रात्रीच्या आठवणीनी मन झाले धुन्द, दरवळतो अजुनही रोमारोमात निशिगन्ध,
स्पर्शाने तुझ्या फुलला अन्गात पारिजात, श्वासात मारवा अन नजरेत चान्दरात,
ओठानी खोलशी तू कितीएक अबोल बन्ध, चेतवी स्वप्नाचे दिवे, मनात मन्द मन्द,
घेतले कवेत तु, कोसळते बाहुपाशात मी,
ओल्या वणव्यात जळाया, पतन्गापरी आतुर मी,
पेचाडावपेचात रन्गत गेली रात्र, उमलत गेले हळूहळू एकएक गात्र,
वाटतेय चालु रहावे, असेच हे सत्र, उलगडेल ना मग, जीवनाचे ते सूत्र,
मुक्त होण्यासाठि सुद्धा हवेच असते ना एक बन्ध,
निश्शब्द, निस्तब्ध, निसन्दिग्ध, अनन्त अनन्त...