Skip to main content

समाज

सॅन बर्नार्डिनोचे अतिरेकी दांपत्य

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 06/12/2015 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
सॅन बर्नार्डिनो हे लॉस अ‍ॅन्जेलिस ह्या महानगराच्या पूर्वेला असणारे एक शहर. इथे २ डिसेंबर रोजी एक अतिरेकी हल्ला झाला. त्यात १४ नागरिक बळी पडले आणि तितकेच जखमी झाले. हल्ला करणारे अतिरेकी म्हणजे पाकिस्तानी वंशाचे नवरा बायको. एक अत्यंत खळबळजनक, अनपेक्षित घटना असे ह्याचे वर्णन करता येईल. दहशतवादी हल्ल्याचा हा अमेरिकेत तरी आजवर न दिसलेला प्रकार आहे. आता हा भविष्यातील अशाच प्रकारच्या घटनांची नांदी आहे का एकमेवाद्वितीय घटना ते काळच सांगू शकेल. ह्यातील एक अतिरेकी सैयद फारुक हा पाकिस्तानी आईबापांचा अमेरिकेत जन्मलेला मुलगा. आईबापांचे वितुष्ट आले आणि ते विभक्त झाले.

संपूर्ण अमेरिकी सैन्यदल स्त्रियांना खुले

लेखक चलत मुसाफिर यांनी शुक्रवार, 04/12/2015 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकी सरकारने घोषणा केली आहे की पुढच्या वर्षापासून सैन्यदलाचे सर्व विभाग व पदे ही स्त्रियांसाठी खुली केली जातील. यावर मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. महिलांना सैनिक म्हणून भरती होण्यास प्रोत्साहन द्यावे का, याबद्दल भिन्न मतप्रवाह आहेत. भारतीय सैन्यात महिलांना काही मोजक्या विभागांत, तेही केवळ अधिकारी पदावर नियुक्त केले जाते. सेना वैद्यकीय सेवा, सेना परिचारिका सेवा आणि न्याय विभाग वगळता अन्य विभागात त्यांना लेफ्टनंट कर्नल या पदापर्यंतच बढती देण्यात येते आणि त्यानंतर निवृत्तीवेतनाशिवाय सेवामुक्त केले जाते. (हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे). वायुदलात महिलांना लढाऊ विमाने उडवण्याची परवानगी नाही.