मन-झोपाळा
ओघळ पिकल्या पानांचे; सुकले देठ जरी
अंकूर अजूनहि ओले; खोडात चिमुकले; गाभारी
वारा,.. झाडून नेतसे हिरमुसलेले; गत वय माघारी
झुळुकेत चिन्मयी कल्प उमलवे; नवजीवन दरबारी
अंकीत कळ्या विलसती कोवळ्या वर्मावर अवतारी
गंधाने भारी नवपर्णांकित शुभ्र परांची वारी
किलबिल अवघी चौफेर; पिले पक्षिणी परतली माहेरी
किमया ही ऋतु-तारुण्यबहर-रत प्रणयआभेची सारी
यातना वेदना गळलेल्या; नत पायतळाशी; गोळा
पाहून रम्य मय वसंत-शोभा; तृप्त ऋणांकित डोळा
मजला ही भेटे अशी मनोरम रत्नजडित मधुशाळा
अवकाशाचा अन झुले अंबरी मदनमस्त मन-झोपाळा
................................अज्ञात
वर्गीकरण
अज्ञातजी नेहमीप्रमाणेच
आभार :-)
आवडली कविता.
कविता आवडली