मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुनवेचं चांदणं

चांदणशेला · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
पुनवेचं चांदणं उतरलं अंगणी अंधार गेला शुभ्र रंगात न्हाऊनी हरवून गेलं झाडांचं हिरवं रूप पाखरांच्या डोळ्यात भरली झोप गगनाच्या भूमीत तारे पेरले रातराणीचे हृदय हळूच फुलले वाऱ्याचे पाऊल देई चाहूल उजळले रानात काजव्याचे फूल नभात साऱ्या मोहरला चंद्रप्रकाश धरती सजली काळोखाचे तोडून पाश

वाचने 2238 वाचनखूण प्रतिक्रिया 3

गणेशा Sun, 04/11/2021 - 10:15
वाह.. रातराणीचे हृदय हळूच फुलले वाऱ्याचे पाऊल देई चाहूल उजळले रानात काजव्याचे फूल नभात साऱ्या मोहरला चंद्रप्रकाश