चालू नको अशी तू
चालू नको अशी तू तोर्यात ग तोर्यात
केस उडतात भुरूभुरू वार्यात
केस तुझे मखमली आले गाली
ओठांवर तिळ शोभे गाली खळी
नको तिरक्या नजरेनं पाहू
मीच दिसे तुझ्या डोळ्यात
खट्याळ वारा तुझा उडवी पदर
उगाच माझी त्यावर गेली नजर
पाहून तुझं रूप झाली हुरहुर
सावरून घे पदराला हातात
सांग तू असा का करते नखरा
बघून तुला मी मारतो चकरा
जीवाला लावून नको जावू घोर
कसं सांगू मी तूला प्रेमात
- पाभे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1439
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
सुंदर
नको तिरक्या नजरेनं पाहू मीच
नको तिरक्या नजरेनं पाहू
मीच दिसे तुझ्या डोळ्यात ..
वा! असा आत्मविश्वास हवा .
छान आहे कविता .
वाह... हे गीत आठवले
वाह... :)
हे गीत आठवले राव...
गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुले लाली गुलाबाची... ;)
व्वा..! पा.भे. नेहमीप्रमाणे
व्वा..! पा.भे. नेहमीप्रमाणे झकास..! :-) लाइक इट..!लाइक इट...!