विधिलेशा
लेखनविषय:
काव्यरस
जळली तृणके गिरी बोडके
वणवा बिन बोभाटा
कशाच उरल्या तशाच अजुनी
पायखुणांच्या वाटा
काजळ तनभर माळशिरावर
त्यात विखुरलेल्या लाटा
पोत धुळीचे अधिक उजळले
शेष न एकहि काटा
या वळणावर उभा एक मी
निरखित लामण रेषा
काळावरती उठून दिसल्या
विरलेल्या विधिलेशा
.......................अज्ञात
व्वा व्वा अज्ञातजी
फारच छान सुंदर
या वळणावर उभा एक मी
निरखित लामण रेषा
काळावरती उठून दिसल्या
विरलेल्या विधिलेशा
अप्रतिम
विं.दा करंदिकर आठवले , खुप
विं.दा करंदिकर आठवले , खुप सुंदर लिहीले आहे.....
नेहमी प्रमाणेच उत्तम कविता.
नेहमी प्रमाणेच उत्तम कविता. खूप आवडली.
येथे कवी, या वळणावर ; गत जीवनाकडे मागे वळून बघतो आहे की पुढे असलेल्या , असा प्रश्न पडला.
सर्वांचे आभार आणि नवीन
सर्वांचे आभार आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा :-)