Skip to main content

अनुभव

ह्या कॅन्सरवर इलाज आहे का?

लेखक मार्मिक गोडसे यांनी बुधवार, 18/03/2015 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी महिनाभर राहून मनसोक्त हुंदडायचे,मामेभाऊ व त्याच्या मित्रांबरोबर खेळायचे , टिंगलटवाळ्या करायच्या व सुट्टी संपली की ही आठवणींची शिदोरी घेवून आपल्या घरी परतायचे हा माझा दरवर्षीचा कार्यक्रम असे. अकरावीची वार्षिक परिक्षा संपल्यावर दरवर्षीप्रमाणे आजोळी गेलो. दुपारची वेळ असूनही घरात आजी आजोबांव्यतिरिक्त कोणीच नव्हते. मामेभाऊ-बहीण कोणीही घरात नव्ह्ते, प्रत्येकाने स्वतःला अभ्यासापासून ते पोहण्यापर्यंतच्या क्लासेसमध्ये गुंतवून घेतले होते. हातपाय धूवून फ्रेश होवून आजी-आजोंबांबरोबर थोडावेळ गप्पा मारल्या व बाहेर सटकलो.

टेंडर (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 17/03/2015 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळच्यान साहेब खुशीत होते. फायद्याचं कलम असणार हे सगळ्यांनी ओळखलं. सायबांनी बेल मारली - केबिनमधे सगळे शिपाई जमले. ''आपल्या संस्थेत स्वच्छ्ता चांगली होत नाई. तुमची टाळाटाळ असतेच, त्यातून आपली संस्था जुनी. खोल्यांची उंची जास्त आहे. त्यामुळे आपण शासनाला प्रस्ताव दिलावता - व्ह्याक्यूम क्लिनर्सची गरज आहे. त्याप्रमाणे लगेचच टेंडर पास हून पाच यंत्रं आलीयत . . सगळ्यांनी नीट बघा कशी वापरायची. सोमवारपासनं संस्था एकदम चकाचक दिसायला पायजेल !''. *** महिना निघून गेला रुटीन सुरु ऱ्हायलं- घाण तशीच! सायबानं घेतलंन सगळ्याना .

ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स

लेखक पुष्कर विजयकुमार जोशी यांनी सोमवार, 16/03/2015 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
"ए बारक्या, ते तेल बाटलीत काढून ठेव, उद्या लागेल", दिवसभर जीलेब्यांचे घन काढून थकलेला राक्या बोलला. रात्रीचा थंड वाऱ्यात त्याला आत्ताच पेंगायला होत होतं. दिवसभराच्या वाहतुकीनंतर शांत झालेला रस्ता. राक्याच्या गाडीच्या बाजूलाच पान टपरी, तिथे २-३ लोक सिगारेटी ओढत बसलेले. पान टपरीवाला थोडा रसिक पट्टीतला असावा, त्याच्या टपरीवर नुस्रत चे गाणे चालूए… वोह हटा रहे है पर्दाह, सर-ए-बाम चुपके चुपके… एका उंची दुचाकीवरून एक मुलगा उतरतो, "एक माईल्ड भाऊ" त्याचा फोन वाजतो. "हं बोला सर" इकडे राक्याची आवरा-आवर चालू आहे.

पत्र

लेखक आतिवास यांनी बुधवार, 11/03/2015 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
मीटिंग संपली. बाया लगबगीने घराकडे परतल्या. “माज्या घरी चल,” रखमामावशीने हुकूम सोडला. मला तिच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची संधी हवीच होती. गेले . चहा झाल्यावर ती म्हणाली, “येक पत्तुर लिवायचंय.

साईझ मॅटर्स

लेखक पॉइंट ब्लँक यांनी मंगळवार, 10/03/2015 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
डीएसलार घेवून फिरणारया माकडांच्या गँग मध्ये नुकताच सामील झालो होतो तेव्हाची गोष्ट. मोठा कॅमेरा हातात आला की आपण लई भारी फोटोग्राफर होणार अस उगाचा वाटायला लागते. पण मॅन्युअल मोड वापरताना सुरवातीला जो घाम फुटतो तो सगळी हवा काढून टाकतो. आणि मग उगाच खुन्नस खावून सराव चालू होतो. मिळेल तिथे, जे हाताला लागेल त्याचे फोटो काढणे. मध्येच कुणी "वर्तमानपत्रात काम करता का?" असे विचारून उगाच कुरवाळून जातो. असो. असाच एक सराव बेंगलोर मध्ये एका तळ्याकाठि चालला होता. तिथे एका वॉटर लिलीचे फोटो काढण्याचा प्रयत्न चालू होता. काहि केल्या मनासारखा फोटो येत नव्हता.

गोलमाल झेरॉक्स सेंटर आणि आपण

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 09/03/2015 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
आज आलेला अत्यंत फसवा अनुभव. बाकीच्यांनीही सावध व्हावं म्हणुन लिहितोय. आज अचानक माझ्या एका कुप्रसिद्ध सरकारी बँकेत जायला लागलं. ८०'सी खाली गुंतवणुकीचा पुरावा म्हणुन एफ.डी. सर्टीफिकेट घ्यायचं होतं. आधी म्हणल्याप्रमाणे बँक कुप्रसिद्ध आणि सरकारी असल्याने एक जन्मकुंडली सोडुन सगळी डॉक्युमेंट्स साक्षांकित करुन दिलेलीचं होती. आणि बँकेच्या अत्यंत काळजीपुर्वक धोरणाला अनुसरुन पॅन कार्डची साक्षांकित प्रत हरवली गेली (पुढच्या वर्षीपासुन रिसिव्हड चा शिक्का मारुन घेणार). ऐन वेळेला हे लक्षात आल्यावर मला परत पॅन कार्डची छायाप्रत काढायसाठी बाहेर पळायला लागलं. आपल्याला हवा तेव्हा एक झेरॉक्सवाला सापडेल तर शपथ.

आमचेही कांदेपोहे – कि दारू चकणा ? एक सत्य अनुभव भाग १

लेखक हेमन्त वाघे यांनी सोमवार, 09/03/2015 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
इथे अनेकजण आपले “कांदे पोह्यांचे “ अनुभव सांगताना बघून मला हि २००३-२००४ सालाची आठवण झाली ..... मुली बघण्याचे काही अजब , काही विचित्र आणि काही ठीक अनुभव घेत होतो. कितीही शिकलो असलो तरी तिशीपर्यंत आल्याने स्वताची लग्न बाजारातली किंमत हि कळत होतीच. त्यात अजस्त्र देह आणि थोडी कमी उंची (५’९.५” ) आणि काळा वर्ण नसलेल्या सौंदर्यात भरच घालत होता !! माझे सर्व प्रकारचे कार्यक्रम चालू होते – म्हणजे मुली घरी येणे / जाणे . “सर्वांनी “ बाहेर भेटणे आणि मला सर्वात आवडायचे ते म्हणजे बाहेर फक्त दोघानीच भेटणे त्यात येक मेकाला समझता तरी येते.

जडण-घडण 20

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 05/03/2015 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
बघण्या-दाखवण्याचे कार्यक्रम उत्साहात सुरू होते. या बाबतीत माझ्या आई-बाबांच्या बरोबरीने इतर नातेवाईकांचा उत्साह बघून मला मौज वाटत होती. मी या बाबतीत तटस्थ राहायचं ठरवलं होतं, त्यामुळे नव्या कामाकडे लक्ष केंद्रित करता येत होतं. नव्या माध्यमात मी रूळू लागले होते. आमच्या संचालक बंगाली बाई, भरपूर उत्साही आणि प्रयोगशील. सतत नाविन्याच्या शोधात. त्यांचं मराठी बोलणं, हा आणखी एक गमतीचा भाग. त्यांच्या बोलण्यात केवळ नपुंसक लिंगाच्या अनुषंगाने उल्लेख यायचे. ते कामत, ते कागद, ते पंखा, ते टिव्ही, ते मधुरा आणि ते स्टोरी. असं बरंच काही.

वजन कमी करणारा आहार

लेखक बाबा पाटील यांनी बुधवार, 04/03/2015 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
वजन कमी करणारा आहार १) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे. २) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका, १ चहाचा चमचा, साजुक तुप, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी. ३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके, १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन),१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको,काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते भात बंद करावा. ४) संध्याकाळ नाश्ताः४ वाजता १ कप चहा /कोफी /दुध (साय काडुन) कमी साखर (शुगर फ्री

“माझी जडण घडण”

लेखक सुचिकांत यांनी सोमवार, 02/03/2015 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझे वडील इतिहास आणि गणिताचे शिक्षक आहेत. पण इंग्रजी व्याकरणावर सुद्धा त्यांची चांगली पकड आहे. मी शाळेत असताना त्यांनी माझ्याकडून active voice - passive voice, affirmative, negative हे सगळे प्रकार पक्के करून घेतले होते, आणि त्यांनी शिकवलेल्या इंग्रजीचा मला आयुष्यभर फायदा झाला. अभियांत्रिकी डिप्लोमा झाल्यावर, माझ्याकडे नोकरी नव्हती. घरात किती दिवस बसून काढणार? काहीतरी करायला हवं म्हणून हात पाय मारायला सुरुवात केली. मोजून १७ ठिकाणी कॉलसेंटरच्या मुलाखती दिल्या. प्रत्येक ठिकाणी शेवटच्या HR मुलाखती पर्यंत गेलो, आणि HR ने हे सांगून मला नकार दिला कि, तुमच्या इंग्रजी भाषेवर मातृभाषेचा प्रभाव आहे.