मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा संस्कृती साठी ही चांगली गोष्ट आहे का?

नीलमोहर · · काथ्याकूट
धागापेरणी आपलं ते प्रेरणा: __/\__ लोकांनी आपल्या (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे काढण्याची (काय गरज आहे) ? लोकांनी आपल्या (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे काढावेत/काढू नयेत या विषयावर सर्वत्र खूप चर्चा केली जाते. सार्वजनिक संस्थळ संस्कृती मध्ये धाग्याला निव्वळ टाईमपास लेखनाचा दर्जा न देता सकस अभिव्यक्तीचा दर्जा दिला जातो. तर काही संस्थळ संस्कृती मध्ये धाग्याला फक्त टाकावू लेखनाचा दर्जा दिला जातो. सुजाण लोकांत सुविचारी लिखाणाचे प्रदर्शन केले जाते तर अजाण लोकांत ते सर्वज्ञपणाच्या बुरख्यात झाकले जाते. जर धागालेखन म्हणजे फक्त (अ)ज्ञान दाखवणे नसेल तर (अ)ज्ञानाचे प्रदर्शन करणे किंवा झाकणे कशासाठी? धाग्याला गुणवत्तापूर्णच राहिले पाहिजे. ही कसली मानसिकता आहे जेव्हा लोकांकडून कसदार लेखनाची अपेक्षा केली जाते तेव्हा (अ)विचाराने भारलेले लोक म्हणू लागतात हे आमच्या (अ)विचार स्वातंत्र्यावर गदा आणणे आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण, एखाद्या सुविचारी परिवारातील व्यक्तीला सांगितले तुला जसे लिहायचे ते लिही तुला कोणी काही म्हणणार नाही, तर तो (अ)विचाराचे प्रदर्शन होईल असे धागे नक्कीच लिहीणार नाही. कारण त्याच्या डोक्यात स्वतंत्रता म्हणजे (अ)ज्ञानाचे प्रदर्शन करणे हा विचार रूजलेला नसेल. आपणच हा विचार आपल्या लेखनातून लिहिणाऱ्याच्या मनात रूजवतो. (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे टाकणे म्हणजे स्वतंत्रता. संस्थळावर धाग्याचा विकास होण्यासाठी लेखनाला सकस, सक्षम, व समर्थ व्हावेच लागेल. कारण उच्च प्रतीचे लेखन हाच सार्वजनिक संस्थळ जगताचा आधार आहे, जर त्याचेच पतन झाले तर सार्वजनिक संस्थळ जगताची अधोगती होण्यास वेळ लागणार नाही. writer2 writer3 writer1 (सर्व चित्रे आंतर जालावरून साभार)

वाचने 3560 वाचनखूण प्रतिक्रिया 15

In reply to by हेमंत लाटकर

नीलमोहर Mon, 01/18/2016 - 14:44
पण फारच बुवा अपेक्षा तुमच्या, अहो तुमचाच लेख जेमतेम काही शब्द बदलून जसाच्या तसा इथे कॉपी पेस्ट केलाय, तेव्हा.. बोए बीज बबूल के तो आम कहाँसे होए. मूळ धागालेखकाएवढी हुशारी, ज्ञान, अनुभव, चिवटपणा, लेखनातील उंची, खोली, नावीन्य, सौंदर्य, गांभीर्य, कळकळ (तळमळ, मळमळ) इ. गोष्टी आमच्यासारख्या सामान्य बुध्दिच्या लोकांकडे असत्या तर काय होतं.

In reply to by नीलमोहर

तुषार काळभोर Wed, 01/20/2016 - 15:12
हुशारी, ज्ञान, अनुभव, चिवटपणा, लेखनातील उंची, खोली, नावीन्य, सौंदर्य, गांभीर्य, कळकळ (तळमळ, मळमळ) इ. गोष्टी क्या बात, क्या बात, क्या बात!!

मारवा Tue, 01/19/2016 - 23:24
तुमची स्वतःची संवेदनशीलता सौंदर्यदृष्टी यापेक्षा नक्कीच चांगली निर्मीती करु शकते हा विश्वास वाटतो. अगदी प्रामाणिकपणे मला मिपापेक्षा तुमच काय होणार हे असे धागे वाचुन जास्त काळजी वाटते. कृपया रागावु नका अगदी राहवल नाही म्हणुन बोललो. तुम्ही समर्थ आहातच.

In reply to by मारवा

नीलमोहर Wed, 01/20/2016 - 15:02
तुमच्या या प्रांजळ आणि मनमोकळ्या प्रतिसादासाठी मनापासून आभारी आहे, आजवर घरचे (बाहेरचेही) काळजी करत होते, आता इथेही कुणालातरी माझी काळजी वाटतेय पाहून खूप बरं वाटलं :) या धाग्याबद्दल म्हणायचं तर तो गांभीर्याने घेण्यासाठी नाहीच आहे. मूळ धाग्यात जे तारे तोडले होते त्याला उतारा म्हणून हे लिहीलं, लेख जमणार नाहीये हे लिहीतांनाच कळत होतं. मूळ लेखात तेच ते शब्द गोल फिरवून लिहीले आहेत, इथेही तसेच एकच वाक्य सारखे रिपीट करतांना डोकं गरगरायला लागलं होतं ;) असो, जसा धागा तसं विडंबन, फक्त चित्रंच टाकली असती तरी पुरेसं होतं पण तसं चालत नाही ना. काय होते की चांगल्या धाग्यांना वाचक मिळत नाहीत आणि या विडंबनाच्या मूळ लेखासारखे लेख २००-३०० प्रतिसाद मिळवून जातात, त्यामुळे असे लिहीणार्‍यांची हिंमत वाढते आणि ते अजून जोमाने असे प्रकार इथे टाकत राहतात, यांच्या धाग्यांवर कोणी फिरकलेच नाही तर ते आपसूक सुधारण्याची शक्यता तरी राहते. याआधीचं माझं 'काय होणार मिपाचे' हेही डूआयडी विरोधातील विडंबन होतं, असे धागे टाईमपास असले तरी निव्वळ फालतूपणा नसतो, त्यामागेही काहीतरी कारण असतं. वेगळं काही लिहायला गेलं की ते उगीच वादग्रस्त होऊन त्याला निगेटीव्ह टीआरपी मिळणे असे प्रकारही झाले, त्यात गेले काही महिने मिपावर जे काही चाललं होतं त्यामुळेही मन थोडं उडालं होतं, वेगळं काही लिहायची, करायची इच्छा होत नव्हती, म्हणून मग साधे सरळ लेख लिहीले ज्याला अर्थातच कमी प्रतिसाद मिळाले, पण ते परवडलं, डोक्याला रिकामा ताप होत नाही. संवेदनशीलतेचं म्हणाल तर ह्ल्लीच्या जगात ती जाते ... लावत, कोणी विचारत नाही तुमच्या संवेदनशीलतेला. तुम्ही लिहीता ते लोकांपर्यंत पोहोचलंही पाहिजे, समोरच्याला ते समजून घेता आलंही पाहिजे. तुमची तळमळ समजली आणि पोहोचली, इथून पुढे नक्कीच तक्रारीला वाव राहणार नाही असं पाहीन. http://www.misalpav.com/node/32325 वेगळं काहीतरी लिहायचा प्रयत्न केला होता, वाचलंही असेल तुम्ही. परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद..