/2015 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या दिवशी भावाचा फोन आला,"ताई,मी आज जाऊन आलो फणसोपला.तो चाफेरकर (तलाठी)काय म्हणाला म्हीतीय? तुमची बहिण आणि मेहुणे मंत्रालयात आहेत न?मग मग त्यांना माहिती नाही वटते काम कसे करतात?वजन कसे ठेवतात?मी त्याला सांगून आलोय की, ताई येऊन तुझ्या डोक्यावरच वजन मारेल म्हणून?" "ठीक आहे."असे म्हणून मी फोन ठेवला.

डोक्क्यात जाणारी सेल्समनशिप

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 14/05/2015 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
सेलिंग किंवा मार्केटिंग हे एक स्किल आहे; जे सगळ्यांना जमत नाही. एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी समोरच्या माणसाला प्रवृत्त करणं, हे मला तरी महाकठीण काम वाटतं. नॉट माय चहाचा कप. आज बाजारात तुम्हाला कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तरी तुमच्यापुढे अनेक पर्याय असतात. बरं, स्पर्धा इतकी आहे की कंपन्याही आपली वस्तू विकली जावी (मग ती कशीही असो काहीही असो) हा एककलमी कार्यक्रम घेऊन शर्यतीत उतरलेल्या असतात. त्यांचे मोहरे असतात ते म्हणजे सेल्समन. ग्राहक म्हणून तुमचा अधिक संबंध येतो तो या 'सेल्समन' नावाच्या प्रजातीतील व्यक्तींशी. कुणाचीही हेटाळणी करायचा उद्देश नाही, त्यामुळे हलकेच घ्या (take it easy).

हम तो तेरे आशिक है...

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 13/05/2015 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
सन १९८१ साली या देशात २ क्रांतिकारी घटना घडल्या. एक माझा जन्म झाला दूसरी एक दुजे के लिये रिलीज झाला. रातोरात वासू - सपना ही जोडी हीर - रांझा, सोनी-महिवाल, सलीम - अनारकली यांच्या पंक्तीत जाउन बसली. पण वासू - सपना या जोडीचा वारसा इतर सर्व जोड्यांपेक्षा अविनाशी ठरला. हा वारसा होता जिथे जागा मिळेल तिथे आपली स्वतःची "वासू - सपना" जोडी कोरण्याचा.

एक आठवण - उन्हाळ्याच्या तो दिवस

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 05/05/2015 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या १०-१२ वर्षांपासून दिल्लीत ही नागपूर सारखा उन्हाळा पडू लागला आहे. मे महिन्यातच तापमान ४५ अंशापर्यंत जाते. सोफ्यावर बसून विजय वर्तमान पत्र वाचत होता, लू लागून मरणार्यांच्या आंकड्यांवर त्याची नजर गेली. वाचता-वाचता, अतुलचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर तरळला. पाच वर्षांपूर्वीचीच मे महिन्यात असाच उन्हाळा होता. आकाशात सर्वत्र पसरलेली राजस्थान मधून येणारी लाल धूळ आणि प्रचंड गरम वारे, दिवसाकाठी घर बाहेर निघणे दुष्कर होते. त्या दिवशी शनिवार होता, विजय काही कामानिमित्त, आर के पुरम येथे स्थित भिकाजीकामा पेलेस येथे गेला होता. काम संपवून, दीड एक वाजेच्या सुमारास बस घेण्यासाठी तो बस स्थानकावर आला.

ऐक स्वखे त्रिधारा : भाग ६

लेखक नाखु यांनी सोमवार, 04/05/2015 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
स्व भाग २:
स्वखीला हारदवून टाकणार्या दु:खातून बाहेर काढणे हीच महत्वाची जबाबदारी त्याच्यावर होती.
क्रमशः ज़िंदगी ... कैसी है पहेली, हाए कभी तो हंसाये कभी ये रुलाये ज़िंदगी ... कभी देखो मन नहीं जागे पीछे पीछे सपनों के भागे एक दिन सपनों का राही चला जाए सपनों के आगे कहाँ ज़िंदगी ... आता खरा कसोटीचा काळ होता एक बाजूला स्वखीला यातून सावरणे आणि दुसरीकडे तीचे मन गुंतवून ठेवणे आवश्यक झाले होते.मुले शाळेमुळे घराबाहेर त्यामुळे स्वखी एकटीच घरी, जास्त वेळ त्यामुळे नैराश्य आणी थोडीशी अबोल झाली होती. यावर उपाय म्हणून म्हणा की थोडी हवापालट म्हणून मी बेंगलोरला ट्रीप