Skip to main content

शृंगार

मन-झोपाळा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 07/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
ओघळ पिकल्या पानांचे; सुकले देठ जरी अंकूर अजूनहि ओले; खोडात चिमुकले; गाभारी वारा,.. झाडून नेतसे हिरमुसलेले; गत वय माघारी झुळुकेत चिन्मयी कल्प उमलवे; नवजीवन दरबारी अंकीत कळ्या विलसती कोवळ्या वर्मावर अवतारी गंधाने भारी नवपर्णांकित शुभ्र परांची वारी किलबिल अवघी चौफेर; पिले पक्षिणी परतली माहेरी किमया ही ऋतु-तारुण्यबहर-रत प्रणयआभेची सारी यातना वेदना गळलेल्या; नत पायतळाशी; गोळा पाहून रम्य मय वसंत-शोभा; तृप्त ऋणांकित डोळा मजला ही भेटे अशी मनोरम रत्नजडित मधुशाळा अवकाशाचा अन झुले अंबरी मदनमस्त मन-झोपाळा ................................अज्ञात
काव्यरस

स्वप्नांस शाप आहे............!

लेखक सांजसंध्या यांनी बुधवार, 07/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीस छंद आहे, स्वप्नांत राहण्याचा स्वप्नांस शाप आहे, रात्रीस जागण्याचा गेल्या कितीक रात्री, उलटून चांदण्यांच्या झाला सराव आता, अंधार साहण्याचा या सागरास वाटे, आधार चंद्रमेचा चंद्रास धाक आहे, अवसेस भागण्याचा नजरेतले इशारे, ना जाणले तुझ्या मी आहे खडा पहारा, डोळ्यांस पापण्यांचा गंधाळल्या मिठीचा, हा श्वास खास आहे श्वासांस भास आहे, आवेग थांबण्याचा देहात आग आहे, विझवू कशी कुठे ही पाण्यावरीच आहे, आरोप जाळण्याचा लाचार सांज संध्या, धावा करू कुणाचा कृष्णास बंध नाही, हाकेस धांवण्याचा संध्या
काव्यरस

निःशब्द

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी मंगळवार, 28/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे म्हणावे तुझेच केवळ असे काही एक माझे निव्वळ कुणी म्हणाले तिथेच बनती जुळती तुटती रेशीमगाठी मी न पाहिले हात तयाचे तुझ्या किनारी सापडले घर आयुष्याच्या अंक पटावर दिले घेतले हिशेब झाले समर्पणाच्या वाटेवरचे आज पडावे पहिले पाउल उलगडताना ह्रदयाची धून सूर कापरा कातर कातर शब्दांची वीण उसवीत जाती शब्दांवाचून डोळ्यांचे तळ तुझे म्हणावे तुझेच केवळ असे काही एक माझे निव्वळ
काव्यरस

रात्ररात्रभराची ही जागरणं

लेखक Gajanan Mule यांनी शुक्रवार, 24/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
रात्ररात्रभराची ही जागरणं नि प्रत्येक घटकेला येणारी तुझी सय अस्वस्थ मनाचं उनाड वागणं ... स्वतःलाच पुन्हा पुन्हा काहीतरी मागणं... चालता चालता एकटं नसल्याची जाणीव ... आणि आजूबाजूला भेडसावणारी तुझी उणीव ... चांदण्यांनी माझ्या नकळत हिरावून घेतलेली माझी झोप ... आणि माझ्या अंगणातलं तुझ्या कवितेचंरोप ... घेऊन जा ... खूप वाढलंय आणि दिवसेंदिवस अधिकाधिक वाढतंच चाललय हे ... रात्ररात्रभराची ही जागरणं .. नि प्रत्येक घटकेला येणारी तुझी सय . - गजानन मुळे
काव्यरस

वॅलेंटाईन डे

लेखक रघु सावंत यांनी रविवार, 19/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
वॅलेंटाईन डे खरं म्हणजे तूला सांगायची गरज नाही तुलाही माझ्या प्रमाणे ठाऊकच असणार कारण आजचा दिवसच असा आहे माझ्य मनात तूझ्या आठवणींचा ठसा आहे मला आठवते आपली ती पहिली भेट तेव्हाच माझ्या ह्र्द्याचा ठाव घेतलास थेट या सगळ्या आठवणी आज आठवतात खास कारण आजचा दिवसच असा आहे माझ्या मनात तूझ्या आठवणींचा ठसा आहे तुझी माझ्या करिता उठलेली प्रत्येक नजर माझ्या करिता एक वेगळी अदा आहे म्हणुन तर मी तूझ्यावर फिदा आहे या देहाचा रोम रोम तूझी वाट बघतोय आज कारण आजचा दिवसच असा आहे माझ्या मनात तूझ्या आठवणींचा ठसा आहे तुझं नेहमी स्वप्नात माझ्या येणं येऊन मला मोहून शहारून सोडणं मला तर ते आज पण हवं आहे कारण
काव्यरस

प्रेरीत

लेखक अज्ञातकुल यांनी शनिवार, 18/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशीचे मन कोरे निरभ्र होते चांदणे सुखावत होते रज कैफाने झाडाआडुन मी होतो वेधत खेळ ऐहिकाचा पाऊल टाकले क्षितिजावर चंद्राने ती भोर सावळ्या चतुर्दशीची होती डौलात ठाकली कोर; पोर सगुणा जणु होती पाहून ऐट चुकले ठोके हृदयाचे एव्हाना ती आरूढ काळजावरती झाली होती आभास नव्हे; हा श्वास खास जगण्याचा ही साद अशी की अंतर्नाद सणाचा अचरासह चर ऐशा किमयेचा शेला मी साक्ष एक; प्रेरीत नित्य; ह्या नव्या युगाचा ........................अज्ञात
काव्यरस

एकांग

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 08/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुझा; तुझ्याविण फास पारधी; हरलो तुज छबी मागुती वलय गणत उलगडलो तू मुक्त लोळ तडितेचा; मी वृक्ष जखडला मातीचा पसरून विशाखा ओंजळ होउन फुललो पाताळ शोधिले पाहिले न कधि मागे हृदयातिल स्पंदन अंकुर अजुनी जागे भ्रमणात; भ्रमाच्या छायेपाठी फिरलो नवक्षितिजावर मेघांकित दिनकर झालो पाहून पालखी पलकांची; मी फसलो बोलक्या स्मिताच्या लहरींवरती झुललो क्षण कांही पण अंतरास स्पर्शुन गेले एकांग रणी काजळात अंती विरलो ...........................अज्ञात
काव्यरस

विदेश .....!! [थोडा टाईम पास ]

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 26/01/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मी विदेशात होतो किती मस्त मजेने जगलो कैफात असा होतो हे जग विसरुनी मी गेलो मज आठवण येता तिथली जीव कासावीस होतो माझा आठवूनी गुलाबी थंडी हुडहुडी भरे अंगाला त्या विदेशातील घरे कशी मस्त लाकडी होती काचेच्या खिडकी मधुनी आभाळ उतरुनिया येई ह्या देशामधली गर्दी नि गोंगाट कसा भरलेला..? ह्या गाड्या मधली गर्दी मी घामाने ओला ओला नव्हता देव्हारा तेथे मी उघडला छोटा बार संध्याकाळी बसता मी विसरुनी जातो पार मी विदेशात होतो किती मस्त मजेने जगलो............!!
काव्यरस

शरपंजरी

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 25/01/2012 या दिवशी प्रकाशित केले.
ओढाळ स्मिताची रेष रेशमी फुलली रचना हुरहुरली; काहुर गुंता; दृष्ट जाहली ओली रज्जूंस पावली ऊर्जा मेघांमधली दाटून श्वासभर अक्षत अंकित झाली हे दूर-देखणे स्वर होते यक्षांचे पारणे लाभले; फिटले; ज्वर अक्षांचे राहिल्या मागुती गंधखुणा झुळुकेच्या पापणीबंद सार्‍याच छ्टा प्रतिमेच्या मग वाट पहाणे आठवणे गत उरले नुरले भवताल; लयींवर; भुलले अंबर-झूले एकांत झुरे भेटीसाठी लक्षण हे नच भवभोळे पंजरी शरांच्या; भीष्म; स्मृती हळवेले .........................अज्ञात
काव्यरस