Skip to main content

शृंगार

प्रेयसी

लेखक विवेकखोत यांनी बुधवार, 30/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
किती नाजूक ती लाजते लाजत माझ्या कडे बगते तुझ्या हसण्याने संजीवनी मिळते तुझ्या असण्याने शांतता मिळते माझे आयुष्य आता बदलले सुंदर तैलचित्र मनी जाहले किती तू अशी दूर राहणार किती ह्या काळजा जाळणार तुझा दुरावा आता सहन होत नाही जीवाची घालमेल आता बघवत नाही
काव्यरस

आसुया

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 29/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पानगळीची किमया; सारे विवस्त्र वक्ष तरूंचे हे नक्षत्रांची नक्षी जणु की निळ्या अंबरी मय भासे डौल लास्य कमनीय विशाखा चित्र रमलतम रेषांचे चित्रकार अवघ्या विश्वाचा थबकल्यापरी आभासे प्राण प्रियेचे विरही झुरले; सुकले तट का पानांचे ?- की कात टाकली नवजन्मास्तव उबवित अंकुर पंखांचे ? मज दिसतो रजशृंगार कळीचा मी भृंगासम अवतरतो समक्ष बघतो तृप्त नहाणे अंतर्यामी उलगडतो गुणगुणतो गाणे स्वप्नांचे नवी आवरणे पांघरतो सृजनकल्प आसुया जगण्याची वाटेवरती अंथरतो ........................अज्ञात
काव्यरस

युगलगीत: गार गार वारा अंगाला झोंबला

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 26/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीत: गार गार वारा अंगाला झोंबला
तो: गार गार वारा अंगाला झोंबला तुझी साथ हाय माझ्या उबार्‍याला ती: नका जावू पुढं थांबा की थोडं आसं शोभत नाय तुम्हाला तो: आगं तू येडी का खुळी काय बोलतीया अवेळी आगं काय म्हनू मी तुला? ती: काल रातीला एकटीच व्हते घरात नव्हतं कुनी तुमी यावं आसं वाटलं पन आला नाय तुमी आज आला तर थांबा थोडं गुलुगुलु बोलू गोड गोड गुलाबी थंडीचा मोसम ह्यो आला तो: आंगाश्शी..गार गार वारा अंगाला झोंबला तुझी साथ हाय माझ्या उबार्‍याला तो: देव देव कराया नवस बोलाया आईबाप गेलं तुझं पंढरीला तु अन मी मी अ
काव्यरस

मैत्री

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
खळखळणारे पाणी भिडे कातळाला सांगे गुज मनीचे त्या स्थितप्रज्ञाला तोही मग हलकेच घेई कवेत त्याला पाणीही मग सरसावे आलिंगनाला हळुवार बोलणे त्यांचे वाटे खळाळता झरा शुभ्र लाटाही मग उठाती त्यांच्या साथीला चाले संवाद त्यांचा क्षणोक्षणी, दर एक ऋतूत निसर्गही मग देई दाद त्यांच्या मैत्रीला
काव्यरस

आठव

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मन मोहरले आज फिरुनी तुझ्या सवे क्षण आठवती ते पहिल्या शहाऱ्याचे ते पाहणे तुझे स्तब्धपणे ... आठव आज येते सहज अनाहूतपणे
काव्यरस

मिठीत कळी उमलली

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मिठीत कळी उमलली
राया तुम्ही प्रेमाची फुलबाग केली तुमच्या मिठीत कळी उमलली वाट कितीक पाहीली थकलं डोळं आज उशीरा का येनं केलं? रुजूवात कराया मोहोर उठवा गाली तुमच्या मिठीत कळी उमलली सजवून माझी काया नखरा केला जवळ घेता तुम्ही गोड गुन्हा झाला नजरेचा तिर मारता अंगी वीज चमकली तुमच्या मिठीत कळी उमलली कमरपट्टा उगा मला का रुतू लागला? शालू अवजड झाला आज का अंगाला? चोळी ऐन्याची नको तिथं उसवली तुमच्या मिठीत कळी उमलली - पाषाणभेद १६/११/२०११
काव्यरस

ती वाट

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 08/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
ती वाट गोकुळातून कुंजवनाकडे जाणारी आजही ती त्याच वाटेवर प्रतीक्षा करतेय कदाचित, तिचा प्राणसखा कधीतरी अवतरेल कुंजवनातील राधिकेला भेटायला आलाच तर तिचेही भाग्य उजळेल . त्याच्या पाऊलखुणांचा वेध घेत धूळभरल्या वाटेवर अजूनही त्या स्पष्ट होत्या पण फक्त आत जाणार्‍या बाहेर येणार्‍या काहीश्या विरळ झालेल्या . त्या कुंजवनातील तो डेरेदार कदंब अजूनही, चमचमत आहे त्या चांद्रवैभवाने त्याच्या पानापानात ते मंतरल्या मुरलीचे भारलेले स्वर अजूनही दाटून आहेत तिला तो कदंब दिसतोय, पण देवकीनंदन, तो नाही तिथे..... . क्षणभर डोळ्यांसमोर रासक्रिडेत दंग गोपीका अन्, गोपीकांमध्ये उजळून दिसणारी ती अल्लड राधिका मधोमध उभा, मुरली
काव्यरस

तयार करा हिरवं पान

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 26/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
तयार करा हिरवं पान
दिवाळीचा फराळ खावून केलं जेवन काथ लावून तयार करा हिरवं पान ||धृ|| हिरव्या पानाच्या होsss हिरव्या पानाच्या शिरा हळूहळू खरडा देठ शेवटाला लागल तो पण खुडा तोंडानं म्हणा आपलं खुशीतलं गानं राया तुमी माजबी लावा की हो पान ||१|| पुढं ओढा जरा होsss पुढं ओढा डबा पानाचा तुम्हां जवळी त्यातच ठेवली पहा सुपारी चिकनी अडकित्यामधी फोडा तिला हाती धरून पानावर मग पसरा बारीक कतरून ||२|| प्रेमाचा गुलकंद लावा तुम्ही पानाला तयार झाल्यावर हातामधी द्या त्याला जवळी या आता खावून पान थांबून जा थोडं मन रिझवून ||३||
काव्यरस

मांगल्याचे औक्षण करूनी..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 25/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मेंदी भरले पाऊल घेऊन पहाट अवतरली.. अलगद नाजूक, धरतीवरती चाहूल थरथरली.. जागी झाली सृष्टी सारी ऐकून भूपाळी निळेजांभळे क्षितिज तेव्हा झाले सोनसळी क्षितिजावरती डोकावुनीया हळूच तो हसला आळसावल्या चराचराला सूरही गवसला लगबग झाली दहादिशांतुन तया पाहण्याला ओलेत्याने सज्ज जाहल्या जणू स्वागताला धरतीवरती शिंपण झाले सडा रांगोळ्यांचे मनी मानसी दीप उजळले नविन आशांचे काळोखाची संपून जाईल मुजोर बळजोरी आकांक्षांची किरणे येतील हसून सामोरी नविन आशा आकांक्षांनी भरु दे ही झोळी मांगल्याचे औक्षण करूनी हसेल दिवाळी.. - प्राजु
काव्यरस