Skip to main content

निसर्ग

पंचमीतले रंग सांडले........

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 30/03/2022 या दिवशी प्रकाशित केले.
पंचमीतले रंग सांडले झाडांनी ते बघा झेलले डोक्यावरती तुरे गुलाबी धुंद होऊनी फाग नाचले लुसलुशीत ही कवळी पाने मोहरून गेली सर्वच राने आंबोळ्या निंबोळ्या सवे खेळती ओढून नुतन वस्त्रे गर्द पोपटी कोण चितारी चित्र काढतो रंगांची रागदारी मांडतो कोकीळ मंजुळ कुजन करते मन मुदित हिंदोळ्यावर झुलते कसरत २९-३-२०२२
काव्यरस

शब्दचित्र

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 17/02/2022 या दिवशी प्रकाशित केले.
संपले का रंग सारे का कुंचले मोडले दोन रंगात सारे विश्व का रे रेखले नीळा सावळया निर्झराचा रंग कोठे लपवीला काय ठावे तुझ्या मानसी शुभ्र धवल का रे भावला अंथरुन कालीन धवल लपवले रंग सारे उजळून विश्व सारे दीप तेज मंदावले नील गगन ,धवल तारे वाहती उष्ण वारे शोषून धवल रंग हळूच फुटती धुमारे येता ऋतुराज यौवनाचा उघडेल मूठ त्याची आशा हीच उद्याची उधळून रंग सारे उमटतील चित्रं नव पल्लवांची

सकाळ कोवळी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 17/10/2021 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ कोवळी रात्रीनंतर हासत येई हिरव्या गवताचा गर्द गंध घेवून येई धुक्यातून दव फुलले उतरे अलगद पानांवर शिखरावर झाडांच्या उन्ह सोनेरी हळूच येई झुळू़क हवेची थंडगार वाहते चुकार अल्लड सरत्या पावसाची सर ठिबठिबणारी सोबत येई रान फुलले रानफुलांचे रंग लेवून ताजे सुंदर वार्‍यावरती हालती डूलती नजरेला सुखवीत जाई फुलपाखरांसवे पक्षी उडती वरती आरव करती खोल दरीतून दूर कुणीतरी आल्हादक गीत गाई - पाषाणभेद १७/१०/२०२१
काव्यरस

पंचतत्व

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 24/09/2021 या दिवशी प्रकाशित केले.
पंचतत्व अनंत आकाश पाहता मन माझे मोठे झाले तेच आकाश मनात कोंबले क्षणात सुक्ष्म अ‍ती लघू झाले ||१|| विस्तीर्ण जलाशय तो सागर त्यापुढती मी यकश्चित केवळ नाव घडवली फळकुट घेवून लिलया पार कराया मिळे बळ ||२|| डोंगरांचे पर्वत जाहले लंघून जाण्या उर धपापले विमानात मात्र बसता गिरिशिखर भव्य भासले ||३|| संकटांची धग आली पेटून शत्रूसमान खिंडीत गाठून वारामागून वार करून पराजीत केले त्यांना जिंकून ||४|| मार्ग समोरील नवीन अवघड चरण थकले चालून चालून उत्साहाचा झरा न थकला ध्येय समोर आले चालून ||५|| - पाभे २४/०९/२०२१

खिडकी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 19/03/2021 या दिवशी प्रकाशित केले.
क्षितिजावरचा निळसर पर्वत कातळमाथा ढगात घुसळत भूशास्त्राला कोडी घालत खोल ठेऊनी लाव्हा धुमसत पुरातनाचे सूक्त गुणगुणत नभरेषेवर उंच उसळुनी दिसे अनाहूत माझ्या खिडकीत निळे पाखरू पहाटफुटणीत पंखभिजवत्या दवास झटकत चोच मुलायम पिसात फिरवीत पंखांतील अचपळ बळ जोखीत साद घालुनी अधीर, अवचित नभांगणाला उभे छेदुनी उतरे अलगद माझ्या खिडकीत आखीव रेखीव खिडकी चौकट निळ्या नभाचा कापुनी आयत इंद्रजाल निळसर पसरवुनी जड चेतन द्वैताला मिटवीत

पुनवेचं चांदणं

लेखक चांदणशेला यांनी बुधवार, 10/02/2021 या दिवशी प्रकाशित केले.
पुनवेचं चांदणं उतरलं अंगणी अंधार गेला शुभ्र रंगात न्हाऊनी हरवून गेलं झाडांचं हिरवं रूप पाखरांच्या डोळ्यात भरली झोप गगनाच्या भूमीत तारे पेरले रातराणीचे हृदय हळूच फुलले वाऱ्याचे पाऊल देई चाहूल उजळले रानात काजव्याचे फूल नभात साऱ्या मोहरला चंद्रप्रकाश धरती सजली काळोखाचे तोडून पाश
काव्यरस

युग प्रवाहीणी

लेखक Pradip kale यांनी गुरुवार, 23/07/2020 या दिवशी प्रकाशित केले.
युग प्रवाहीणी -+-*-+- समोर दिसत असलेलं भग्न राऊळ पाहताना जाणवतंय, या तुझ्या काठावर कधीकाळी वसलं असेल एखादं छोटंसं गाव अथवा एखादा शांत, एकांत आश्रम... विसावला असेल इथे, अविरत काळप्रवाहात प्रवास करणारा मानव समुह वा या अनंत प्रवासातुन मुक्तिकडे निघालेला कुणी तपस्वी तुझ्या या निळ्याशार अमृताने शिंपली असतील कुणी आपुली स्वप्ने सुर्योदयाला वाहिली असतील तुझ्या थंडगार उदकाची अर्घ्ये ऐकल्या असतील पहाटेच्या निरव शांततेत एखाद्या जनीच्या ओव्या, मंदिरातील वेदघोष किंवा कातरवेळी कुण्या बैराग्याने छेडलेली भैरवी स्मरणात असे

आमंत्रण

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 14/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
ओथंबल्या आभाळाला स्वप्न हिरवं पडलं त्याच्या दिठीत मावेना तेव्हा धरतीला दिलं वीज झेलण्या झुरतो माथा बेलाग कड्याचा कुरणांच्या पटावर आज डाव पावसाचा रिमझिमत्या ढगाच्या पैंजणांची रुणझुण सृजनाच्या सोहळ्याचे ओलेचिंब आमंत्रण
काव्यरस

चक्र

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 27/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.
झुंजूमुंजू आभाळात किती सांडले केशर सोनसळत्या सकाळी निळे झळाळे अंबर तळपत्या माध्यान्हीची वितळती काचधार धूसरशा संध्याकाळी अदृष्टाची हुरहूर नि:शब्दाच्या चाहुलीने जागे रात्र काळीशार प्रहरांच्या रंगी रंगे बिलोरी हे कालचक्र चक्रनेमिक्रम त्याचा अनादि नी निरंतर
काव्यरस

हो मनुजा उदार तू ..

लेखक मनोज यांनी शुक्रवार, 01/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गाने सूक्ष्म हे दैत्य असे सोडले अहंकारी माणसा गर्व सारे तोडले धूर हा हवेत रोज नदीत जहर सांडले प्रतिशोध हा असेल तुला घरात कोंडले उपसलेस बहुत तेल गिरी अनेक फोडले सजेल ही धरा पुन्हा तव हस्तक्षेप खोडले विकास नाव देऊनी वृक्ष अमाप छाटले दुःख ते अपार किती वसुंधरेस वाटले ? मोडलेस घर त्यांचे नांगर थेट फिरवले झुंजलेत पशु त्यांना हिंसक तूच ठरविले शिक आता दिला धडा जरा तरी सुधार तू देई स्वार्थ सोडुनी हो मनुजा उदार तू
Taxonomy upgrade extras