मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सकाळ कोवळी

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
सकाळ कोवळी रात्रीनंतर हासत येई हिरव्या गवताचा गर्द गंध घेवून येई धुक्यातून दव फुलले उतरे अलगद पानांवर शिखरावर झाडांच्या उन्ह सोनेरी हळूच येई झुळू़क हवेची थंडगार वाहते चुकार अल्लड सरत्या पावसाची सर ठिबठिबणारी सोबत येई रान फुलले रानफुलांचे रंग लेवून ताजे सुंदर वार्‍यावरती हालती डूलती नजरेला सुखवीत जाई फुलपाखरांसवे पक्षी उडती वरती आरव करती खोल दरीतून दूर कुणीतरी आल्हादक गीत गाई - पाषाणभेद १७/१०/२०२१

वाचने 2871 वाचनखूण प्रतिक्रिया 6

चौथा कोनाडा Sun, 10/17/2021 - 12:51
व्वा, छानच ! वर्णनात्मक निसर्ग कविता आवडली !
झुळू़क हवेची थंडगार वाहते चुकार अल्लड सरत्या पावसाची सर ठिबठिबणारी सोबत येई
हे मस्तच ! + १