Skip to main content

समाज

आपल्याला माहिती नसलेल्या पण उपयोगी माहिती!

लेखक दशानन यांनी गुरुवार, 10/08/2017 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
1. 108 क्रमांक दाबून तुम्ही रुग्णवाहिका मागवू शकता व ही रुग्णवाहिका तुम्हाला कुठले ही शुल्क न देता सेवा देते. 2. टोल भरलेल्या पावतीवर हेल्पलाईन क्रमांक असतो, त्यावर तुम्ही त्या त्या टोल झोन मध्ये रस्तावर दगड असो, अपघात असो, किंवा तुमचे टोल रक्कम भरलेले वाहन बंद पडले असेल तर त्यासाठी लागणारी क्रेन वा इतर सुविधा तुम्हाला मुफ्त उपलब्ध असतात. इत्यादी... अश्या अनेक गोष्टी असतात, पण आपल्याला याची माहिती नसल्याने आपली आर्थिक फसवणूक होते, तेव्हा अश्या अनेक सेवा, गोष्टी असतील ज्या अनेकांना माहिती नाहीत पण तुम्हाला माहिती आहे.. तर कृपया येथे लिहा जेणे करून त्याचा अनेकांना उपयोग होईल.

टेस्ला वि. कार डीलर्स: एक डिस्रप्शन व त्याला होत असलेला विरोध

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 08/05/2017 05:09 या दिवशी प्रकाशित केले.
टेस्ला च्या कार विकण्यासंबंधी एक लेख नुकताच वाचला. मी पूर्वी टाटा मोटर्स (तेव्हाची "टेल्को") मधे काही वर्षे काम केलेले असल्याने एकूणच ऑटो इण्डस्ट्री तील बातम्यांबद्दल अजूनही कायम कुतूहल असते. तेव्हा मी टेल्को च्या सॉफ्टवेअर डिव्हिजन मधे सप्लाय चेन एरिया मधे - वाहने बनवायला लागणारा माल सप्लायर्स कडून कंपनीत येण्याबद्दलची प्रक्रिया- काम करत होतो. पुण्यातील प्लॅण्ट्स मधे उत्पादनावर जास्त फोकस होता. त्यात त्या "सेल" शी संबंधित गोष्टी कामात थेट येत नव्ह्त्या त्यामुळे त्याबद्दल माहिती नव्हती.

आय पी एल - दशकपूर्ती

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 06/04/2017 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सालाबादप्रमाणे यावर्षीही आमचे येथे श्री बीसीसीआय कृपेकरून दि. ५ एप्रिल ते २१ मे या काळात आयपीएल सारखी, क्रिकेट या खेळाचा सर्वांगीन विकास करणारी स्पर्धा भरवण्यात येत आहे, तरी प्रेक्षकांनी दर्शनाचा लाभ जरूर घ्यावा ही नम्र विनंती !! =)) अनेक संकटांवर मात करत आणि लोकप्रियतेचे नवे कळस गाठत(हं, आता काही लोकं याला नाकं मुरडतीलही ;)) या स्पर्धेने म्हणता म्हणता दहा वर्ष पूर्ण केली. दस्तुरखुद्द सचिन तेंडूलकरांनाही आयपीएल दहा वर्षांचा पल्ला गाठेल असं वाटलं नव्हतं. त्याचं कारण बरीच रामायणं-महाभारतं या दहा वर्षांच्या काळात या स्पर्धेमुळे घडली असं म्हणता येईल.

एक मरा'ठी', लाख मरा'ठी'

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 18/10/2016 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
मोर्चाला उदंड प्रतिसाद! खरंच गंमत वाटते या सगळ्या लोकांची. केवढा जमाव, केवढी बांधाबांध, घोषणा, सोशल मिडियावर संदेश... सॉलिड सगळं. पण नक्की कशासाठी आहे हे? असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला केला तर कदाचित उत्तर चटकन मिळणार नाही. कारण तसा विचारच केलेला नसेल. आणि तेच हवं असतं मोर्च्याच्या मागे असणार्‍या मंडळींना. पण आश्चर्य वाटतं की कुणाचाच विचार व्यापक कसा होत नाही? पदोपदी आपल्याला मॅनिप्युलेट केलं जातंय तरी कळूच नये ही गोष्ट? म्हणजे मोजके लोक हजारो लोकांना एका अशा गोष्टीसाठी एकत्र आणू शकतायत, जी गोष्ट मिळेल, न मिळेल, तिचा आपल्याला नेमका काय फायदा होईल याची काडीमात्र कल्पना त्या लोकांना नाही.

ई-उपवास

लेखक रघुनाथ.केरकर यांनी बुधवार, 17/08/2016 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
आपण बर्‍याच प्रकारचे उपवास करतो, कुणी अमुक एक महिन्यात मांसाहार टाळतो, कुणी चपला वापरायचे टाळतो, कुणी एकवेळ जेवतो, कुणी आपल्या मागण्यांसाठी अन्न पाणी त्याग करतो. वैगरे वैगरे, मी सुद्धा दर शनीवारी न चुकता उपवास करायचो. मग पुढे शनीवारी लांबचे प्रवास घडायला लागले तेंव्हा मात्र शनीवारी उपवास करायचे सोडुन दीले. पण शनीवारचा मांसाहार करीत नाही.पण हे झाले ठरवुन केलेले उपवास. कधी कधी न ठरवता देखील उपवास घडतो.मागच्या आठवड्यात असाच उपवास मला घडला.

भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 06/06/2016 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी. पुढचा लेख वाचला नाहीत तरी ही चार वाक्य कृपया वाचा.

मिपा संस्कृती साठी ही चांगली गोष्ट आहे का?

लेखक नीलमोहर यांनी सोमवार, 18/01/2016 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
धागापेरणी आपलं ते प्रेरणा: __/\__ लोकांनी आपल्या (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे काढण्याची (काय गरज आहे) ? लोकांनी आपल्या (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे काढावेत/काढू नयेत या विषयावर सर्वत्र खूप चर्चा केली जाते. सार्वजनिक संस्थळ संस्कृती मध्ये धाग्याला निव्वळ टाईमपास लेखनाचा दर्जा न देता सकस अभिव्यक्तीचा दर्जा दिला जातो. तर काही संस्थळ संस्कृती मध्ये धाग्याला फक्त टाकावू लेखनाचा दर्जा दिला जातो. सुजाण लोकांत सुविचारी लिखाणाचे प्रदर्शन केले जाते तर अजाण लोकांत ते सर्वज्ञपणाच्या बुरख्यात झाकले जाते. जर धागालेखन म्हणजे फक्त (अ)ज्ञान दाखवणे नसेल तर (अ)ज्ञानाचे प्रदर्शन करणे किंवा झाकणे कशासाठी? धाग्याला गुणवत्तापूर्णच राहिले पाहिजे. ही कसली मानसिकता आहे जेव्हा लोकांकडून कसदार लेखनाची अपेक्षा केली जाते तेव्हा (अ)विचाराने भारलेले लोक म्हणू लागतात हे आमच्या (अ)विचार स्वातंत्र्यावर गदा आणणे आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण, एखाद्या सुविचारी परिवारातील व्यक्तीला सांगितले तुला जसे लिहायचे ते लिही तुला कोणी काही म्हणणार नाही, तर तो (अ)विचाराचे प्रदर्शन होईल असे धागे नक्कीच लिहीणार नाही. कारण त्याच्या डोक्यात स्वतंत्रता म्हणजे (अ)ज्ञानाचे प्रदर्शन करणे हा विचार रूजलेला नसेल. आपणच हा विचार आपल्या लेखनातून लिहिणाऱ्याच्या मनात रूजवतो. (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे टाकणे म्हणजे स्वतंत्रता. संस्थळावर धाग्याचा विकास होण्यासाठी लेखनाला सकस, सक्षम, व समर्थ व्हावेच लागेल. कारण उच्च प्रतीचे लेखन हाच सार्वजनिक संस्थळ जगताचा आधार आहे, जर त्याचेच पतन झाले तर सार्वजनिक संस्थळ जगताची अधोगती होण्यास वेळ लागणार नाही.

गीत गाता चल (पण नक्की का..?)

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 28/12/2015 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय सिनेमाची पायाभरणी झाली, तेव्हापासून आजतागायत गाणी हा प्रत्येक चित्रपटाचा अविभाज्य भाग होऊन राहिलेला आहे. इतकेच नव्हे तर चित्रपटांची अख्खी बांधणी ही गाण्यांचे बिंदू पकडून अवतीभवती केली जाते. (इथे फक्त हिंदी सिनेमा नव्हे तर सर्वभाषिक भारतीय व्यावसायिक चित्रपट अभिप्रेत आहेत). हे भारतीय उपखंडाबाहेर कोणत्याच सिनेमा उद्योगात आढळत नाही. युरोपीय किंवा हॉलिवूड सिनेमात संगीताचा वापर केलेल्या चित्रपटाला 'म्युझिकल' असा वेगळा शब्द वापरतात. भारतीय सिनेमाला ही संकल्पना लागू होऊ शकत नाही. असे का, हे कोडे मला अनेक वर्षांपासून छळत आलेले आहे.

बाजीराव मस्तानी: आमचेही सेन्सॉर!

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 28/12/2015 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, 'बाजीराव मस्तानी' आम्ही आज थेटरमधे जाऊन पाहिला. काही ब्रह्मवृंद या चित्रपटावर खप्पामर्जी असल्याचे जगजाहीर झाल्यामुळे आम्ही हा सिनेमा मुद्दाम एखाद्या स्वघोषित सेन्सॉरबोर्ड मेंबरच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला. सिनेमाबद्दल काही ठळक मुद्दे मनात नमूद झाले ते लिहीत आहे. मुद्द्यांचे खास काही वर्गीकरण असे केलेले नाही. 1. सिनेमात बाजीराव, मस्तानी आणि काशी या तिन्ही मुख्य पात्रांना योग्य न्याय दिलेला आहे. किंबहुना काशी जबरदस्त भाव खाऊन जाते. तसेच बाजीरावाची आई, बंधू चिमाजी, छत्रपती शाहू यांचे चरित्रचित्रणही मजबूतपणे केलेले आहे.

डॉ. सदानंद मोरे यांची महाराष्ट्राची लोकयात्रा

लेखक माहितगार यांनी शनिवार, 26/12/2015 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. सदानंद श्रीधर मोरे (देहूकर) (जन्म : २५ जून, १९५२) यांची मराठी विकिपीडियावर सध्या नमुद ओळखीनुसार ते मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संत साहित्याचे (विशेषतः तुकारामांचे) ते अभ्यासक आहेत. २०१५ साली पंजाब मधील घुमान येथे २०१५ साली झालेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे साप्ताहीक सकाळमध्ये महाराष्ट्राची लोकयात्रा नावाचे सदर चालू आहे. ते मी अधून मधून वाचत असतो. बरीच माहिती मिळते.