लेखकपाषाणभेदयांनी रविवार, 23/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नकोस माझी आठवण काढू
नकोस माझी आठवण काढू
नकोस मजला मोही पाडू
भोगले क्षण ते ओले
नकोच त्यांना आता कुरवाळू ||
ओठांवरी ओठ घट्ट मिटी ते
शब्दही त्यातून नच फुटी ते
कढ दु:खाचे बाहेर काढण्या
हुंदकाही नकोच सांडू ||
उष्ण उमाळा अंतरी गाभ्यात
लाव्ह्यापरी जाळे तो मनास
काय राहीली शेवटली बाकी
गणितही त्याचे नकोच करू ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०५/२०१०
लेखकनिरन्जन वहालेकरयांनी बुधवार, 19/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिक्षा ? ? ?
निद्रेच्या अधिनस्तहि उगडेच असतात नेत्र,
परतीच्या प्रतिक्षेत तुझ्या.
न जाणो मिटले ते अन…..
अवतरली तू अवचित…….. .? ? ? ?
आजही स्मरतात ते दिवस .......
धुंद ! धुंद ! !
पुनवेच्या चांदण्यांत,
मोकळ्या केशसंभारांत,
निरागस उभी तू.
मला वाटले,
चंद्रमाच झाला लुप्त धरणीवर,
काळ्या मेघाआड.
पुन्हा बहरला तोच वसंत,
तारकांची धुंद बरसात,
आसमंती तोच मंद वारा,
? ? ? ?
लेखकक्रान्तियांनी मंगळवार, 18/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा
{जगातल्या सगळ्या आया आणि त्यांच्या लेकरांची माफी मागून}
अलिकडे निंबोणीचे झाड राहिलेच नाही
चंद्र वेडा मोबाइलच्या टॉवरमागे झोपी जाई!
गाय पदपथावर, चिमणीला घरटे नाही
परस ना वेली, कुठे झोपतील जाई-जुई?
शाकीरा, मॅडोना, जॅक्सन यांनी गिळली अंगाई!
देवकी, यशोदा नाही, आई हवी पैसेवाली
हट्ट पुरविता तिची झोळी रिकामीही झाली!
नको रडगाणे, हवी जाहिरातीमधली आई!
लेखकsur_nairयांनी रविवार, 16/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
वाढदिवस
अलीकडे ते एकमेकांचा
वाढदिवस साजरा करत नाहीत
एकमेकांना छोटासा पुष्पगुच्छ
साधसं भेटकार्डही देत नाहीत
इतर कुठल्याही दिवसासारखी
ती तारीख येते, निघून जाते
मित्र मैत्रिणींच्या शुभेच्छामध्ये
हरवतात दोघे एकमेकांचे
'वय वजन वाढते त्यात
साजरं काय करायचं' ती म्हणते
डिनर व केक, सुंदरशी भेट
त्याची सर्व इच्छाच मरते
कधी तोही असतो हिरमुसलेला
तिच्यावर कशास्तव चिडलेला
त्याचा आवडीचा पदार्थ करायचा
मग तिचाही बेत रद्ध झालेला
यावेळेस तो विचार करतोय
निदान प्रयत्न तरी करायचा
डिनर नको तर चौपाटीव
लेखकसन्जोप रावयांनी शनिवार, 15/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबनाचे विडंबन हा नवा खाक्या स्वीकारुन किंवा जुन्या बाटलीत भरलेली नवी दारु म्हणून
काही बोल बोलले , अन मौन काही अंतरी
(सोलवटली ढोपरे, अन शेकल्या नडग्या तरी)
काही लाह्या तडकल्या, अन मूग गिळले भर्भरी
बंडझेंडे फडकले अन उग्र वळलेल्या मुठी
काही म्हणती लाजुनि 'शोभा झाकलेली बरी'
पाठमोर्या आकृतीला पाहुनि उद्गारले
'माणूस हा होता बरा' गोष्ट असतसे हीही खरी
काय चमचे, किति पळ्या अन डाव कित्येकी येथे
मेल्या म्हैशीला पिळुनि दावू दूध मणभरी
हरवल्याचे दु:ख नाही, हरवले ते हरवले
कोतवाला हाती फसलो, शल्य हे उरले उरी
पालखी ती उतरली अन भोई खांदे चोळती
लेखकनिरन्जन वहालेकरयांनी शुक्रवार, 14/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपा वर सन्माननीय सभासदाचा प्रचंड "काथ्याकुट" सुरु आहे बुडीत “ खा s s त्या"च्या “ हिशेबाचा ! ! ! जो माझ्यासारख्या सामान्य व नवीन मिपाकराच्या आकलना पलीकडे आहे. वाटलं आपणही आपला “ हिशेब ” सांगून मोकळ झालेलं बरं ! कदाचित सन्माननीय सभासंदांना ह्या मनस्तापाचा ताण कमी होण्यांस थोडीफार मदत होईल
कोरीच पान आयुष्याची ! ! !
लेखकपंचमयांनी रविवार, 09/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आईमी सावलीत होतो कल्पतरूच्या
तोवरी जाण नव्हती...
तो कल्पतरू जळत होता,
ज्याची मला तहान होती....
वात्सल्याच्या चार भावना,
कुठल्या कुठे विरून गेल्या....
माणुसकी जिथे मातीत मिसळली ,
ती मातीसुद्धा अजाण होती....
अगतिक मी प्रेमाच्या शोधात
चार दिशात हिंडलो.
राहूनी या धरेवरती
त्या परमेश्वराची आस होती.....
शेवटी फिरूनी थकलो,
आलो कल्पतरूच्या छायेत..
खरच परमेश्वरच स्थिरवला होता,
त्या कल्पतरूच्या मायेत....
मिळाली तिची छाया
साताजन्माची उतराई होती,
तिच्या कुशीत शांतपणे घेणारी
ती कल्पतरू माझी आई होती.......
-निशां
लेखकपाषाणभेदयांनी बुधवार, 05/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक उदास का वाटे
आज अचानक उदास का वाटे
न रमे मन हे दिवसाही अंधार भासे ||धृ||
ईकडे पाहून तिकडे पाहून
वेळ घालवू किती
कसे कोण जाणे
कितीक वेळ माझी जाते
आज अचानक उदास का वाटे ||१||
किती मी चेहर्यांना वाचू
किती अनूभव लेखू
आवाज जवळी नसतांना
साथीचे शब्दही पडत आहे थिटे
आज अचानक उदास का वाटे ||२||
दुर अंतरावरी असता तू
कसा निरोप देवू
येथला निरोपही घेण्या
मन माझे आक्रंदूनी उठे
आज अचानक उदास का वाटे ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०५/०५/२०१०