Skip to main content

सख्या मला सवे तुझ्या

लेखक मकरन्दबेहेरे यांनी शनिवार, 17/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
सख्या मला सवे तुझ्या कवेत रे फिरायचे नभात शुक्रचांदणे अजून ही दिसायचे कशास लाज लाजसी घडी घडीस साजणा मनात काय माझिया, कळेल का प्रिया तुला मिठीतले शहार हे धुक्यात रे जपायचे अजून "श्यामसावळ्या" कुशीत गुंतलास ना बटेत सोनकेवडा अजून माळलास ना नको व्रुथा करु उशीर मावळेल चांद रे तुझ्याच आज अंगणी हरीप्रिया खुणावते भरून टाक भांग ही हळूच कुंकवात रे उठेल आसमंत हा जपून कोर श्वास रे बेहेरे मकरंद ०१२०२१२०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1661
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

सुरेख.